Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Inspirational Others

4.5  

Neha Ranalkar

Inspirational Others

विषय:- पाणी पावसाचे अन् डोळ्यांतलेतील

विषय:- पाणी पावसाचे अन् डोळ्यांतलेतील

1 min
456


पाणी पावसाचे भागवते कधी

तहान सृष्टीतल्या चराचराची |

पाणी डोळ्यातलं देते वेदना

प्राणी मात्राना आयुष्यभराची | |१| |


हल्ली फार भेडसावतोय

ओला व सुका दुष्काळ |

तमाम जनतेसाठी ठरतोय

जणू त्यांचाच कर्दनकाळ | |२| |


अतिवृष्टी कधी करी बेजार 

कधी भेडसावतेय अनावृष्टी |

कमी अधिक प्रमाणात येथे

धोक्यात येतेय सजीवसृष्टी | |३| |


पाण्या अभावी पीक करपते 

तहानेने व्याकूळ प्राणिजात | 

अतिवृष्टी ने विस्कळीत जिवन

पिकांसवे पशुधन वाहुन जात | |४| |


पाण्यासाठी कधी होते वणवण | 

सर्वस्व हिसकावून घेतो महापूर |

रोगांचा प्रार्दुभाव, जिवितहानी,

महागाईचा छळतो भस्मासूर | |५| |


ओसंडून वाहते कधी पाणी

तोटीच नसल्याने त्या नळा |

वाळवंटात सांडणीस करती

ठार सुकता पाण्याविना गळा | |६| |


नेमेचि येतो पावसाळा म्हणत

पाण्याचे महत्व नाहीं आठवत |

कित्येक गेले पावसाळे तरीही

धरणात पाणीच नाही साठवत | |७| |


तहानलेल्या जीवांना पाणी 

ठरते नावा प्रमाणेच जीवन |

हेच पाणी नाकातोंडात जाताच

बुडणा-याचे हिरावून ने जीवन | |८| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational