Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

दैव जाणिले कोणी

दैव जाणिले कोणी

2 mins
158


  अनेक फेऱ्या चुकवून माणसाचा जन्म होतो असे म्हणतात. इतर कुठल्याही प्राण्यांपेक्षा माणसाच्या जगण्याला, मरण्यासाठी फार  मोठा अर्थ आहे. इतर प्राण्यांच्या मरणाबद्दल थोडावेळ पर्यंत हळहळ वाटते. हे अगदी साहजिकच आहे. परंतु एखाद्या माणसाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुबावर जो दु:खाचा डोंगर कोसळतो त्यातून सुधारणे अनेक वर्षे पर्यंत शक्य होत नाही.

   मानवी जीवन मौल्यवान आहे. या जीवनाची जपणूक अत्यंत सावधपणे केली पाहिजे. जीवनात आपल्याला कुठलीही वाईट सवय लागणार नाही याची खबरदारी माणसाने घेतली पाहिजे. तारुण्यात जेव्हा माणूस येतो त्यावेळेस तो स्वतः पेक्षाही कुटूबातल्या माणसासाठी आपण जीवन जगले पाहिजे. असा विचार प्रत्येक माणसाला येणे आवश्यक आहे. परंतु स्वत:च्या हौसेखातर काही हौसे-गौसे कुटूंबाचा आपल्यावर ज्यांचे जीवन अवलंबून आहे अशांचा विचार कधीच मनात येत नाही.

     खरे तर जन्मलेल्या प्रत्येक माणसाचा मृत्यू अटळ आहे. त्यापेक्षा पुढे जाऊन मी असे म्हणेन की जीवन जगणाऱ्या माणसासोबत त्याची सावलीही असते. मृत्यू हा माणसाला सावली सारखा आहे. जशी सावली माणसाला सोडून जात नाही. अगदी तसेच मृत्यू सुद्धा माणसाला सोडायची इच्छा नसते. मरण हे निश्चित आहे यात शंका नाही. परंतु माणूस किती दिवस. जीवन जगले आणि आयुष्य भर कसे तो जीवन जगले याला फार मोठा अर्थ असतो. अर्थात उतार वयामध्ये माणसाला काही ज्याच्या त्याच्या शरीरातील गुणतत्वानुसार एखादा रोग होणे अगदी साहजिकच आहे.

    परंतु ऐन तारुण्यात माणसाला नको त्या सवयी, घाणेरड्या सवयी लागन अनेक तरुण अचानक पणे मृत्यूला कंटाळता ही बाब निश्चितच चिंतनीय आहे. प्रत्येक तरुणांनी आपले जीवन सुरक्षित, सुरळीत कसे जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु आईवडिलांच्या सांगण्यावरून, जवळच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरून जो दुर्लक्ष करतो आणि स्वत: होवून ऐन तारुण्याच्या काळात नको त्या सवयी लावून घेतो अशा तरुणाला हा संसार सोडून जावे लागते. त्याच्या जाण्याला थोडा अर्थ वाटत असला तरीही त्यानंतर त्याच्या कुटूंबाची जी अवस्था होते ती अत्यंत केविलवाणी असते.

     म्हणून जीवन जगताना प्रत्येक माणसांनी जेव्हा सज्ञान नागरिक होतो तेव्हा स्वत:पेक्षा आपल्या छोटयाशा कुटूंबाचा विचार डोळ्यापुढे आणून आपले जीवन जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. 

    आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे याचा रीत विचार करून जीवन जगले पाहिजे. . 


Rate this content
Log in