Archana Krishna Dagani

Others

4  

Archana Krishna Dagani

Others

मातृत्वाची वाट भाग -१

मातृत्वाची वाट भाग -१

3 mins
212


मीनल ताई आज फार खुश होत्या, त्यांच्या सुनेची पहिली ओटी भरण होती.त्यांचे घर तर प्रशस्त होतेच पण आंगण ही छान ऐसपैस होते म्हणून त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था अंगणातच केली होती. नेहा त्यांची सून ज्या झोपाळ्यावर बसणार होती त्या झोपाळ्याला छान फुलांनी सजवले होते. पहूण्यानची बसण्याची, खाण्यापिण्याची सगळी सोय त्यांनी स्वतःच्या देखरेखी खाली केली होती. त्या हे सर्व मनापासून करत होत्या. त्यांनी जवळचीच नात्यातली माणसे बोलावली होती, तरी पण पन्नास तरी पाहुणे आलेच होते. मीनल ताईंना निवृत्त होऊन सहा महिने झाले होते. मुलाचे लग्न त्यांनी वर्षभरा पूर्वीच केले होते. आपण आता पूर्ण वेळ घरात असतो, बाळ आले की त्यांना एका छोट्याश्या जोडीदाराची सोबत होणार होती. म्हणून त्या सर्व गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालत होत्या.


थोड्याच वेळात मुहूर्त सुरू होणार होता. नेहाला पण झोपाळ्यावर आणून बसवण्यात आले होते. मीनल ताईंचे लक्ष गेट कडे लागले होते. त्या त्यांच्या मुलीची वाट बघत होत्या, तेवढ्यात तिची गाडी घराबाहेर आलेली त्यांना दिसली आणि त्या आणि त्यांचे पती लगबगीने मुलीचे आणि जावयाचे स्वागत करण्यास पुढे गेले.


"अग स्नेहा किती उशीर केलास ? सगळेच खोळंबलेत, तुझीच वाट पाहत होतो आम्ही"

"अग ह्यानाच ऑफिस मधून यायला उशीर झाला" बरं ठीक आहे, चला कार्यक्रम सुरू करूयात.


कार्यक्रम सुरू झाला बायका मस्त गाणी म्हणत होत्या, ओटी भरण सुरु झाले. एक एक जण येऊन नेहाची ओटी भरत होते. नेहाच्या चेहऱ्यावर मातृत्वाची लाली पसरली होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिचे गोलाकार पोट, त्या भोवती बांधलेला कमर बंध, फुलांनी केलेला तिचा साज शृंगार खूप शोभून दिसत होती ती. सगळे जण तिचे कौतुक करत होते. सांभाळ हो आता दिवस जवळ आलेत, काहीजण पुढच्या येणाऱ्या दिवसांची तिला आठवण करून देत होते तर काही सल्ले देत होते. सर्व कार्य सुरळीत सुरू होते.


मीनल ताईंनी कोणत्याच बाबतीत कसर ठेवली नव्हती, पण मीनल ताईंना आपल्या जावयाच्या चेहऱ्यावर उदासी दिसली बरोबर पण होते, मुलीचे लग्न होऊन तीन वर्ष उलटून गेली होती तरीही तिच्या घरात पाळणा हलला नव्हता. मुलगी आणि जावई दोघेही चांगल्या मोठ्या पोस्ट वर एका नावाजलेल्या कंपनीत नोकरी करत होते. सासरही तिला चांगलेच लाभले होते पण मुल नव्हते, एवढेच काय ते दुःख.


पण हे दुःख स्नेहाच्या चेहऱ्यावर जराही दिसत नव्हते, ती इतर नातेवाइकान बरोबर मस्त धमाल करत होती. भाऊ आणि वहिनी साठी मनापासून आनंदित होती. जावयाच्या चेहऱ्यावरची उदासी मीनल ताईंना मनातून त्रास देऊन गेली.


सगळा कार्यक्रम रीतशिर आटोपला होता. लोक आनंदात एकमेकांना निरोप देत होते. नेहाला तिची माहेरची मंडळी तिच्या घरी घेऊन गेली. सर्व पाहुणे गेल्या नंतर स्नेहा पण निघाली. पण मीनल ताईंनी स्नेहाला एका रात्रीसाठी थांबुन घेतले.

"अग आजच नेहा गेली, घर अगदी खाली खाली वाटेल बघ, तुम्ही दोघे आजची रात्र थांबाना ईथेच फार बरे वाटेल आम्हाला".

"खूप दिवस झाले आपण मनमोकळ्या गप्पा मारून, थांबा आजची रात्र, वाटल्यास उद्या लगेच निघा."

सासूचा इतका आग्रह बघून अमित त्यांचा जावई म्हणाला "मला नाही थांबता येणार, मला एका मीटिंग मध्ये जायचे आहे आत्ता, पण स्नेहा थांबेल, मी येतो उद्या तिला न्यायला.

स्नेहा पण खुश झाली, खूप दिवसानंतर आई सोबत वेळ घालवायला भेटणार म्हणून. स्नेहाला तिथेच ठेऊन अमित निघून गेला.


रात्री जेवणे आटोपली, सगळ्यांनी मिळून आइस्क्रीम खाल्ले. स्नेहाला आई, बाबा , भाऊ सगळ्यां सोबत मन मुराद गप्पा मारून खूप बरे वाटले.


तेवढ्यात तिला फोन आला म्हणून ती बाल्कनीत जाऊन बोलू लागली. भाऊ आणि वडील एका खोलीत झोपण्यासाठी निघून गेले. आज ती आणि आई रात्रभर गप्पा मारणार होत्या म्हणून त्या दोघी एकत्र झोपणार होत्या.


आई तिला हाक मारणार इतक्यात मीनल ताईंच्या कानावर स्नेहाचे शब्द पडले.

"नाही उद्या नाही येता येणार मला हॉस्पिटलला, मी परवा येईन. दोन दिवस पुरेसे होतील ना गर्भपातासाठी ???

नाही अमितला माहित नाही या बद्दल...

मी त्याला सांगणार आहे की मी ऑफिसच्या कामा निमित्त पुण्याला जाणार आहे....

दोन दिवसात ठीक होइल ना मी ...???"


ठीक आहे बोलून तिने फोन कट केला आणि मागे वळली.आईला समोर बघून भलतीच दचकली स्नेहा.


आईने जोरात तिच्या कानशिलात लगावली, त्या आवाजाने भाऊ आणि वडील सगळेच आपल्या खोलीतून बाहेर आले.


काय करतील आत्ता मीनल ताई आपल्या मुलीच्या ह्या निर्णयावर ??? जमेल का त्यांना आपल्या मुलीचा गर्भपात थांबवायला ???


क्रमशः


गर्भपात करणे खरेच योग्य आहे का ?? तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कमेंट करून कळवा. कथा आवडल्यास शेअर आणि लाईक करा.


Rate this content
Log in