akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

मालगुडीचे पोस्टमन काका

मालगुडीचे पोस्टमन काका

2 mins
313


मालगुडी गाव आता काळा नुसार बदला आहे, नवीन साधन सुविधा सह गाव काळा बरोबर चालण्यास तयार आहे. गावचे सरपंच तसेच ग्रामसेवक आणि गावातील लोक गावाला उज्ज्वल बनवण्यात आपला खारीचा वाटा उचलत आहेत. 

आज गावात सत्कार समारंभआयोजित केला होता. सगळे गाव त्या समारंभाच्या तयारीत मग्न होते तर समारंभच कारण होते, गावचे पोस्टमन काका... आज ८० वर्षाचे झाले होते. त्याच्या वाढदिनी त्याच्या कामगिरी साठी आज सत्कार ठेवला होता. 

ग्राम पंचायतीच्या मैदानात भला मोठा मंडप घातला होता खुर्च्यांची मांडवळ केली होती शेजारी जेवणाची व्यवस्था हि केली होती कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार होता साडे सहा पर्यत अख्खा गाव तिथे पोचला होता. 

सरपंच निवेद्कच्या भूमिकेत होते त्यांनी सगळयांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. 

"नमस्कार माझ्या गाव वसियो गेल्या महिनाभर आपण सगळेच ह्या कार्यक्रमाची वाट पाहत होतो, ह्या कार्यक्रमाच्या कामात मग्न होतो आणि आज तो दिवस आला. आज आपल्या लाडक्या पोस्टमन काकांना ८० वर्ष होत आली त्यांना गावात त्याच्या नावा पेक्षा पोस्टमन काका म्हुणनच ओळखतात पोस्टमन काकांनी गेली कित्येक वर्ष आपली सुख दुःख आपल्या घरापर्यंत पोहचवली. कधीही उशीर किंवा आळस केलाच नाही. पाऊस असो व ऊन, ते नेहमी आपल्या साठी तत्पर होते. त्याची ती सायकल वरची सवारी अजूनही आठवते. कोणाची मनी ऑर्डर असू वा किंमती वस्तू पोचवण्यात त्याच्याकडून कधीच चूक न झाली नाही. असे हे आमचे काका आता त्याच शरीर थकलं आहे, पण बुद्धिमत्ता अजून शाबूत आहे. त्यांनी केलेल्या कामगिरीची लहानशी परतफेड म्हणून हा सत्कार आयोजित केला. देवाने त्यांना आमच्या बरोबर १००वि साजरी करू द्यावी हीच ईश्वर चरणी पार्थना. "

सरपंचानी आपले भाषण संपवले व काहींची नावे स्टेज वर येण्यासाठी घेतली जे काका बद्दल मनोगत व्यक्त करतील 

एक एक करून सगळ्यांनी काकांचे गोड  कौतुक केले मग सरपंचानी काकांचे मित्र त्याना स्टेज वर बोलवलं त्याच्या हस्ते काकाचा सत्कार होणार होता 

काकाचे मित्र आले आपले मनोगत व्यक्त करताना त्याचे डोळे पाणावले काका हि स्टेज वर बसलेले बसूनच त्यांना हार घालण्यात आला शाल आणि श्रीफळ देऊन काकांचा सत्कार करण्यात आला सगळयांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

काका ना चार शब्द बोलण्याची सरपंचानी विनंती केली. 

"नमस्कार माझ्या गाव वसियो आज मन भरून आलाय विचार हि केला नव्हता कि ह्या म्हताराच्या नशिबी एवढे प्रेम येईल शब्द अपुरे पडतील तुमच्या प्रेमासमोर खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि आभार "

तेवढ्यात तिथे केक आणला गेला काकांनी केक कापला. 

सगळयांनी जेवून जावे अशी विनंती सरपंचाकडून करण्यात आली. 

मालगुडी गावाने काळ सह कात टाकली आहे  पण पूर्वीचा गावातला गोडवा कायम आहे. 



Rate this content
Log in