Sanjay Raghunath Sonawane

Others

3.5  

Sanjay Raghunath Sonawane

Others

जगा आणि जगवा

जगा आणि जगवा

2 mins
115


मी एका गुजराथी दुकानदाराकडे शर्टासाठी कापड विकत घेण्यासाठी गेलो होतो.ते कापड मी विकत घेतले व तो नंतर म्हणाला, "आता आम्ही कपडेपण उत्तम शिवून देतो."खूप छान कपडे शिवतो आम्ही!"मी म्हणालो नको.

त्यावरतो म्हणाला काही चहा,थंडा घेताय का?"

मी म्हणालो चहा घरूनच पिऊन आलोय. "बाकी कसे मजेत आहात ना?"मी म्हणालो,"सर्व ठिक आहे."


    मी त्या गुजराथी दुकानदाराला प्रश्न केला की "तुमच्याकडे तर शिलाई मशिन दिसत नाही, मग कपडे कोण शिवतो?"त्यावर तो गुजराथी दुकानदार म्हणाला आमचा गाववाला टेलर आहे अजून आमचा एक नातेवाईक टेलर आहे.ते बिचारे गरीब आहे. तसेच ते वयवृद्ध झालेले आहेत. आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना काम देतो. त्यातून त्याना दोन पैसे मिळतात. त्यावर त्यांचे जगणे होते. उपासमार टळते. त्यांच्या अनुभवातून व ऐकण्यातून असे समजले होते की त्यांच्यात एखादा बेरोजगार तरूण असेल तर त्यांच्याच दुकानात कामाला ठेवतात. त्यांचे भाऊ, गाववाले यांना ते रोजगार देतात. त्यांच्यात धंदा करणारे तरूण असतील तर त्यांना धंद्यासाठी आर्थिक मदत करतात. बिनव्याजी पन्नास लाखापर्यंत मदत करतात. धंद्यासाठी गाळा उपलब्ध करून देतात. त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की त्याने घेतलेले पन्नास लाख विश्वासाने परत करतात. ते धोका देत नाहीत. अशाप्रकारे मोठ मोठे ज्वेलर्स, दुकानदार त्यांच्या समाजातील लोकांना धंदा, नोकरी उपलब्ध करून देतात.


शेअर्स नफा, विमा पॉलिसी बहुतेक ते आपल्या समाजातीलच लोकांना देतात. या तत्त्वावर संपूर्ण भारतात व विदेशातही गुजराथी, मारवाडी समाज जगात पसरला आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आज तो समाज वर्षानुवर्षे टिकून आहे. घर घेण्याअगोदर ते जगण्याचे साधन शोधतात. गाळा, दुकान भाड्याने घेतात. त्यात ज्वेलर्स दुकान सुरु करून इतर ठिकाणी दुकाने, गाळे, बंगले विकत घेतात. आपण एखादे घर विकत घेतो व आयुष्यभर त्याचे हप्ते फेडतो. धंदा करण्याची नकारात्मकता, आळस, व्यसनाधीनता यामुळे आपण विकासापासून वंचित राहतो. धंदा करण्याची लाज वाटू लागते. नोकरीचा गुलाम बनून चाकोरीबद्ध जीवन जगतो.


त्यांचे वैशिष्ट म्हणजे समाज समाजाला जगवितो, जागरूक करतो, संघटित करतो, सहकारी वृत्ती ठेवतो. गुजराथी माणूस त्यांच्या राज्यातील वस्तूंची अप्रत्यक्ष जाहिरात करत आहे. गुजरातची वस्तू, दूध व दुग्धजन्य वस्तू किती चांगल्या आहेत हे ते पटवून सांगतो. गुजरातचा माल जास्तीत जास्त विकतो. गुजरातचा माल गुजराथी माणूस त्यांच्या दुकानात ठेवतो. मराठी माणूस त्यांचा हक्काचा ग्राहक बनला आहे. तो हमखास गुजराथी माणसाच्या दुकानात जाऊन त्याचा माल खरेदी करतो. त्याला मोठे करतो. पण आपल्या महाराष्ट्रातील वस्तू आपण विकत घेतल्या पाहिजेत. मराठी दुकानदारांनी, उद्योजकांनी मराठी माणसालाच काम द्यावे, धंदा द्यावा. समाजाने समाजाला जगवा. महाराष्ट्राने महाराष्ट्राला जगवा. त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारी टळेल. उपासमार टळेल.जगण्याला आधार होइल. आत्महत्या थांबतील. रोजगारामुळे तरूणांचे वैवाहिक जीवन सुखी समृद्ध होईल.


Rate this content
Log in