Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

आजचा विषय - दुष्काळ एक मोठी सम

आजचा विषय - दुष्काळ एक मोठी सम

2 mins
821


 युवकांनो जागे व्हा

  करूया वृक्षारोपण

  जलसंवर्धन करती 

  वृक्षांचे करू जतन

   मनुष्य विज्ञान युगात पोहोचला. चंद्रावरही पाऊल ठेवले. परंतु या अनुषंगाने वसुंधरेच्या घटकांचा नाश करू लागला. निसर्गाने बहाल केलेली वृक्ष, झाडे, वेली, माती जल आणि हिरवळ यांचा ऱ्हास होऊ लागलाय. प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड झाली.वृक्षांची बेसूमार कत्तल झाली.जे वृक्ष पर्जन्यवृष्टी घडवून आणतात.मातीची धूप टाळतात. त्यांनाच तोडल्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती संपुष्टात येऊ लागली आणि दुष्काळासारख्या या संकटाचा सामना करण्यास सज्ज व्हायला हवे नाहीतर लागणार नाही नद्या, तळी आणि जलाशयातील जलसाठा संपुष्टात येत आहे.

  लोकांना पिण्याचे पाणी मिळवायला मैलोन् मैल चालावे लागते. वृक्षतोडीमुळे ऋतूमानावर विपरित परिणाम झाला आहे. अशीच अविरत वृक्षतोड होत राहिली तर मनुष्य माती, जल, नैसर्गिक घटकांना मुकणार आहे आणि भूकंप, दुष्काळ ,उन्हाळा अशा अनेक आपत्तींचा सामना करावा लागणार आहे. मनुष्य ध्येयवादी प्राणी आहे. विज्ञान युगातील मानव प्रगतीपथावर जात असता स्वतःचे जीवन सुखात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे जंगले नष्ट होऊन सगळीकडे सिमेंट काँक्रीटचे जंगल दिसू लागले. पैशाच्या हव्यासापोटी जागोजागी इमारती बंगले, धरणे, पूल यांचे बांधकाम होताना दिसत आहे. माती मोकळी होऊन पाणी नि हवे सोबत दूर उडून जाते त्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग उघडाबोडका लागला आहे.

     जागोजागी कंपन्यांनी कारखान्याची निर्मिती करून जलप्रदूषण, अन्न प्रदूषण वाढले आहे. स्वतःच्या सोयीसाठी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ध्वनी हवेचे प्रदूषण वाढले आहे. रोगांचा प्रादुर्भाव वाढत असता शेतीखाली असणारी सारी जमीन आता भकास माळरान झाले आहे. ती नापीक बनली आहे. शेतामध्ये रासायनिक खते आणि पाण्याचे प्रमाण वाढले आहे. निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य निर्मिती होऊन लोकांना या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे निरोगी जीवनमान राहिले नाही. लहान वयातच हृदयविकार, मधुमेह अशा रोगांना बळी पडावे लागते. वृक्षतोडीमुळे पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे विहिरी, कूपनलिका खोदल्या जातात. त्याचा परिणाम होऊन भूजल पातळी कमी झाली आहे. एक दिवस भूपृष्ठाखालील पाण्याचे साठे संपले तर लोकांना पिण्याचे पाणीही मिळणार नाही. यावर एक सोपा पर्याय आहे. प्रत्येकाने वृक्षतोड न करता वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे आणि पुढच्या पिढीचे जीवन सुखमय करावे.


Rate this content
Log in