Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

बालपण नाही पुन्हा...

बालपण नाही पुन्हा...

1 min
553


बालपणीच्या आठवणी 

न्याहाळणं आता वेळोवेळी 

कितीही चाललं जग पुढे 

तरीही बालपण नाही पुन्हा


छोट्याशा खाऊतलं प्रेम 

वाढलं वाटून खाण्याने 

आसवांचा मनसोक्त पाऊस 

फक्त हट्टाला माहित 


लपाछपीचं वेडं कोडं 

आपलं आपोआप सुटलं 

लपवालपवीचं राज्य 

त्यात कधीच नाही आलं 


आजच्या भरभरून आनंदाला 

उद्याच्या काळजीचं ग्रहण 

कधीच नाही स्पर्श तेव्हा 

लडिवाळपणाचा एक छंद असा 


स्वार्थ फक्त स्वतः पुरता 

कधीच नाही एकटादुकटा 

स्वभाव नावाचं घट्ट घर 

कधी गवसलं कळलंच नाही 


राग नावाचा आपलाच शत्रू 

आता चुकून वाट चुकला 

प्रेम, माया असं छत्र असूनही

द्वेष शब्द अधिक ओळखीचा 

 

हरवलेलं बोलकं बालपण 

पुन्हा कधी येईल वाट्याला 

की गवसलेलं नवं कोडं 

सुटणार नाही परत कधी


Rate this content
Log in