Namita Dhiraj Tandel

Romance

3  

Namita Dhiraj Tandel

Romance

जादूची झप्पी

जादूची झप्पी

3 mins
202


मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अमित मॅनेजरच्या पदावर कार्यरत होता.. रोज सकाळी घरातून निघाला की, रात्री थकून घरी यायचा.. ट्रेनचा प्रथम वर्गाचा पास होता. तरीसुद्धा त्याला कधी कधी उभं राहून यावं लागायचं.. वाढती गर्दी अन् प्रचंड धक्काबुक्की मुळे त्याला खुप त्रास व्हायचा.. घरी आल्यानंतर त्याच एक वाक्य ठरलेलं असायचं.." कामाचा त्रास नाही तेवढा प्रवासाचा त्रास..." हे ऐकून अस्मिताला खूप वाईट वाटायचं..


अमितच्या ऑफीसमध्ये सगळ्यांचं सणांचा जल्लोष असायचा.. नेहमी तो ऑफीस मधील गोष्टी घरी येऊन अस्मिताला सांगायचा.. तो बोलत राहायचा अन् ती ऐकत राहायची.. त्याच्या गोष्टी ऐकण्यात ती जणू रंगुन जायची.. कारण तिच्या समोर मन मोकळं करून जाताना त्याचा सगळा त्राण निघुन जायचा.. हे तिला ठाऊक होतं....


सुंदर, शांत स्वभावाची सुशिक्षित अशा अस्मिताने मुलगी झाल्या नंतर पंधरा वर्ष काम केलेल्या नोकरीचा निरोप घेतला.. एक उत्तम गृहिणीची चोख भुमिका ती बजाऊ लागली..


व्हॅलेंटाइन आठवड्याला सुरुवात झाली होती.. एका संध्याकाळी तो ऑफीसमधुन आला अन् सोफ्यावर बसला.. अस्मिताने थंड पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत विचारणा केली.."काय मग? आज ऑफीसमध्ये काय खास?" नेहमीप्रमाणे ऑफीसमधील सेलिब्रेशन विषयी तो अस्मिताला सांगू लागला.. त्याचे पाणी पिऊन झाल्यानंतर तिने त्याला मिठी मारली..."हॅप्पी हग डे डिअर "असं म्हणत किचनमध्ये निघुन गेली...


तिने दिलेल्या मिठीमुळे अमितला अंतर मनातून काही आवाज ऐकू येऊ लागले.. प्रत्येक सणाचे सेलिब्रेशन आपण बाहेरच्या जगात जास्त साजरे करतो.. ऑफिसच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो... सोशल मीडियावर नातेवाईक अन् मित्र परिवाराला मेसेज करत राहतो.. पण घरात आपली काळजी अन् प्रेम करणाऱ्या माणसांना शुभेच्छा द्यायला विसरतो... त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हात मिळवून जवळ घेतो तेवढंच..


मंदिरातील गाभाऱ्यात अचानक होणाऱ्या घंटानादाने तेथील शांतता दुभंगते.. परंतु सकारात्मक ऊर्जा देखील तेवढीच तिकडे निर्माण होते.. अगदी त्या दिवशी तसंच घडलं.. तिच्या गाभाऱ्या सारख्या शांत मनाचा त्याला आज अंदाज लागला होता.. तिने मारलेल्या मिठीमुळे घंटा नाद प्रमाणे त्याचे मन भंगले. शिवाय शुभेच्छा ऐकून त्याच्या मनाकडे तिच्या विषयीची एक वेगळीच छबी निर्माण झाली...


तो उठून सरळ किचनमध्ये गेला... तिला मिठीत घेत म्हणाला, "आज तू दिलेली गोड मिठी मला खूप काही शिकवून गेली... एवढी वर्ष का असं गप्प राहून फक्त माझंच ऐकत राहायची.."


"लहान सहान गोष्टी प्रेमाच्या अश्याच असतात.." असं लाजत म्हणत ती चारोळी बोलू लागली...


माझे खळखळून हसणे अन् बोलणे,

तुला खूप आवडते हे मला सुद्धा माहिती आहे..

पण तुझा प्रवासाचा त्रास बघताना,

माझे हसु मी ओठाखाली दाबते अरे..


प्रेम व्यक्त करत तो सुद्धा बोलून गेला.. "प्रेमाच्या लहान सहान गोष्टी अश्याच असतात.. असं म्हणत त्यानेही चारोळी बोलून दाखवली...


माझ्यावर तू प्रेम खूप करतेस,

हे मला सुद्धा माहिती आहे..

पण मी शब्दामध्ये व्यक्त करत राहतो,

अन् तू अबोल राहुनी अगं.....


काही लोक मोबाईल हातात पकडून दुसऱ्यांशी व्यक्त होण्यात वेळ घालवत असतात.. परंतु घरातील आपल्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायला विसरून जातात.. किंवा व्हॉट्स ॲपवरच शुभेच्छा देऊन पार होतात.. कारण ते आपल्या डोळ्यांदेखत असतात.. मग ती बायको असो की मग नवरा.. मुलगा असो वा मुलगी.. आई असो की मग वडील.. त्यांच्याशी देखील व्यक्त होणं महत्वाचं आहे... दोन शब्द प्रेमाचे बोलल्याने आपल्या प्रियजनांना देखील बरं वाटते.. शिवाय आदर निर्माण होतो... नाहीतर मग बोललं जातं... ते काय अख्खा दिवस मोबाईलवर असतात.. त्यांना कुठे आमच्यासाठी वेळ.............


#Lovelanguage



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance