Sagar Bhalekar

Others

4.5  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - आनंद

माझी छोटीशी डायरी - आनंद

1 min
285


माझी छोटीशी डायरी - आनंद 

दिनांक - २२ जून २०२१ 

माझी प्रिय डायरी,

            आज सकाळी मी मानसशास्त्रावर आधारित एक आर्टिकल वाचल. त्यामधली खूप काही गोष्टी चांगल्या वाटल्या. मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण स्वतः ध्यान करण्यास सुरुवात करतो तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी चांगलं वाटत. आपण खरंच खूप सुंदर दिसायला लागतो. आपल्या आसपासच वातावरण सुद्धा खूप चांगलं वाटू लागत. आणि मुख्य म्हणजे आपण स्वतः आनंदी असतो.

म्हण्याचा अर्थ असा आहे कि, कोणत्याही कामाला आपण सुरुवात करायची असेल तर ती आपणापासूनच होते. आणि मला सुद्धा ते बरोबर वाटते.मी आपल्या खाजगी आयुष्यामधून हे जाणले, आपण आपली काळजी घेणं किती आवश्यक आहे, जे आपल्याला एक आनंदी आयुष्य जगण्यास मदत करते. 

ह्या वर्षांपासून मी दोन अश्या गोष्टी करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे मला खूप आनंद मिळेल. त्याचबरोबर आतमविश्वास सुद्धा माझ्या अंगी संचारलेला आहे.

सगळ्यात पहिले म्हणजे मी परत लिहायला चालू केलं, स्टोरीमिररच्या माध्यमामुळे मी आज माझ्या मनातल्या गोष्टी मी सांग शकतो. दुसरं म्हणजे मी "मॉर्निंग वॉक" चालू केलं.

सकाळच्या ताज्या हवेने मन एकदम प्रसन्न होऊन जाते. मॉर्निंग वॉक करत असताना मी माझ्या आवडीचे गाणे ऐकू लागलो. तस पण मूड आनंदी राहण्यासाठी गाणी ऐकणे हाच एक उत्तम उपाय आहे. कधी कधी फिरताना मनात एखादा विचार किंवा कविता आली तर मी ती माझ्या डायरी मध्ये उतरवतो. 

तसं पण बोल जात, आयुष्यामध्ये बदल हेच जीवन आहे. 


Rate this content
Log in