Anjali Bhalshankar

Abstract Action Classics

2  

Anjali Bhalshankar

Abstract Action Classics

माझी प्राथमिक शाळा नी पावसाळा.

माझी प्राथमिक शाळा नी पावसाळा.

6 mins
69


शाळेभोवती तळे साचुन सुट्टी मिळेल का ?नी सांग सांग भोलानाथ ऐकायला वगैरे ठीक आहे,.पंरतु शालेय जीवनात मला ते मुळीच पटायचे नाही आजही नाही पटत. कारण शाळेभोवती साचलेल्या तळयाची गंमत शब्दात वर्णन नाही करता येणार ती एक ऊतुंग, निरागस, निखळ, अनुभुती आहे प्रत्यक्षात जगायची असते.खरेतर माझ्या अगदी शाळेसमोर कधीही तळे साचायचेच, नाही बादशाही होटेलच्या बोळात असलेली गोपाल गायन समाजाची इमारत जी आजही तशीच ऊभी आहे जशी तीस बत्तीस वर्षापुर्वी होती.त्याला लागुनच तिरप्या रेषेत असलेला व पुढे अगदी टिळक स्मारक च्या गेटपर्यंत जाऊन भिडलेला पंडित हाॅल म्हणजे आमची शाळा क्रमांक तेहतीस मुलींची. पहिली ते चौथी.असा बोर्ड ऑफीस कम टिचर्स रूम कम टॉयलेट कडे जाणारा मार्ग व तिथेच टेबल खुर्ची मांडलेली ज्या खुर्चीत क्वचित बसत असलेल्या,सर्व वेळ वर्गावरच शिकविणाऱ्या मुख्याध्यापिका बांईच्या पाठमोरा असलेला निळ्या गडद रंगावरची ती पांढरी अक्षर कोवळ्या बालवयात तीतकीच ठळकपणे मनावर ऊमटली जशी ,शाळा, बाई,वर्ग ,मैत्रिणी सारचं,चित्र अगदी कालपरवाच होते कि, मी! शाळेत तशा एकेक घटना,प्रसंग बालपण ह्रदय पटलावर नव्यान रेखाटलं .माझ्या शाळेला ना मैदान ना टेरेस ,पत्र्याचे छत ऊंच भिंतीच्या मोठाल्या खोल्या जसे आगगाडीचे डबे एकमेकांना जोडलेले.पावसाळ्यात बरेचदा छतावरील, पत्र्यातुन पाणी टिपकायचे मग मधला दरवाजा ऊघडुन सर्व म्हणजे, पहीली ते चौथी वर्ग एकत्र करून सर्व शिक्षिका आमच्यासोबत गाणी, खेळ, व गाण्यावर ताल धरायच्या अगदीच पाऊस भरून आला असेल तर मात्र लवकर घरी सोडत.मोठ्या पावसाचं वातावरण आहे आभाळ भरुन आलयं तुम्ही नीट रांगेत वर्गाबाहेर पडा,या वाक्याने सुरू झालेल्या सुचनांचा पाढा,एकमेकांचे हात धरा, जोडीजोडीने बाहेर पडा,.साचलेल्या पाणयातुन चालु नका,सरळ रस्त्याने जा, एस पी तुन अजिबात जायचे नाही, चिखल झाला असेल मैदानावर घसरून पडाल इत्यादी इत्यादी.. ...बाई सुचना देत वर्गाबाहेरील व्हरांड्यात आलेल्या असतात पंरतु तोवर ऐकायला कोण? नी मागे वळुन पहातय कोण?आम्ही तर तो कोपरा गाठलेला जिथं छोटीशी खिडकी आहे ज्या भोवती घुमटाकार ऊंच गोलाकार भिंती ज्याच्या आत एक कबरीचा चौथरा आहे.त्या खिडकीतुन आत पाहुन त्या चौथरयाला नमस्कार करायचा,खिडकीच्या कठड्यावर साचलेला अगरबत्तीच्या सुगंधी राखेतुन थोडी थोडी उचलून गळ्याला लावुन वर जीभेवरही ठेवायची खायची म्हणा ना सरळ ज्याला ऊदी म्हणायचो आम्ही ती जास्तीत जास्त आपल्याला मिळावी यासाठी चढाओढ नी झुंबड आज ही तो छोटा दर्गा वजा चौथरयाचा गोल तसाच आहे आजही तिथुन जाताना मी कधीमधी खिडकीतून डोकावते मनाशीच हसते कीती भाबडे असतो लहाणपणी आपणं मात्र वय वाढत जात नी भाबडेपणा लुप्त होऊन कृत्रिम जगतो आपण.असा विचार करून पुन्हा तो दरवाजा शोधते, जिथुन आत जाऊन जाऊन कोणीतरी त्यावर दररोज ताजी फुलं व सुवासिक अगरबत्ती लावायचे, चौथरयाचा परीसर स्वच्छ लखलखित असायचा त्यावरील चादर कधी हिरवि गुलाबी सोनेरी अशी बदललेली दिसायची आतमध्ये जायचा मार्ग खिडकीच्या टप्प्यातून कदाचित दिसत नसावा आमच्या वय व ऊंचीची अडकाठी असावी.सहासात वर्षाच वय, देव जादुने करत असेल सगळ.आत जायला रस्ता नाही खिडकीचे गज इतके घटट व मजबुत आहेत त्यातुन कोणिही आत जाऊ नाही शकणार मग कोण ?करतयं हे सारेच त्या चौथरयातील, देवाचा वास्ता व शपथा आमच्या प्रत्येक गोष्टीत अगदी शाळा बुडवावी म्हणुन सुद्धा!!मग काय बारा ते पाच इतका मोठा वेळ मात्र सगळ ठरलेल आदल्याच दिवशी!!लोकमान्य नगर मधील म्हाडाच्या इमारती च्या भोवतालच्या झाडांची फुले तोडणे ,किंवा मग ज्याला पुर्वी हौसिग बोर्ड म्हणतं जिथे आता जोगरस पार्क ऊभा आहे, तिथल्या लाल मातीत खेळणे,वा भोवतालच्या ऊंच लाल कोंबड्यांच्या ((कोंबड्याच्या तुरयासारख्या लाल रंग व आकाराची फुल असलयाने त्याला कोबडयाचे झाड म्हणायचे))) मोठमोठ्या झांडाच्या सावलीत बसुन खाली पडलेल्या शेंगा जमवुन चिकट असलेल्या त्या शेंगाचा दगडाने ठेचून एकजीव लगदा करायचा व चेंडूच्या आकाराचे गोल बनवायचे ते इतके मजबुत असायचे की डोक्यात चुकुन जरा जोरात मारले तर मेंदुला झिणझिण्या येतील मात्र आम्ही बिनधास्त भांडणात एकमेकांना फेकुन मारायचो.मग एस पी कॉलेज च्या मैदानाभोवती,असलेल्या मोठाल्या आंब्याच्या झाडाच्या कैर्‍या पाडायला मधल्या सुट्टीत जाणे असो, शाळेला दांडी मारून तिथ खेळत असलेले मोठ्या मुलांचे क्रिकेट फूटबॉल, टेनिसचे सामणे पहाणे असो अर्थात आताच्या इतके भरगच्च नसायचे पुर्वी मैदान सामसूम असायचं चारी बांजूनी कुंपण वगैरे असलं काहीही नव्हत संपुर्ण मोळळया परिसरातून आमच्या वस्तीचे दर्शन व्हायचे शाळा नी घर यामध्ये एस पी चे मैदानच आता मात्र फार दुर गेलंय असो पलीकडे टेनिसचे ग्राऊंड व त्याला लागुन सरळ कॉलेजच्या मुख्य इमारत व स्विमिंग पूल कडे जाणार्या रस्त्यावरील एका छोट्या गल्लीतून जाणारा रस्ता सरळ आमच्या शाळेजवळ संपायचा.याच मुख्य रस्त्यावर मुंलांच्या वसतिगृहाच्या फाटकासमोर मोठा गोल कटटा होता त्यावर बसुन कधी मधी मधल्या सूटटीत डबा खायला यायचो आम्ही त्या गोलाकार कठड्यावर गोल बसुन डबा खाता खाता बाजुलाच असलेल्या बकुळीच्या पानाफुंलाचा सडा पडायचा चारदोन फूल डब्यातही पडायची मधुनच एखादी खारूताई सरसर झाडावरून खाली यायची मग डब्यातला इवलासा घास घेऊन झाडावर जाऊन आपल्या सवंगडयांना घेऊन यायची मग काय खाऊ देऊन त्यांची, मस्ती पाहण्यात,खेळण्यात, व सदाफुलीची फुल वेचण्यात मधली सुटटी होऊन केव्हाच बाईंनी शिकवायला सुरवात केलीय हे हा निरोप घेऊन एखाद कार्ट यायच नी आम्ही भानावर यायचो.लगबगीने बाजूच्या पाण्याच्या टाकीवर खरकटे डबे व मातीने भरलेले हात धुवायला झुंबड उडायची.मग त्या वस्ती गृहाच्या मोठ्या दादानांही आमच्या नळावरील आक्रमणाने अंगावर घाण पाणि ऊडु नये महणुन झटक्यात दुर जावे लागे. परंतु त्याची फिकीर कोणाला आहे.? बांईचा मार खावा लागणार ती भीती वेगळीच .लगबगीने वर्गात धावत पळत पोहोचल्यावर बांईचा मुड ठीक असेल तर बर नाहीतर दोन्ही हातांवर छड्या ठरलेल्या कधी रोज तर कधी, दोन चार दिवसांनी कारण दुसर्या दिवशीचा डबा निमुट वर्गात बसुन रिचवावा लागे.डबयावरून आठवलं बादशाहीच्या दिशेने येणारा साबारांचा खमंग सुवास कधी कधी जबरदस्त भुक वाढवायचा.नी बाईंची नजर चूकवुन डबा मधल्या सुट्टीच्या अगोदरच संपायचा.आजही तेथुन जाताना बादशाही होटेलची ती खिडकी जी बरोबर आमच्या वर्गातून दिसायची त्याकडे व माझ्या वर्गाकडे जिथे आता कपडयाची वा फर्निचर की काय तत्सम दुकाने आहेत पाहील की .वाटत पुन्हा शाळा जिवंत व्हावी, पुन्हा त्या वर्गात बसावं, या व्हरांड्यात जिथ ऊभं राहुन चार वर्ष स्वतंत्र दिन, व प्रजासत्ताक दिनानिमित्त, झेंडावंदन गीत गायले.तो नवा कोरा गणवेश मैदान नसल्याने जोडीजोडीने हातात हात घालुन आगगाडीच्या डब्यांप्रमाणे, मागोमाग लावलेली रांग. जे शिस्त पाळेल त्याला जास्त खाऊ मिळेल. असे बांईनी दिलेल आमीश नि पाच बिस्कीट असलेल्या छोट्या पार्लेच्या पुडयाच नी,चार चार मोसंबीच्या गोळयांच तर, कधी ऐकेक बंदीच्या लाडवाचं भलतच अप्रूप जे शेजारच्याच गोपाल गायन समाजाच्या इमारतीत रहाणारया आजोबांकडून मिळायचे.ज्यांना आम्ही खुप त्रास देतो,गोंधळ करतो, ते गाण्याची साधना करतात. त्यात आमच्या बेशिस्त आरडाओरडीने, त्रास होतो. व्यत्यय येतो. असे भाषण वजा सुचना ते दरवर्षी झेंडावंदनाच्या कार्यक्रमात द्यायचे नी आम्ही आता पुन्हा त्रास देणार नाही, गोंगाट करणार नाही, शहाणी मुल आहोत, वगैरे वगैरे वदवुन घ्यायचे.त्या दिवसापुरते आम्ही शहाणे झालेलो असायचो बऱ्यापैकी कारण त्यांनी दिलेल्या इतकया मोठठया खाऊच्या बदलयात इतकं तर करावेच लागायचे मात्र एकच दोन दिवसच! आमचा शहाणपणा टिकायचा तीसरया दिवशी पहीले पाढे पंचावन्न.पहा शाळा नी पावसाळा लिहीताना प्रस्तावनाच प्रकरण होऊन बसले की काय?तर काय सांगत होते मी बांईच्या सुचनांना ढगांची वाट दाखवत आम्ही मनसोक्त भिजत मग ते दफ्तर असो ,गणवेश असो फिकीर नाही वर्गात आधिच बनवुन ठेवलेल्या छोट्या छोट्या होड्या लगबनीने बाहेर येत नी रस्त्यावर साठलेल्या पानथळात सोडलया जात त्या होडयांचा पाठलाग करण्यातला आनंद केवळ अविस्मरणीय!मन भरल की चोथरया पासुन एस पी कडे वळायचे कधी एकदा मैदान येतय नी चिखलातुन चालतोय असे होऊन जाई .एका हातात दप्तर व दुसर्या हातात चपला सांभाळत बाजुला असलेल्या डांबरी व पावसामुळे लख्ख स्वच्छ झालेल्या रस्त्याच्या नाकावर टिच्चून चिखलाने लदबद निसरट झालेल्या जागोजागी खड्डयात पाणी साचलेल्या मैदानातुन वाट काढायची ऐकमेंकावर चिखलाचे पाणि ऊडवणे, चिखलाचे गोळे करून मारणे, मुददाम निसरड पाहुन धकका मारणे या गोष्टी म्हणजे पावसाळ्यात हककाने करायचा जगणयाचा व जबाबदारीचा हिस्सा होता आमचा असे हे प्राथमिक शाळेचे चार वर्ष जी आयुष्यात पुन्हा कधीही नाही मिळाली खरोखर काळ सर्वात बलशाली त्याला परत आणणे अशक्यच मात्र तो नव्याने अनुभवणे मात्र शक्य आहे म्हणुनच मी अधुनमधुन क्लासमधल्या लहानग्या मुलांना घेऊन सहज म्हणुन एस पी त जाते,कधी बादशाहीच्या बोळात तर कधी जोगरस पार्क मध्ये.मुलांना लहानपणीच्या, शाळेच्या मैदानाच्या आठवणी सांगते.कदाचित त्या परीसरात पुन्हा एकदा मी माझे प्राथमिक शाळेत हरवलेले बालपणं शोधते जे या शिकवणीतल्या मुलांमध्ये सापडते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract