Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

जीवनात घडलेल्या सुखद आठवणी..

जीवनात घडलेल्या सुखद आठवणी..

4 mins
336


जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवणी आहेत. प्रत्येक आठवणीला एक वय..आठवणचं तर असते मनातली साठवण...

मनातल्या विचारांचा, गुंफलेल्या भावनांचा,  सुख दुःखाच्या संगमाचा अल्लड हास्याचा..आठवणच आभास देते...

आपल्या आयुष्यात पहिल्या गोष्टीला खूप महत्त्व असतं त्या विषयी खूप काही आठवणी पण असतात..त्या आठवणी असतात सुगंधापरी  हृदयात जपण्यासाठी सुख-दुःखाच्या रिमझिम पावसात  कधी भिजण्यासाठी...


कोणीही कुणाला आयुष्याची सोबत देऊ शकत नाही.. कारण जगणे मरणे हे आपण बदलू शकत नाही आयुष्याची सोबत नाही पण अनमोल आठवणी हृदयात राहतात त्याच आठवणी जीवन सुंदर बनून जातात. अशाच आठवणीचे ठसे मनात कोरले जातात   संध्याकाळ काल जरा जास्तच रेंगाळली. तिलाही कळलं मला जीवनात घडलेल्या पहिल्या सुखद गोष्टींची आठवण आली... 


 पहिली मैत्रीण...  


थोडेसे माझ्या मनातून माझ्या लाडक्या मैत्रिणीसाठी..  


तशी ती स्वभावाने अबोलच स्वतःमध्ये रमणारी सांगण्यासारखं खूप असायचं तिच्याकडे पण डोळ्यातूनच बोलणारी....

 मी अगदीच विरुद्ध सतत बडबड करणारी ...तिला चिडवल्याशिवाय मला तरी कुठे चैन पडायची मग तिला त्रास द्यायसाठी माझी मिमिक्री असायची कारण 

ती माझी लाडकी मैत्रिण असायची  


 माझी तिच्या सोबतची मैत्री म्हणजे चिमण्यांचा चिवचिवाट गजबजलेली पहाट  अथांग सागराची लाट जणू

तिच्या कानाजवळ सतत कुजबूज  करणारा माझा आवाज... पण...ती  हजारोंच्या गर्दीत ओळख घायची.. चेष्टा केली तरी  

पटकन हसून द्यायची... मग तिची कळी खुललेली पाहून माझी मुद्राही खुलायची ..गोड गोड संवाद होता

तिच्या प्रेमळ शब्दात...तश्याच गोड तक्रारी असायच्या मी केलेल्या प्रेमळ भांडणात..खूप छान वाटायचं तिच्या त्या सहवासात....  

अश्या खूप गोष्टी ..


काही व्यक्तींशी झालेली आपुलकी ही  काही वेगळीच असते त्या व्यक्तीशी साधलेले संवाद आणि भेटीगाठी आपल्या सुंदर आठवणी बनलेल्या असतात... मैत्रिणी सोबत पहिल्यांदाच मिळालेल्या या सुंदरशा आठवणी पुरेशा वाटतात..जीवनातला एक एक क्षण मनसोक्त जगायला...


पहिला पाऊस .... सृष्टी जितकी रम्य सुंदर आणि मोहक आहे, तितकीच तिची जादू ही विलक्षण आहे.. अनेक वेड लावणार्‍या गोष्टी या सृष्टीत घडत असतात.. अशीच वेड लावणारी एक गोष्ट म्हणजे पाऊस... पहिला पाऊस ...


 पाऊस रणरणत्या उन्हात

 सृष्टीत सौंदर्य निर्माण करणारा 

तप्त पृथ्वीला शांत करणारा 

धरतीवर हिरवं चैतन्य फुलवणारा...

मनाला शांतता, आनंद आणि उत्साह देणारा...

 मृगाचा पहिला पाऊस असा काही जमिनीत भिनतो की ओल्या मातीचा गंध मनाला धुंद करतो

 पहिला पाऊस असा रिमझिमत येणारा थेंबाथेंबाने टपटपणारा असतो... आणि मग नंतर मात्र पावसाची मालिकाच सुरू होते...मग..


आषाढा मागे धावत धावत येतो हा श्रावण 

ओल्या ओल्या गार मातीला हिरवा शालू देतो हा श्रावण....

 अशा श्रावणात जगण्याच्या वाटेवर आयुष्यभराची साथ देणारा जिवलग भेटून जात असेल.... तर......

 हा श्रावण नक्कीच वाटून जातो प्राणसखा....

 श्रावणाच्या साक्षीने त्याच माझ्या जीवनात येण आणि अवघ जीवनच बदलून जाणं..

 योगायोगाने आमचं लग्न पक्क होणं..

सहजीवनात वाढली मग गोडी

देवानेच ठरवली आमची जोडी...

 दरवर्षीच येणारा श्रावण जगणे पुन्हा पुन्हा नवे करून जातो त्याच्या आणि माझ्या झोळीत टाकून जातो कितीतरी पावित्र्य मांगल्यात हरवलेले क्षण 

 कितीतरी साजशृंगाराचे तारुण्याचे उधाणलेपण...

 ऊन सावलीच्या खेळात रमलेले,आम्ही सोबत जगलेले ते अविस्मरणीय क्षण...

 आज हा पाऊस अनुभवताना आठवतात त्या सार्‍या आठवणी जा साचलेल्या आहे मनाच्या कप्प्यात..

 कप्पा कप्पा उघडत मनाचा अंगणात उतरत जातो हा श्रावण... पाऊस... हळूच त्या स्मृतीत शिरूनी मी शोधू पाहते माझे ते मंतरलेले दिवस... 

 प्रत्येक पाऊस काहीतरी वेगळेपण घेऊन येतो... पावसाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात 

बालकवींच्या शब्दात सांगायचे झाले तर

 "आनंदी आनंद गडे

 जिकडे तिकडे चोहीकडे "असेच म्हणावे लागेल....


 पहिली शिकवण..


 सगळ्या विश्वातील पवित्रता, सर्व विश्वातील नैतिकता नैतिक मूल्य आईजवळच उगम पावतात... बालपणीच्या संस्कारातून निकोप मनाची जडण घडण होते..तसे कुटुंबाची यात महत्वाचा भूमिका असते ...पण

 आईच आपल्याला बोबडे बोल शिकवते.. चांगले बोलणे चांगल्या गोष्टी करणे रचनात्मक कार्य करणे इत्यादी सद्गुण आपल्याला आईच्या शिकवणीतून प्राप्त होते. 

 आईच्या उपदेशातून मनाची जडणघडण होते... 


 माझी आई तशी सर्वसामान्य पण नैतिकता, नीतिमूल्ये जपून माझ्या मनाची जडण-घडण करणारी

 सार्थक दर्जाचे संस्कार व्हावे म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून भरपूर ज्ञान देणारी...  


"माणसान आयुष्यात काही व्हायच असेल तर परिस व्हावं जिथे जावं त्या संधीचं सोनं करून यावं... ही म्हटलेली बाब आवर्जून सांगणारी...  आयुष्य चांगल्या पद्धतीने कसे जगता येईल याची नवीन परिभाषा शिकवणारी.... मायेचा उबदार स्पर्श नेहमीच देऊन  आश्वासक आधार देऊन जीवनाच्या वाटेवर न डगमगता न घाबरता योग्य गती घेऊन पुढे चालण्याची शिकवण देणारी माझी आई...

आज... बेधुंद त्या क्षणांना घालीत साद आली. आरक्त भावनांचा लेवून साज गेली जेव्हा आईने शिकवलेल्या पहिल्या शिकवणीची आणि आयुष्यभर दिलेल्या धड्याची आठवण मज आली...


 आपण आयुष्यभर सतत काही ना काही शिकत असतो

 आपल्या जीवनात आपल्याला अनेक असे सुखद दुःखत अनुभव येतात आणि ते अनुभवच आपल्याला काहीतरी शिकवून जातात... पण "पहिली शिकवण"  मला माझ्या कुटुंबातूनच मिळाली... असे म्हटले तर काही हरकत नाही...  


आपल्या आयुष्यात असे अनेक पहिल्यांदा झालेले प्रसंग येतात आणि ते खरचं अविस्मरणीय असतात

 माझ्या बाबतीत आणखी सांगायचे झाले तर

 माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर, शिकवणी वर्गातून माझ्या विद्यार्थ्याने माझ्या हातावर ठेवलेली माझी पहिली कमाई ... माझ्या ओठांवर अलगद स्मित हास्य फुलवणारी..


पुढे काही दिवसानंतर संधी मिळाली खासगी शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होण्याबाबत... शिक्षणाचे कुठेतरी सार्थक होईल ही आनंदाची बाब.... व्यवस्थित रित्या व नियोजन पूर्व कार्य केल्यानंतर मुख्याध्यापिकेने दिलेला महिन्याचा पहिला पगार.... अशा कितीतरी गोष्टी याचा आनंद काही वेगळाच असतो...

 नवा आनंद व आनंदाचे समाधान म्हणून

 चेहऱ्यावर फुललेलं हास्य...

 सभोवताली घेतलेली एक गिरकी...

 आयुष्यात निरंतर राहावेसे वाटतात हे सुखद अनुभव आणि पहिले क्षण... पहिले दिवस...

 या आठवणी तर नेहमी साद घालतात

 आपल्याला आपल्याच मनातून... अशा खूप काही गोष्टी जीवनात घडतात पण पहिल्या गोष्टी पासून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो ना...

 मना मनाच्या छेडूनी तारा गीत गावे रोज नवे. धुक्याचा पडदा भेदून सोन किरण निघावे रोज नवे.. 


असाच काहीसा अलौकिक आनंद असतो त्या क्षणी.. आपल्याला तो मिळतो...  पहिल्या झालेल्या त्या सुखद प्रसंगात...  


Rate this content
Log in