Pakija Attar

Others

4.7  

Pakija Attar

Others

आनंदी दिवा

आनंदी दिवा

3 mins
798


पावसाची रिपरिप चालू होती. दिवाळी आली तरी पाऊस बंद होत नव्हता. दिवाळीची सुट्टी जवळ येत होती. या सुट्टीत डोळ्यांचे ऑपरेशन करूया. डोळ्यांमध्ये दोन्ही मोतीबिंदू आले होते. पेपरचे गठ्ठे आले होते. आधीच तपासायला हवे. अंकिता भरभर पेपर चेक करत होती.


 संध्याकाळी डॉक्टरांकडे गेल्यावर डाक्टर म्हणाले ."डोळ्यांना ट्राय फोकल लेंनस लावा. ती फार महाग आहे. पण त्यांचे फायदे खूप आहेत.तुमाला डायबिटीस आहे." त्यामुळें ठरवलं लेंनस महाग असलीतरी बसवायचे.


बँकेत पैसे ठेवले होते. आधीच नियोजन करून ठेवले होते. काळजी नव्हती. ऑपरेशनची तारीख ठरली. दोन दिवस आधी पैसे भरायचे होते. "उद्या जरा बँकेत जाऊन पैसे काढून आना" अंकिता म्हणाली.


संध्याकाळी बातमी आली. बँक बंद झाली. अंकिता मटकन खाली बसली.,"आता काय करायचे एवढे पैसे कोठून आणणार"?.दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेत गेली. अहो माझं ऑपरेशन आहे मला पैसे हवेत


"तुम्हाला आता पैसे मिळणार नाही"


"डॉक्टरांचा ऑपरेशनच्या कोटेशन आणा. "मॅनेजर म्हणाली.


"कोटेशन दिल्यानंतर पूर्ण पैसे मिळणार का?"अंकिता जीव तोडून सांगत होती.


"ते पहा फक्त 60 हजार रुपये मिळतील तेही डॉक्टरांच्या नावाने."


"अहो मी ऑपरेशन साठी पैसे ठेवलेत आता मी कोणाकडे पैसे मागू काय उपयोग बँकेत ठेवून "तिच्या डोळ्यात पाणी आले.


"अहो आम्ही काहीच करू शकत नाही वरून तसा आदेश आहे आम्ही तरी काय करणार?"मॅनेजर म्हणाली. आता काहीच इलाज नव्हता.. पुन्हा पैशांची व्यवस्था करावी लागणार होती. ठरल्या दिवशी अंकिताच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले. ती घरी आली दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी होती. ती मात्र डोळ्याला काळा चष्मा लावून बसली होती . "बाई झाल ऑपरेशन" सुमन म्हणाली. "हो झालं."


"उद्या धनत्रयोदशी आहे बाई"


"हो ना मी अशी घरात डोळ्यांना काळा चष्मा लावून बसणार, बाहेर रॊशऩाई आहे. तो बाजार फुलला असेल बाजारात दिवे, तोरणे, झाडू, सजावटीचे सामान जत्रा भरली असेल. आज मात्र मला ते पाहता येणार नाही. फार वाईट वाटतं. सगळे बाहेर गेलेत. एकटी घरात. आज मला कळलं


वृद्धाश्रमात राहणारे वाट पहात एकटे दिवस काढणारे वृद्ध त्यांचं दुःख आज मला कळलं."


"बाई तुमचा वाढदिवस पण आहे ना."सुमन म्हणाली."मी ठरवले आहे माझा वाढदिवस वृद्धाश्रमात करेन."तिने लगेच अमितला फोन केला.


"अमित माझा वाढदिवस तुझ्या वृद्धाश्रमात साजरा करायचा आहे. तुला काय हवा आहे?"


"मॅडम या वेळेस तुम्ही बेडशीट दिल्या बरी होईल. चाळीस बेडशीट लागतील."अमित म्हणाला.


"चालेल मी दुपारी तीन वाजल्यापासून येईल. वृद्धांशी हितगुज करेल चालेल ना,"अंकिता म्हणाली."चालेल मॅडम मी गाडी पाठवून देतो तुम्ही या."


मग काय लगेच तयारी सुरू झाली. फुगे घेतले


चॉकलेट्स घेतले. फळ घेतली. सगळे नातवंड घेतली. सगळे वृद्धाश्रमात पोहोचले.


अमित प्रत्येक वृद्धाची ओळख करून देवू लागला. त्यातील एक आजी म्हणाली." तुला माझं लेक भेटला का? वडगाव ला असतो. त्याला म्हणावं आई बरी आहे पण तू भेटायला ये मी वाट पाहते."


"हो मी सांगते त्याला."हे सांगताना अंकिताचे डोळे पाणावले. या शिक्षिका ." मी कविता म्हणून दाखवू वर्गात माझा आवाज मुलांना खूप आवडायचा. वर्गातले मुलं नेहमी म्हणायचे बाई तुमचा आवाज फार गोड आहे." हो मी त्यासाठी वेळ ठेवला आहे .सर्वांना संधी देणार आहे"


हे बँकेचे मॅनेजर. हे इंजिनियर आहेत. प्रत्येक जण  सुशिक्षित व शिकलेला होता. मनातल्या मनातच अंकिता मात्र देवाला धन्यवाद देत होती. मी अजून माझ्या परिवारात आहे.


"अमित बाहेर अंगणात गोलाकार खुर्च्या लाव. सगळ्या वृद्धांना खुर्च्यावर बसुया."


कबीर तु सगळे फुगे बाहेर आण. प्रत्येक आजोबांना एक एक फुगा दे. प्रत्येक जण फुगे फुगवण्याचा प्रयत्न करत होता. जो प्रथम फुगवला त्यांना बक्षीस दिलं जात होतं. दुसरा गेम खेळण्यासाठी लैबाने बकेट पुढे आणले होते. त्यात चिठ्या होत्या. प्रत्येकाने चिट्टी उचलायची. त्याप्रमाणे करून दाखवायचं. खूप मजा आली होती. प्रत्येक जण वेगळा अनुभव सांगत होता. काही त्यांच्या भूतकाळात गेले होते. नातवंडांना ही बरीच माहिती मिळाली. शेवटी भेंड्यांच्या खेळ घेतला गेला. त्यात जुनी गाणी बरीच ऐकायला मिळाली.


आज बक्षीसे आजी-आजोबांनी खूप मिळाली. नातवंडांना खूप आनंद मिळाला. शेवटी केक आणला. केक कापला. प्रत्येक आजी-आजोबांना भरवला. आजी आजोबा भरभरून आशीर्वाद देत होती. सर्वांना खूप आनंद मिळाला होता. आजचा दिवस वृद्धाश्रमात खूप चांगला गेला होता. प्रत्येक चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दिवाळीचा जणू आनंदी दिवा त्यांच्या चेहर्‍यावर तेवत होता. पुढच्या उरलेल्या आयुष्याला उभारी देण्यासाठी....


Rate this content
Log in