वैशाख वणवा...
वैशाख वणवा...
1 min
3
उभं शिवार पेटलं बघा ,
निखारा रोमरोमी तापला ,
तुम्ही राया टाकता नजर ,
वैशाख वनवा पेटला ...
भर दुपारी झळ पोहचता ,
अग्नीचा डोंब उसळला ,
पेटून उठता शिवार ,
तुम्ही एकटाच वाचला ...
वाचवायला हात द्या हो ,
का ?असे निष्ठुर वागता ,
शिडकाव पाण्याचा करुनी ,
मिळेल दिलासा आग विझता ...
जाऊ नका काना डोळा करूनी ,
मी शब्दं देते तुम्हाला ,
नाचून नाचून तुटले घुंगरू ,
आता या हो सावरायला ...