व्यक्त
व्यक्त
सखे आज तुझ्या आसवांनी
नयनात अशी गर्दी केली
तुझ्या मनीची सल आज
तू मला सांगशिल का ?
काय झाली अशी चूक
आज नकळत हातून माझ्या
भाव तूझ्या मनी दडलेले
व्यक्त आज करशिल का ?
का समजतेस परके इतके
तूच श्वास असतांना माझा
जाणते मन माझे सारेच
आतातरी अबोला सोडशिल का ?
हो व्यक्त सारिच आता
असे काय मनी खंत
नकोच पाहू अंत असा
पूर्वीसारखी पुन्हा हसशिल का ?