Charumati Ramdas

Abstract Fantasy Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Fantasy Thriller

धनु कोष्ठक - ७

धनु कोष्ठक - ७

8 mins
205


"झेनेच्का9 , नमस्कार, डियर, फक्त हे नको म्हणू की तू पीटर10मधे नाहीये."

"तुला कसं कळलंय, मरीना?"

"अरे, तुझ्या कॉन्फ्रेन्सबद्दल दिवसभर 'बातम्यां'मधे दाखवताहेत. तुमच्या त्या वेडपट बॉम्बमुळे...ही तुझी तर गम्मत नाहीये नं?"

"माझी? मी तर आत्ता संध्याकाळीच आलोय, मला स्वतःलाच काही कल्पना नाहीये. पण तुला कुणी सांगितलं की मी डेलिगेट आहे?"

"स्वतःच अंदाज़ लावला."

"नाही, असं शक्यंच नाहीये."

"ओह, तुझ्याबद्दल सांगत होते,…स्पेशलाइज़ेशनसह...म्हणाले की संख्या ओळखणारापण आहे. मी समजून गेले की तो तूच आहेस."

"ओळखणारे माझ्याशिवाय इतरही आहेत. मला तर काल सकाळपर्यंत पत्ता नव्हता, की कॉन्फ्रेन्समधे जाईन."

"म्हणजे, तुझ्याबद्दल मला तुझ्यापेक्षा जास्त माहितीये."

"चमत्कारंच आहे. तसं, इथे आत्तांच चमत्काराचीच गोष्ट होत होती...ऐक, कसं चाललंय?"

"येऊन जा, स्वतःच बघून घे. नव-यालापण भेटून घे. आत्ता तू कुठे आहेस?"

"कोणा मूर्खाला माहितीये, की मी कुठे आहे. ऑपेरा बघतोय."

"मारीन्स्कीत?"

"ओह, नाही, इथेंच हॉटेलमधे...काही गेस्ट-रूम सारखी, क्लबसारखी वस्तू आहे. बिल्कुल ऑपेरासारखं नाहीये. ते गद्यांत बोलताहेत, आणि स्पर्म्सबद्दल..."

"कदाचित, लेक्चर असेल?"

"नाही, मरीना, 'शो' आहे."

"तसं, तू आहेस कुठे? हॉटेलचं नाव काय आहे?"

त्याने नाव सांगितलं. स्ट्रीटचं नावपण सांगितलं.

"ओह, तर मग तुला इकडे येण्यांत काही त्रास नाही होणार."

ती समजावून सांगते की कुठे आणि कसं यायचंय.

"तू तर कदाचित फोनही नसता केला. माझी आठवणसुद्धा नसती केली."

"मरीना, मी सांगतो तर आहे, की आत्ताच आलोय..."

"ठीक आहे. फक्त, काही विकंत नको घेऊं. घरी सगळं आहे."

कपितोनवने फोन ठेऊन दिला.

ओल्या- दुसरी (तीच) जिना उतरतेय.

"येव्गेनी गेनादेविच, कित्ती छान झालं की तुम्हीं इथेंच भेटलांत. तुम्हीं विमानाने मॉस्कोला जाल. टिकिट 14,51चं आहे, सोमवारी. ठीक आहे? की तुम्हांला इथे थांबायचंय?"

"नाही, थैन्क्यू, मंगळवारी मला कामावर जायचंय. ओल्या! तुम्हांला माहीत आहे का, की तिथे काय दाखवतात आहे? हा तर ऑपेरा 'केलिओस्त्री' नाहीये?"

"बदललांय. हे नाटक आहे, "चमत्कार आहे, की मी आहे." हे पण जादू आणि चमत्कारांबद्दल आहे...तुम्हांला आवडलं नाही कां?"

"थोडंच बघितलंय, मला जायचंय."


21.20


बाहेर जायचं दार बंद आहे, कारण की छतावर जमलेला बर्फ खाली पाडंत आहेत. अंगणांत निघून कपितोनव बॉइलर-रूमच्या जवळून जातो. बर्फाचे कण स्ट्रीट-लैम्पच्या खाली पंतंग्यासारखे फिरताहेत. भुरकट मांजर त्याच्या रस्त्यातून आडवं जातं. ह्या ठिकाणी ब-याच मांजरी असतांत, इथे त्यांना, कम्पाउण्डच्या मांजरांना, खाऊ घालतांत. भाजलेल्या सॉसेजचा, आणि न जाणे कां कोबीचा सुगंध येतोय.


21.32


हा आहे कपितोनव, आणि तो रूट-टैक्सींत (इथे रूट-बसशी तात्पर्य आहे – अनु) जातोय. आजकाल ह्या शहरांत परिवहनाच्या ह्या साधनाला, जसं कपितोनवला कळलं, म्हणतात "टेश्की" – अक्षर 'T'च्या सम्मानार्थ, ज्याच्या पुढे रूट नंबर लिहिलेला असतो. ही गोष्ट काही घशाखाली उतरंत नाहीये. आधी असं नव्हते म्हणंत, पण ही तेव्हांची गोष्ट आहे, जेव्हां कपितोनव स्वतः पीटरबुर्गवासी होता.

खिडक्या थिजून गेल्या होत्या. खिडक्यांना बघून अंदाज लावणं कठीण आहे, की हे पीटरबुर्ग आहे, पण फक्त त्याच्यासाठीच, ज्याला माहीत नाहीये की कोणत्या शहरांत हिंडतोय.

जवळ-जवळ प्रत्येक माणूस आपापल्या इलेक्ट्रॉनिक खेळण्यांत मग्न आहे. काही लोक ह्या खेळण्यांच्या माध्यमाने कोणाशीतरी बोलताहेत. स्टीयरिंगवर बसलेला ड्राइवरसुद्धां (तो आपल्या भाषेंत), तेपण जे पैसेजमधे उभे आहेत, बोलताहेत – जवळ-जवळ अर्धी बस बोलतेय, आणि ब-याच जो-याने बोलतेय. मॉस्कोमधे पण असंच चित्र आहे.

कपितोनव मोबाइल काढतो, हे बघायला की कोणता 'मिस्ड-कॉल'तर नाहीये? चार 'स्पैम्स' आहेत. फर्नीचरचा प्रस्ताव आहे, फ्लैट्स विकले जाताहेत, एंटेलियाला जाण्याचं बक्षिस आहे, आणखीपण काहीतरी आहे. माहीत नाही कां, त्याला असं वाटंत होतं, की आन्काचा मैसेज नक्कीच असेल. मुलगी गप्प आहे. ठीक आहे, आम्हींपण गप्पच राहू.

त्याच्या शेजारी, जिवंत शेजा-याकडे लक्ष न देता, जोरजोरांत बकवास करते आहे, विचार करा, एक स्टूडेन्ट. ती कुणाला तरी जीव तोडून सांगतेय, की त्या दोघींच्या ओळखीच्या बाईवर विश्वास नको ठेवूं. तुमची इच्छा असो, किंवा नसो, ऐकावंच लागेल :

"तुला वेड लागलंय कां! तिच्यावर विश्वास ठेवण्याबद्दल विचारसुद्धां करू नकोस, ती सगळ्यांना फसवते! तिच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नको ठेवूं. तुलासुद्धा फसवेल! ती तशीच आहे! तुला माहीत नाहीये, आम्ही 'शिशिर-कैम्प'मधे "सत्य" हा खेळ खेळंत होतो. थोडक्यांत...कोणीतरी तिला एक संख्या म्हणायला सांगितली. थोडक्यांत म्हणजे, हे की किती खेळाडू होते. माहितीये, तिने काय म्हटलं? तेरा! हे तर विचित्रंच झालं. खुल्लमखुल्ला असं खोटं कां बोलावं? सगळे समजून गेले की ती खूप कमी सांगतेय. नाही, कोणा-कोणासाठी हे भयानक-भयानक आहे, मला वाटतं, पण आपण, आपण तर तिला ओळखतो, चांगल्या प्रकारे जाणतो. थोडक्यांत तिला कळून चुकलं, की तिच्या सांगण्यावर कोणीच विश्वास नाही केला. तिला लाज वाटली, की इतकं खोटं कां बोलली, की तिचं खोटेपण पकडलं गेलंय...तर, तुला काय वाटतंय, तिने असं कां केलं असावं? तिने आपली लबाडी कबूल केली?...असं कसं असू शकतं!...जर तिने स्वीकार केलं असतं, तर आम्हीं, कदाचित, तिच्या खोटेपणाला माफ केलं असतं, पण ती तर स्वतःला खरं सिद्ध करू लागली...जणु ब-याच दिवसांपासून चर्चमधे जात असावी...म्हणजे, लाजिरवाणं, एकदम लाजिरवाणं...विचार करूं शकतेस? तिच्यावर विश्वास ठेवायलाच नको. फसवेल."

कपितोनव उठतो आणि वाकडा होऊन पैसेजकडे, आणि पैसेजमधून दाराकडे जातो.


22.09


"येव्गेनी," मरीना कपितोनवची आपल्या नव-याशी ओळख़ करून देते, आणि कपितोनवशी आपल्या नव-याची : "थिओडोर ". आणि फुकटच्या शानने पुढे म्हणते : "अस्सल बेल्जियन."

"पण पुआरो (अगाथा क्रिस्टीने निर्माण केलेला डिटेक्टिव्ह – अनु.) नाही," थिओडोर बोटाने आपल्या नाकाखाली मिशांची अनुपस्थिती दर्शवतो.

कपितोनवला त्याच्या बोलण्यांत काही विशेष लकब नाही जाणवंत.

अस्सल बेल्जियन – धष्ट-पुष्ट, सावळा.

स्वर्गवासी मूखिनच्या एकदम विपरीत.

"माझी मम्मी – बल्गारियन होती आणि पापा ब्रूसेल्सचे."  

'नाटो'चं हेडक्वार्टर, कैबेज. लेस. बीयर'.

क्षणांत संदर्भ आठवतो.

कपितोनवला आपल्या आई-बापाबद्दल सांगायला हवं कां?

"थोडक्यांत रशियन," मरीना त्याचं म्हणणं पूर्ण करते.

"संक्षिप्त रशियन." थिओडोर 'री' ओढतो.

"तू कसा-काय संक्षिप्त असूं शकतोस?"

"तर मग कसं? तुमच्या लोकांपैकी कोणीतरी म्हटलं होतं : रुंद आहे रशियन माणूस, लहान करावा लागेल."

"मला वाटतं की तिथे होतं, 'अरुंद'."

"ते महत्वाचं नाहीये."

खोलींत गप्पा चालल्या आहेत.

"झेन्या10नेसुद्धां ब्यूस्टेमधे काम केलेलं आहे," मरीना नव-याला सांगते.

"ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्समधे," नवरा म्हणतो, कपितोनवला कळावं की त्याला बायकोचं म्हणणं कळतंय.

(ब्यूस्टेमधे, मूखिनबरोबर – हा अर्थसुद्धां निहित आहे.)

थिओडोर बल्गारियन रेड-वाईनची बाटली उघडंत (पाहुण्याने वोद्का घ्यायला नकार दिला होता) सांगायला सुरुवात करतो की तो काय काम करतो: तो काम करतो... पण कपितोनवला कळंत नाही की हे कोणचं क्षेत्र आहे : फूड-इण्डस्ट्री, मेडिसिन, PR? गोष्टीच्यामधे एक प्रश्न विचारून कपितोनवला कळलं की काहीही न विचारणंच चांगल आहे : अस्सल बेल्जियन बरीच पोहोचलेली वस्तू आहे. त्याचं काम दह्याच्या एका पेयाशी संबंधित होतं, ज्याचं बल्गारियाच्या डोंगराळ प्रदेशांत परंपरागत पद्धतीने उत्पादन केलं जायचं. ह्या प्रदेशांत मागच्याच्या मागच्या शतकांतसुद्धा खूप वर्ष जगणा-यांची संख्या बरीच होती. आपल्या काळांत मेडिसिनसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त करणा-या प्रोफेसर मेच्निकवने ह्यांत बरांच रस दाखवला होता – आपल्या अन्वेषण कार्याचे बरेच प्रयोग त्यांने पैरिसच्या पाश्चर इन्स्टिट्यूटमधे केले होते, जिथे त्यांचा अस्थि-कलश सुरक्षित आहे.

"भेटीप्रीत्यर्थ," मरीनाने प्याला उचलला.

जेव्हां थिओडोर सांगतोय, तेव्हां ती एका कोप-याकडे बघतेय, टेबलाच्या त्या भागाकडे जिथे स्टैण्डमधे नैपकिन्स ठेवलेयंत, आणि तिच्या चेह-यावर ताणलेल्या उत्सुकतेशिवाय आणखी कोणचा भाव नाहीये.

थिओडोर ची रशियन इतकी स्पष्ट आहे, की त्याच्या अ-रशियन होण्याचं गुपित उघड करतेय. पण, कदाचित कपितोनव स्वतःच आपल्या तीक्ष्ण नजरेची मखलाशी करतोय.

" योगूर्त11 (दही-अनु.) (दुस-या स्वरावर स्वराघातासहित, जे रशियन भाषेच्या नव्या नियमानुसार आहे आणि ऐतिहासिक दृष्टीने बरोबर आहे – ज्याचं शुद्ध उच्चारण थिओडोर ने आत्मसात् केलं होतं), ज्याचं उत्पादन पश्चिमेंत होत, अगदीच योगूर्त नाहीये. अगदी तसंच, जसं रशियामधे पश्चिमी टेक्नोलॉजी वापरून त्याला बनवतांत. आम्हांला हे विसरून नाही चालणार, की मेच्निकवने दुधाच्या जीवाणु आणि त्यांच्या फायद्याबद्दल काय लिहिलंय. मेच्निकवची रुची नैसर्गिक मृत्युच्या समस्येमधे होती. हे तेव्हां होतं, जेव्हां जीवनाने काठोकाठ भरलेल्या शरीरांत मृत्युची भीति कुंद होऊन जाते, आणि हे शक्य होतं व्यवस्थित आहारामुळे."

थिओडोर स्वतःच म्हणतो:

"आरोग्यासाठी."

कपितोनवला आश्चर्य होतंय, की त्याला हे कां कळंत नाहीये, की थिओडोर खरोखरंच गंभीर आहे, की इतक्या सफाईने विडम्बन लपवतोय.

अस्सल बेल्जियनला हे जाणण्याची उत्सुकता आहे की कपितोनवला पीटरबुर्ग आवडतंय कां?

"मी आत्तांच तर इथून गेलोय."

"हो. ते मला माहितीये. पण मला हे माहीत करायचंय, की तुम्हांला काही बदल दिसलेत का."

"आइसिकल्स12 कपितोनवच्यावतीने मरीना उत्तर देते.

"काय करणार, अशी थंडी आहे!" थिओडोर उद्गारतो. "तुम्हांला 'बोर' तर नाही वाटंत आहे? मॉस्को – सेंट पीटरबुर्ग नाहीये."

"टाइम नाहीये, नाहीतर शहरांत भटकलो असतो."

"निसरडं, निसरडं! सगळे पाय तोडून बसतात. आत्ता तात्याना इग्नात्येव्ना आपलं 'हिप-जॉइन्ट' तोडून बसलीय!"

कपितोनव नाही विचारंत, की ही तात्याना इग्नात्येव्ना कोण आहे. आणि मरीनापण नाही सांगत. मरीना त्याला कॉन्फ्रेन्सबद्दल सांगायचा आग्रह करते. कपितोनव थोडक्यांत सांगतो की ज्यांत त्याला भाग घ्यायचा आहे त्या कॉन्फ्रेन्सचा उद्देश्य, त्याच्या मते, काय आहे, पण तो कॉपरफील्डबद्दल विचारलेल्या थिओडोर च्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊं शकला – त्याला माहीत नाही की बरेंच दिवसांत कॉपरफील्डची काही बातमी कां नाहीये.

"तर मी स्वतःच तुम्हाला सांगेन."

तो सांगतो.

जर थिओडोर च्या म्हणण्यावर विश्वास ठेवला, तर संयुक्त राज्यांत जादूच्या करामातींचं पेटेन्ट केलं जातं, ह्या अनिवार्य अटीवर, की सात वर्षांनी त्यांच गूढ प्रकट केलं जाईल. हर्षोल्लासाचे दिवस गेले, आणि आता पेटेन्ट्स इंटरनेटवर ठेवलेले आहेत. थिओडोर ने इंग्रजींत त्यांना वाचलं आणि त्यांच अध्ययन केलं, आता त्याला सगळं माहीत आहे.

"पण, तो उडू कसा शकला?" मरीना विचारते. "तो खरोखरंच उडाला होता नं?"

थिओडोर खूप मजबूत, पातळ प्लास्टिकचे तार आणि विशेष प्रकाराने फिरत असलेल्या रिंग्सच्या साहाय्याने समजावतो. कपितोनवला कॉपरफील्डच्या गूढ रहस्यांत काही रस नाहीये.

"आणि तुम्हीं, म्हणजे, दोन अंकांची संख्या ओळखू शकता? मी एखादी संख्या मनांत धरूं कां?"

"प्लीज़," कपितोनव म्हणतो.

"हो, धरली."

"पण, फक्त दोन अंकांची!" मरीना मधेच टपकते.

"ज़ाइन्का, मला कळतंय."

"त्यांत बारा जोडा," कपितोनव म्हणतो.

"हो," थिओडोर उत्तर देतो.

"अकरा वजा करा."

"हो."

कपितोनव विचारमग्न झाला.

"एक तर माझी चूक तरी होतेय, किंवा – दहा."

"हो."

"दहा?"

"हो. हो."

"कुणी दहाचा अंक धरल्याचं मला आठवंत नाही. दोन अंकाची सगळ्यांत लहान संख्या."

"थिओडोर 'मिनिमलिस्ट' (कमीत कमी स्वीकार करणारा – अनु.) आहे," मरीना म्हणते.

"नाही, मी 'मिनिमलिस्ट' नाहीये. पुन्हां धरूं कां?"

"नाही," मरीना म्हणते.

"कां नाही? बिल्कुल धरू शकता," कपितोनव परवानगी देतो.

"नाही. पुरे झालं."

"पण कां?"

"कदाचित, दुस-यांदा होणार नाही..."

"बकवास, नक्कीच होईल. आणि जर नाहीसुद्धां झालं, तर काय होणारेय?"

"झेन्या," मरीना उत्तर देते, "माहितीये, मला लहानपणापासूनंच जादूगार कां नाही आवडंत? ते कित्तीतरी वस्तू वर फेकतात, त्याच्याशी माझं काही घेणं-देणं नाहीये. पण मला ह्या गोष्टीची वाट बघणं खूप अवघड वाटतं, की केव्हां कमीत कमी एकदातरी, कुणाच्या हातून चूक होईल."

"ठीक आहे," थिओडोर म्हणतो, "तुम्हीं जादुगार आहांत आणि मी डिबेटर. चला, वाद घालूं या, की जर तुम्हीं मला एक हजार रूबल्स द्याल, तर मी तुम्हांला पाच हजार रूबल्स देईन."

"मी आरामांत तुमच्यावर विश्वास ठेवतोय. वाद कशाला?"

"तुम्हांला खात्री आहे का, की जर तुम्हीं मला एक द्याल, तर मी तुम्हांला पाच हजार देईन?"

"पण तुम्हीं स्वतःच तसं सांगितलंय?"

"आणि तुम्हीं माझ्यावर विश्वास ठेवला?"

"पण, मी विश्वास कां करू नये?"

"थांबा. तुम्हांला असं म्हणायचंय का, की मी ईडियट आहे?"

"माझ्या सोन्या, झेन्याने असंतर नाही म्हटलंय."

"कोणाला कोणाशी वाद घालायचांय?" कपितोनव विचारतो, "तुम्हांला माझ्याशी, की मला तुमच्याशी?"

"तर, आपण वाद घालतोय? मला एक द्या, आणि पाच घेऊन घ्या."

"कितीवर वाद घालणार?"

"तुमची इच्छा असेल, तेवढ्यावर. एक रूबलवर."

"झेन्या आणि थिओडोर, थांबवा."

"हे राहिले तुमच्यासाठी एक हजार."

"थैन्क्यू. मी तुम्हांला पाच हजार नाही देऊ शकंत. म्हणजे, दिलगीर आहे की मी हरलोय. तुमच्या जिंकण्याची रक्कम घ्या." तो रूबल परंत देतो.

"हा लहान मुलांचा वाद गार्डनेरच्या "मैथेमेटिकल गेम्स" नावाच्या पुस्तकांत दिलेला आहे, मी सातव्या वर्गांत असताना वाचला होता."

"म्हणजे, तरीही तुम्हांला असं म्हणायचंय की मी ईडियट आहे."

"माझ्या सोन्या, झेन्याने असं नाही म्हटलं. त्याला पैसे परत दे."

थिओडोर हजार रूबल्स परंत द्यायचा प्रयत्न करतो, पण कपितोनवला परंत नाही घ्यायचेत.

"काही परंत-बिरंत नाही. मी जिंकलो, आणि मी प्रामाणिकपणे रूबल कमावलाय."

"वेडेपणा नको करू. हे राहिले तुमचे एक हजार. उचला. ही फक्त गम्मत होती."

"प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणाने," कपितोनव ताणून धरतो. "एक हजार आता तुमचे झालेंत, इथे गम्मत कसली आली?"

"हा वाद फक्त नमुन्याखातर होता."

"असं तर आपण ठरवलं नव्हतं."

"जेव्हां तुम्हांला माहीत होतं, की तुम्ही हारणार आहांत, तर वाद कशाला घालायचा?"

"पण मी तर जिंकलोय!"

"झेन्या," मरीना कडकपणे म्हणते, "जर तू पैसे परंत नाही घेतले तर मी रागावेन."

"खूप छान," एक हजार खिशांत ठेवंत कपितोनव पुटपुटतो. "माझ्याकडून माझी विजय हिसकावली जात आहे." तो रुबल टेबलवर ठेवतो.

"हो," रूबल उचलंत थिओडोर म्हणतो.

एक असहज शांतता पसरली.

"खरं सांगायचं झालं, तर मी ही ट्रिक विसरून गेलोय," कपितोनव म्हणतो, "बाइ- चान्स आठवली"

"ठीक आहे," थिओडोर उत्तर देतो. "एक 'जोक' चुटकुला ऐकणार कां?"

सांगितल्यावर, लगेच म्हणाला:

"आता मला क्षमा करा. तुम्हांला भेटून आनंद झाला. मला लवकर उठायचंय. आमच्या घरीच थांबून जा, हॉटेलची काय गरंज आहे?"

थिओडोर खोलीतून निघून जातो, कपितोनव घड्याळीकडे बघतो.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract