Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग 5 "रूनझून पैंजनाची"कादंबरी

भाग 5 "रूनझून पैंजनाची"कादंबरी

5 mins
139


     सुमेधाच्या आयुष्यातली पहिली सकाळ ! प्रभातसमयी सुमेधाला जाग आली तीने खिडकीचे पडदे बाजूला केले थंडगार वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली ती पटकन उठली लगेच रूम मधून बाहेर अंगणात आली गोठ्याकडे पाहिले गायी-वासरे झोपली होती आज सुमेधा जरा लवकरच उठली तिने पटकन हातात केरसूनी घेऊन अंगण झाडून काढले सडा टाकला सुंदर मोहक रांगोळी सजवली तोपर्यंत कोणीच उठलेलं नव्हते.

पटकन बाथरूम मधे गेली.थंडगार पाण्याने मस्तपैकी

आंघेळ केली ती स्वत:ला बघूनच शरमली,प्रत्येक अवयव बघून सौदंर्य चीत्त राघवच्या आठवणीनं बेजार झाली.

सुमेधा नावाप्रमाणेच सौंदर्याची मुर्ती होती तिचा कमनीय बांधा अप्सरेलाही लाजवेल असा होता. गालावर व हणुवटीवर गोड खळी पडायची, लाघवी बोल व स्मितहास्य तिने सुंदरतेच्या साऱ्या सिमा काबिज केल्या होत्या. ती खुप लाघवी कोमल मनाची दया करूणा तिचे अलंकार होते.ती सदा आंनदीत राहणारी लाजाळू प्रवृत्तीची प्रेमळ तरूनी होती.विवाहानंतर कळीचे फुलात रूपांतर झाले होते.ती तडफडली अक्षरश: राघवच्या बाहूपाशाची तिला आज गरज होती परंतू तो नव्हता .

आपली दैनंदिन कार्य करून ती फ्रेश होऊन स्वयंपाक घरात आली आणि देव्हार्‍या समोर उभी राहून म्हणाली देवा मला शक्ती द्यावी माझ्या नविन संसारात मला यश द्यावे. जूनचा महिना कडक उन्हाळा परंतू गावात सर्वीकडे हिरवळ होती मोठमोठे वृक्ष होती म्हणुन गारवा होता,आल्हाद देणारा झुळझुळणारा वारा वाहत होता. तिला इथले वातावरण फारच आवडले.

 शहरासारखी इथे उष्णता नव्हती तरीपण सूर्याचा पारा अंगाची काहिली करत होता सुमन मनाशीच पुटपुटली देवा भास्करा अजून किती तापणार आहेस तू , तेवढ्याच सासुबाई जवळ येऊन म्हणाली सुमेधा हे घे वाळ्याचं सरबत पिऊन घे तुला बरं वाटेल आजकाल खूप गरम होतंय सुमेधाने निमूटपणे सरबत घेतले तिला खुप शांत वाटले तिने मनोमनी सासूबाईचे धन्यवाद केले.

मनातच म्हणाली,आईला माझी किती काळजी आहे.इथे सर्वच किती प्रेम करणारी लोक आहेत.मनातून ती फारच सुखावली.

   तेवढ्यातच सुमेधाचा दिर राजीव हातात मोबाईल फोन घेऊन आला होता.काय वहिनी मोबाइल रूममधेच ठेवलाय आणि हळू आवाजात म्हणाला राघव दादाचा कॉल आला आहे माझ्या मोबाइलवर तुमच्यासाठीच हा घ्या बोला सावकाश, राजीवने हातात मोबाइल दिला. सुमेधा आपल्या रूम मध्ये गेली आणि राघवशी बोलली.

राघव म्हणाला !

सुमेधा कशी आहेस तू ? सुमेधा थरथरत्या दिलाने म्हणाली, मी बरी आहे आपण कसे आहात ?

राघव म्हणाला !

कसा असणार तळपतोय तुझ्याशिवाय सुमेधाने राघव चे बोलणे ऐकले व शरमेने कावरीबावरी होऊन इकडे तिकडे बघत चौकशी केली कुणी ऐकल तर नाही ना आमचं बोलणं, राघव पुन्हा बोलला तू बोलत का नाहीस सुमेधा अशी गप्प का, सुमेधा म्हणाली तुम्हीच बोला की मला काही सुचत नाही तुम्ही कधी येणार गावी!

राघव म्हणाला !

बरं माझी आठवण येते की नाही तुला?आमची तर झोपच उडाली बा, विवाह करणे काही चांगली गोष्ट नाही, आपल्या बायको विना एक एक क्षण वर्षा सारखा भासत असतोय.

रात्रंदिवस तुझाच ध्यास, माझ्या श्वासाश्वासात तू भरलीया जिकडे तिकडे तुच दिसत असते.

 सुमेधा म्हणाली !

अस नाही बोलायचं कुणी ऐकेल ना, राधव म्हणाला ऐकू दे ना आपला विवाह झालेला, तू माझी हक्काची बायको तुझ्याशी खूप-खूप बोलावसं वाटतं ग पण काय करू दिवसभर ड्युटी असते ना!

 बरं ऐक सुमेधा मी तीस तारखेला येणार तोपर्यंत मध्ये- मध्ये फोन करत जाईल.ओके बाय म्हणून राघवणे फोन बंद केला. सुमेधा तिथेच उभी राहिली राजीवचा आवाज आला तो म्हणाला वहिनी झालं का बोलणं काय म्हणत होता दादा उत्तराची वाट न बघता मोबाईल घेवून पटकन तो निघूनही गेला.

    सुमेधाला अजून बरेच दिवस रहायचे होते. ती आतुरतेने कॅलेंडरमध्ये रोजच तारखा बघत असे ,

सुमेधा मनातच म्हणाली आज तर दहा तारीख आहे काही हरकत नाही तेवढिच आईबाबांची सेवा घडेल मला,

  सुमेधाला सासरी येऊन नऊ दिवस झाले होते त्या नऊ दिवसात तिने सर्वांचे मनं जिंकलं होतं, मायाताई कालच आपल्या सासरी गेल्या राजीव तेवढा येता-जाता मस्करी थट्टा करीत होता सुमेधाला बरं वाटायचं सासर्यांना बाबा म्हणू लागली आणि सासु बाईला आई म्हणायची!बाबा सुमेधाला बेटा म्हणायचे, तिला काहीच परक्यासारखं वाटत नव्हतं जसे माहेरी तिला सर्व बोलवत असे तसेच इथेही बोलवायचे कमी फक्त एका राघवचीच होती. सर्व लोकं पण साधेभोळे होते. एरिया पण चांगला होता.

   सगळ्या मुली बरोबरीच्या लहान-मोठ्या कमीजास्त बरोबरीच्या होत्या.सुमेधा जवळ येऊन बसायच्या त्यांची बहीण-भाऊ पण यायचे त्यातून एकाच नाव मनोज होतं तो त्याला सर्व मन्या म्हणायचे,एकाच नाव छान गौतम होतं पण त्याला गम्या करून टाकले होते.असल्या अनेक नावाची छेडछाड करून शॉर्ट केलेलं होतं परंतू सुमेधाने कधीच त्यांना टोपन नावाने बोलवायची नाही..पूर्ण स्पष्ट शब्दात त्यांचे नाव घेऊन त्यांच्याशी बोलायची त्यांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करायची काही वस्तू खायला द्यायची छान छान चित्र रांगोळ्या वगैरे सुमेधा काढून दाखवायची, मोठ्या महिलांना बचत कशी करायची घरच्या अन्नधान्याची हेळसांड होऊ देऊ नये ती सुरक्षित कशी ठेवावी. नवीन पदार्थ कसे बनवायचे आणि उरलेल्या पदार्थाचं रूपांतर करून ताजे स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे ,जुन्या कपड्यांपासून पिशव्या पायपोस विणायच्या आणि खर्चात ताळमेळ कसा बसवायचा, या सर्व बारीकसारीक गोष्टीचे नॉलेज असल्यामुळे अनेक गोष्टी सांगायची .

   सर्वांना सुमेधाचा खूप लळा लागला होता.तसं कारण ही होतं ,ती खूप लाघवी गोड बोलणारी आणि सर्वांना सन्मान देणारी होती, काही दिवसातच पूर्ण गावात सुमेधाचे कीर्ती पसरली होती.

गावातील काहीजन सुमेधाचे खुपच कौतुक करायचे.बाबाला म्हणायचे, तुम्हाला अशी गुणवान हुशार सून मिळाली ,तुम्ही खरच भाग्यवान आहात तेंव्हा बाबा त्यांना म्हणायचे,मी सून म्हणून नाही समजत तिला, मी माझी मुलगीच समजतोय. आणि तिला मुली सारखच आम्ही वागवित असतो आणि ती पण आम्हाला आपल्या आई बाबा प्रमाने प्रेम देते.आणि म्हणाले ,आधी प्रेम द्यायच असतं नंतर घ्यायचं असतं.

बाबंचा मित्र रामनाथ काका म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणून सून बाईला जर त्यानुसार पाहिले तर सून पण लेक होऊ शकते ते आपल्याच हातात असते.

   बोलता-बोलता गावात सुमेधाचा चांगुलपणा लोकांना कळायला लागला एक दिवस शेजारच्या गौतमचा कान दुखायला लागला तो खूप रडत होता तो कोणालाच काही ऐकेना रडून रडून गोंधळ घातला गौतमच्या आई त्यास घरी घेऊन आली आणि आईला म्हणाली, माझ्या गुल्लूला काय झालं आहे सारखा रडत आहे आई म्हणाली, बघ सुमेधा यास काय झालं आहे?सुमेधाने प्रेमाने विचारलं तेव्हा त्याने सांगितले ,रडता-रडता लाजला आणि म्हणाला माझा कान खूप दुखतो आहे, तिला घरच्या खूप काही औषधी माहिती होत्या तिने आपले इलाज गौतम वर केले बघता बघता त्याचा कान दुखायचा थांबला. तशी सुमेधा या कामात निपुण होती सुमेधा रोजची कामे करून भरतकाम, शिवणकाम, वाचन करायची ती पुर्ण वेळ कामामधेच गुंतून असायची.

संध्याकाळच्या दरम्यान राघवाचा रोजच फोन यायचा. तशीच सुमेधा गोंधळुन जायची. राघव म्हणाला,कशी आहे राणीसाहिबा तिकडे गावात काय चाललं आहे आणि मधेच गंमतीने सुमेधाला खट्याळपणे चिडवायचा,

 सुमेधाचा चांगुलपणा त्याच्याही कानावर जात होता तसेच तिची लोकप्रियता ऐकून म्हणाला आमच्या गावातली लोक आवडली ना तुला मला कळला तुझा रात्रीचा प्रताप काय केलस तू तशिच सुमेधा गोंधळुन अडखळत म्हणाली, का का काय केले मी,

तू गौतम सोबत त्याच्यावर उत्तम उपचार केले म्हणे सुमेधा म्हणाली ! होय ना त्याचा कान खुपच दूखत होता ,इतक्या रात्री कुठे न्यायचे आपल्या गावी एकही डॉक्टर नाही.म्हणून त्याच्यावर मी उपचार केला आणि तो सक्सेस झालाय. सुमेधा आणि राघवचा वार्तालाप रोजच्या रोज खुलत होता आताशी सुमेधा मोकळ्या शब्दात बोलायची. तसेच भरभर दिवस संंपू लागलेत. सुमेधा राघवची चातकाप्रमाणे वाट बघायची .एक पर्व झाल्यागत आपल्या प्रीयाची वाट बघणे म्हणजे तपश्चर्याच असतेय.विरहाच्या गर्तेत न पडता सुमेधा स्वतःला अनेक कार्यात गुंतवून ठेवायची.मनी आशेचा दिप सतत तेवत असायचा. काहीच दिवस राहिले होते  राघव लवकरच येणार होता.


(क्रमश:)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama