Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Khadye

Others

2  

Vrushali Khadye

Others

वृक्षारोपण गीत

वृक्षारोपण गीत

1 min
3.0K


वृक्षारोपण ,चला करूया

एक एक झाड  लावून आपण वसुधेला  जगवू या .....धृ

 

झाड आपले सच्चे मित्र

झाडे लावून बदलूया चित्र  

ला -ला-ला

नटून,सजून ,होईल हिरवीगार  वसुंधरा हो  ..................1

 

कार्बनडायाक्साईड झाडे घेती

ऑक्सिजन प्राणिमात्रांना देती

ला -ला-ला

झाडांमुळेच मिळतो प्राणवायू सजीवाला हो .....................2

 

छाया वृक्षांची मिळे अपार

बांधू वृक्षांभोवती पार

ला-ला-ला

फळे,फुले, औषधे आपणां झाडेच देती हो ....................3

 

निवारे हरपले पशुपक्ष्यांचे

जंगल  वाढले क्राँकिटचे

लावून  दारी झाडे-झुडपे निवारे करू हो .................4

 

करूनी आपण वृक्षारोपण

झाडांचे करू संवर्धन

आळा घालू प्रदूषणाला,वाचवू पर्यावरण हो...............5

 

झाडे लावू ,झाडे जगवू

हरित महाराष्ट्र आपण घडवू

एक माणूस -एक झाड हाच नारा हो ..............................6


Rate this content
Log in