Lata Rathi

Others

3.5  

Lata Rathi

Others

"डॉक्टर सुशील आणि प्रतीक" भाग-पहिला

"डॉक्टर सुशील आणि प्रतीक" भाग-पहिला

3 mins
11.8K


माझी ही कथा तीन भागात विभाजित केलेली आहे. 

काजवा!!! किती छोटासा जीव ना.. पण तो चमकतो फक्त अंधारात. उजेडात मात्र त्याच अस्तित्व असं नसतंच. आज आपल्या अवतीभोवती असे कितीतरी काजवे आपापल्या परीने समाजात काहीतरी करता यावं म्हणून झटत असतात....त्यातलाच एक काजवा...माझ्या कथेचा नायक-डॉक्टर सुशील.... Dr सुशील याचं छोटसं हॉस्पिटल. तो आपल्या दवाखान्यात नुकतेच पेशंट आवरून निवांत असा बसला होता. तेवढ्यात एका फोर व्हीलर गाडीतून एक नवयुवक आणि नवयुवती उतरले, त्यांच्या पेहराव्यावरून जरी ते सुशिक्षित आणि श्रीमंत वाटत असले तरी ते विवाहित असावे असं वाटत नव्हतं. युवक प्रज्वल त्याच नाव, अंदाजे 26 वर्षे वयाचा आणि ती म्हणजे पूर्वा अंदाजे 23 वर्षाची. ते दोघेही सरळ dr सुशीलच्या दवाखान्यात आले, दवाखाना तसा लहानच. वर्दळ नसल्यामुळे ते सरळ आत गेले. 

प्रज्वल- डॉक्टर साहेब, प्लीज कितीही पैसे घ्या....पण आम्हाला मुक्त करा यातून. 

Dr सुशील- पण हे चुकीचं आहे,गर्भपात हा कायद्याने गुन्हा आहे....यापेक्षा असं करा, तुम्ही दोघेही सज्ञान आहात, सुशिक्षित आहात, लग्न करा आणि येणाऱ्या बाळाला आपल्या जीवनात स्थान द्या.

 पूर्वा--नाही!! डॉक्टर साहेब मला हे मुलं नकोय? आणि लग्न??? ते तर मुळीच मान्य नाही. 

Dr सुशील--उठून उभे राहून ,"काय??? काय म्हणताय तुम्ही? लग्नचं नव्हतं करायचं.....तर मग हे सगळं???? खेळ समजलात की काय तुम्ही?

प्रज्वल-हे बघा, डॉक्टर साहेब, आम्ही दोघे गेल्या दोन वर्षांपासून 'लीव्ह इन रिलेशनशिप' मध्ये आहोत. पण आता मात्र आम्ही निर्णय घेतलाय तो वेगळे होण्याचा. पण पोटात वाढणार हे बाळ...यातून आमची मुक्तता झाली, की सुटलो आम्ही. आमच्या दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या..

Dr सुशील- वा! काय मस्त निर्णय. टाळ्या वाजवाव्या वाटतात तुमच्यासाठी...की कौतुक करू तुमचं पुष्पगुच्छ देऊन..... आता मात्र दोघेही घाबरले.

प्रज्वल म्हणाला,"प्लीज डॉक्टर साहेब, पैशाची अजिबात चिंता करू नका" आमच्यातल्या एका चुकीमुळे हे सारं घडून आलं.... तरी प्लीज... एवढ्यात

dr सुशील म्हणाले, लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे कळत ना तुम्हाला, एकमेकांना समजून घेणं,एकमेकांना ओळखणं..... पण तुम्ही तर त्याचा अतिरेकच केलाय...आणि वरून पैशाच्या गोष्टी करताय. मी पुलीस कम्प्लेट करून तुम्हा दोघांनाही अरेस्ट करू शकतो. (गर्भपात या गुन्ह्याखाली) पैशाची लालच दाखवताय काय? हे बघा, मी परत एकदा काय सांगतोय ते नीट ऐका... .... तुम्ही मौजमजा करायची, आणि शिक्षा मात्र त्या निष्पाप जीवाला... कुणी दिलाय हा अधिकार तुम्हाला. तुम्ही सुशिक्षित लोकच जबाबदार आहात असल्या काळिमा फासणाऱ्या घटनेला.

पूर्वा-पण.....डॉक्टर....

Dr सुशील-पण बिन काही नाही.., हे बघा, बाळाला अडीच महिने पूर्ण झालेत. बाळाची वाढ आणि तब्येत छान आहे.तेव्हा तुम्ही दोघांनी परत एकदा विचार करावा असं मला वाटतं. थोडा वेळ घ्या, शांतपणे विचार करा, आणि आठ दिवसानंतर मला परत भेटा.

प्रज्वल आणि पूर्वा थोड्या निराशेनेच का होईना दवाखान्यातून निघाले..., आणि dr. सुशील आपल्या भूतकाळाच्या आठवणीत गेला. क्रमशः पुढील भागात वाचा- प्रज्वल आणि पूर्वा येणाऱ्या प्रसंगाला कस तोंड देतात. सुशील चा भूतकाळ काय सांगतो....अजून बरंच काही. तोपर्यन्त नमस्ते


वरील लिखाण हे कॉपी right अंतर्गत लिहिले आहे . माझी कथा कशी वाटली हे like आणि comment करून नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझा उत्साह वाढविण्यास नक्कीच मदत करतील. साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे... कथा शेअर करा पण नावासह ही नम्र विनंती.


Rate this content
Log in