Sanjay Ronghe

Others

3.5  

Sanjay Ronghe

Others

" माझ्या दाताचे दुखणे "

" माझ्या दाताचे दुखणे "

2 mins
207


कुणास ठाऊक, किती दिवस चालणार हा लॉकडाऊन. आज 3 मे, परत 17 तारखेपर्यंत समोर ढकलण्यात आला. घरात बसून बसून कंटाळा आला. आज तीन दिवस झाले दाताचे दुखणे वाढतच चालले. वाटलं होतं 3 ला लॉकडाऊन संपेल आणि मग बिनधास्त डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घेऊ. पण लॉकडाऊन तर परत वाढला. आता 17 पर्यंत तर दुखणे थांबवून ठेवणे खूपच कठीण आहे. सो डॉक्टरांचा नंबर शोधला आणि कॉल केला. नशीब अटेंडन्टने फोन उचलला. मी माझा परिचय दिला आणि अपॉइंटमेंट मागितली. तिने थोडे थांबायला सांगितले आणि ती डॉक्टरांना विचारायला गेली. थोड्याच वेळात तिने मला एक वाजता यायचे सांगितले. खरंच खूप बरे वाटले. अर्धे दुखणे तर माझे तिथेच कमी झाले.


कोरोनाची साथ सुरू असल्यामुळे मला शंका वाटत होती. डॉक्टर वेळ देतील की नाही. देतील तर काय फक्त पेनकिलर देऊन काही दिवस थांबायला सांगतील का, की इलाजच करणार नाहीत. कोरोनाच्या भीतीने तर सारे जग घरून होते. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती होती. पण डॉक्टरांनी होकार दिल्याने खरेच माझे अर्धे दुखणे थांबले होते.


मी डॉक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी पूर्ण चेकअप करून मला औषध दिले. आणि परत पाच दिवसांनी येण्याचे सांगितले.

औषधांचा पहिला डोस घेताच माझे दुखणे पूर्णपणे कमी झाले होते. आणि लक्षात आले की माझे दुखणे हे माझ्या दातांच्या दुखाण्यापेक्षा मनात असलेल्या भीतीचेच जास्त होते.


माझ्या या साध्या दुखण्याने मला किती टेन्शन आले होते. आणि खरच या लॉकडाऊनचेवेळी जे मोठ्या आजाराला सामोरे जात असतील त्यांची अवस्था का असेल. खरंच तो विचारच नको वाटतो. आणि कर्तव्यनिष्ठ सर्व डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करावेसे वाटते.


Rate this content
Log in