akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

मी कोण आहे ?

मी कोण आहे ?

2 mins
265


इंस्पेक्टर सूर्यवंशीला नाव विसरण्याची सवय पण हीच सवय कधी त्याला उपयोगी पडेल असे त्याला वाटले नाही आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता सकाळीच तो घाई गडबडीत निघाला म्हणून त्याच्या बायको ला रिया ला वाटले कि त्याच्या साठी त्यांनी काहीतरी सुरप्राइझ असेल म्हणून ती हि काहीच नसल्या सारखी वागली पण तिला कुठे माहित होते हि तिच्या पतिदेवाना काहीच खबर नव्हती 

दुपार होत आली तरी सूर्यवंशी ने रिया ला शुभेच्छा दिल्या नाही मग संध्यकाळी कुठे त्याच्या सहकाऱ्या पैकी एकाच्या लक्षात आले आणि लगेच त्याने सूर्यवंशीला सांगितले हे ऐकून तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली आता तर घरी गेलो तर धमाका होईल ह्या काळजीने पोलीस असून सुद्धा रिया च्या प्रेमापोटी त्याला धडकी भरली हे सर्व बाकीच्या लक्षात आले त्यांनी त्याला धीर देत कानात कुजबुज केली आणि क्षणात गाडी घरी वळली 

दारावरजी बेल वाजली रिया आज चांगली नटून थटून होती तिला मनात वाटत होते कि सूर्यवंशी आज लवकर येणार आणि कुठे तरी बाहेर जाऊ असेच म्हणणार काहीतरी नक्कीच भारी प्लॅन असेल त्याचा म्हणून तर त्याने सकाळपासून विश नाही केलं लगेच तिने हसत हसत दरवाजा उघडला 

"अरे काय झालं सूर्या काय झालं "?

"मॅडम सर तुमच्यासाठी केक आण्यासाठी गेले असता त्याचे अकॅसिडेन्ट झाले "

"काय "?

"हो मॅडम "

"आम्ही डॉक्टर कडून आणले त्यांना जरा डोक्यावर मार लागला असे सांगितले जरा आराम करायला सांगितलंय "

"बरं बरं "

सूर्या ला बेड वर झोपवून सगळे आजूबाजू उभे रहातात रिया चा हसरा चेहरा एक्दम गंभीर झाला ती सूर्या कडे पाहुन रडू लागली सूर्या झोपेचे नाटक करत होता तरी तिचे रडणे त्याला दिसत होते बाकींनी रिया ला धीर देत "काळजी करू नका सर ठीक होतील" असे सांगितले तरी हि ती सूर्या कडे पाहत होती 

अचानक सूर्या ने डोळे उघडले तसे रिया ने त्याला हाक दिली ते ऐकून सूर्या म्हणाला "मी कोण आहे "?हे ऐकून तर रिया बिथरली बाकीचे सहकारी हि अवाक होऊन पाहू लागले कारण हे त्याच्या प्लॅन मध्ये नव्हते रिया ने तर मोठ्याने रडणे सुरु गेले तसे परत सूर्या ने डोळे बंद केले सगळे रिया ला समजावू लागले थोड्या वेळाने परत त्याने डोळे उघडले रिया ला रडत पाहत तो म्हणाला 

"रिया रडू नकोस "

"सूर्या तू मला ओळखस "

"हो रिया "

"पण आता तर तू "?

"माहित नाही पण सॉरी आज आपला लग्नाचा वाढदिवस असा साजरा करावा लागतो "

"ते राहू दे सूर्या तू ठीक आहे तेच माझ्यासाठी खूप आहे "

हे ऐकून सूर्या ने हसरी नजर आपल्या सहकार्यावर मारली तसे सगळे तिथून जाण्यासाठी निघाले जाता जाता त्यांनी रिया ला काळजी घेण्यासाठी सांगितले आणि काही मदत लागली तर त्यांना फोन करण्यासाठी सांगितले 

रिया चा निरोप घेत सगळे सहकारी सूर्याला हात देत मिशन "मी कोण आहे "सफल झाले हे नजरेने सांगत बाहेर पडले


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy