Author Sangieta Devkar

Abstract Tragedy Inspirational

3.7  

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy Inspirational

आयडेंटिटी

आयडेंटिटी

3 mins
168


मधुरा ला सकाळ पासून सगळ्यांचे कॉल्स येत होते.तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.तिला तिच्या कंपनी मध्ये प्रमोशन मिळाले होते.ही हेड ऑफ डिपार्टमेंट बनली होती. 


मधुरा मधुरा माझे सॉक्स कुठे आहेत काढून ठेव.मिलिंद म्हणाला.आणि कपाटातून आपले कपडे घेत होता.त्याचा आवडता शर्ट त्याने बाहेर काढला,तर त्याला गुलाबी रंग लागला होता.मधुरा ..त्याने जोरात आवाज दिला. 


काय पाहिजे मिलिंद सगळ तर जागे वर आहे.मधुरा आत येत म्हणाली.हे काय माझ्या शर्ट वर हा रंग कसा लागला,तुला माहित आहे ना की हा माझा फेवरेट होता. 


हो ते तुला सांगायचे राहून गेले.चुकून मशीन मध्ये माझ्या ड्रेस चा रंग लागलाचुकून..तुला अक्कल आहे का जरा तरी..रंगीत कपडे असे धुवायला टाकतात का? सगळ्या शर्टाची वाट लावली.आणि इतकी काय बिझी आहेस त्या फोन मध्ये.? एक प्रमोशन मिळाले म्हणून हवेत उडू नकोस.घरा कडे पण लक्ष दे. 


मिलिंद चे शब्द तिच्या मनाला चिरत गेले.तिला अक्कल नव्हती म्हणून प्रमोशन मिळाले का? याला माझ्या कोणत्याच गोष्टी चे कौतुक नसते कधीच.मधुरा उदास झाली.आवरून मग ऑफिस ला गेली.


मिलिंद ही ऑफिस ला आला.त्याच्या कंपनीची अजून एक ब्राच बंगलोर ला होणार होती,त्या साठी तिथे कोणाला हेड म्हणून पाठवायचे याची चर्चा होत होती.दुपारी बॉस ने अनंनौस केले की मिस रेवती ला त्या ब्रांच ची हेड करण्यात आले ,तिला राहायला बंगला,गाडी पगार वाढ सगळ देणार होते 


टिफीन खाताना जो तो बोलत होता रेवती बद्दल.नीरज म्हणाला,मिलिंद माहित आहे का तुला,या बायका उगाच नाही बॉस च्या मागे पुढे करत.अरे अक्कल शून्य असली तरी आपल्या सौंदर्याच्या बळा वर बॉस ला खुश ठेवतात आणि अस प्रमोशन पदरी पाडून घेतात.ही रेवती जात असणार त्या टकलया बॉस सोबत ,मस्त मजा मारत असणार म्हातारा,तिच्या सोबत 

मग काय या बायकांचे घरात नवर्या बरोबर बिनसले की आहेच ऑफिस मध्ये मग कोणी मित्र नाहीतर बॉस. 


मिलिंद हे सगळ ऐकून विचारात पडला.रात्री तो घरी आला.मधुरा येवून किचन मध्ये काम करत होती.तिने त्याला पाणी दिले 


कॉफी घेणार का मिलिंद ?नको..पण मला एक सांग सात आठ महिने झाले तुला या कंपनीत नोकरी लागून आणि लगेच तुला इंक्रिमेंट,कसे काय? 


काय म्हणायचे आहे मिलिंद तुला?हेच की बॉस सोबत मजा करतेस तू,हो ना.? 


वाटेल ते बोलू नकोस मिलिंद.माझी हुशारी आणि काम बघून दिले आहे मला प्रमोशन. 


अच्छा,मी तुला हात लावला की तू दमलेली असायचीस,तुला इच्छा नसायची याचा अर्थ तू बाहेर मजा करून यायची,म्हणून माझ्या सोबत इच्छा नसायची करेक्ट? 


तू घाणेरडे आरोप करतो आहेस मिलिंद.हे खोट आहे 


मग खर काय ते तू सांग.तुला बाहेर मजा मारायची म्हणून तू आपल पहिलं मूल तू ॲबोर्शन करून पाडलेस.आताच मला मुल नको.माझी फिगर खराब होईल.कोण बघणार त्या बाळा कडे असच बोलली होतीस ना! 


मिलिंद अरे तेव्हा मला नुकताच जॉब लागला होता,त्यात नवीन जबाबदारी लगेच नको होती म्हणून ॲबोर्शन केले.

बास..मला समजत नाही का? तुझं इतकं छान छान नटून थटून ऑफिस ला जाणं,पार्टी करणे.पुरुष कलीग शी लाडे लाडे बोलणे,मी मूर्ख नाही आहे मला सगळ आता समजते आहे.तुझं हे प्रमोशन,पगारवाढ .कोणत्या बळा वर मिळवले आहेस तू. 


मिलिंद मी अस काही ही केलेलं नाही आहे.आणि तू नाही का तुझ्या कलिग् रेवती, नीता यांच्या सोबत गोड गोड बोलत असतोस.रोज व्हॉटस् अप चाट चालू असतात ते काय आहे? 


ये तू माझी बरोबरी नको करू हा.मी पुरुष आहे समजल.मग मी ही तुझी बायको असन्या अगोदर एक माणूस आहे.तुझी गुलाम नाही. 


मिलिंद ने मधुरा ची मान पकडली,जास्त बोलू नकोस,या घरात राहायचे तर आज पासून तुझी नोकरी बंद.घरात बसून कर काही शिलाई,किंवा क्लासेस घे.पण नोकरी नाही करायची. 


मी एम बी ए टॉपर आहे ते घरात बसायला नाही केले.तुझे शिक्षण तुझी नोकरी म्हत्वाची मग माझी ही तितकीच महत्त्वाची आहे.मग आताच्या आता या घरातून बाहेर जा आणि सिद्ध करून दाखव बघू बाहेरच्या जगात कोण ओळखते तुला.मिलिंद ने एक हिसका देवून तिला सोडले. 


आज जग कुठे चालले आहे आणि तू एक सुसंस्कृत म्हणवून घेणारा पुरुष ,तुला माझी प्रगती खुपते,मी तुझ्या पुढे जाईन ,माझा पगार वाढेल ही भीती वाटते तुला मिलिंद.कीव वाटते मला तुझी.नुसते बोलायला स्त्री पुरुष समानता,पण घरोघरी तुझ्या सारखे मिलिंद असतील तर मग त्या स्त्रीला स्व ताच अस्तित्वच उरणार नाही.आता माझीच इच्छा नाही या घरात थांबायची.मी तुला दाखवून देईन काय आहे माझी आयडेंटिटी,ते ही तुझ्या शिवाय!मधुरा त्याच क्षणी त्या घरातून बाहेर पडली.


समाप्त #महिला दिना निमित्त..# खरच आहे का स्त्री पुरुष समानता?



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract