Ranjana Bagwe

Others

3  

Ranjana Bagwe

Others

नाते मैत्रीचे भाग पहीला

नाते मैत्रीचे भाग पहीला

3 mins
814



"कमल आपल्या घरची कामे आटपून पटकन घरातून बाहेर पडली.जाता जाता घरात वयस्कर असलेल्या सासूला वाकून नमस्कार करत

"येते आई"

अस म्हणत बाहेर पडली.रस्त्यावर आल्यावर ती शेयरींगची रीक्शा मिळते का ते पाहू लागली. बराच वेळ वाट पाहून ती कंठाळली काय कराव काही सूचेना आता पायी चालत गेले तर ड्युटीवर पोहचायला वेळ होईल आणि कंपणीच्या मेन गेटवरची सरू मांजर आडवी येईल. याची तीला जास्त धास्ती वाटत होती. कमला बरोबर काम करत असलेल्या ईतर लेडीज देखील गेटवर असलेल्या सरू मँडम ला मांजर म्हणत असत, याच कारण म्हनजे कंपणीच्या वेळेअगोदर कुणी आल तरी आणि लेट आल तरी ही सरू मांजरासारखी आडवी येई व ऊगाच काही विचारत असे. म्हनून तीला पाहील्यावर अनेकांच्या चेह-यावर आट्या पडत असत. त्या पैकी कमला ही एक होती. म्हणून कमला ला लवकरात लवकर कंपणी गाठायची होती. परंतु रीक्शा शेयरिंगची तर नाही. निदान खाजगी तरी येवू दे अस मनोमन तीला वाटत असताना समोरून एक बाईक येताना कमलाने पाहीली. तीच्या मनात आल कदाचीत बाईक वर असलेली व्याक्ती आपनास ओळखनारी असावी, म्हनजे निदान मेन रोड पर्यंन्त लिप्ट मिळेल. या आशयाने तीने समोरून येना-या बाईकवर आपला लक्ष केद्रींत केल बाईक लांबून वेगाने येत होती. जशी बाईक जवळ आली तशी कमला चमकून थोडी बाजूला झाली. पण तीची नजर काही बाईक वरून हटली नव्हती. बाईकस्वाराला ते जाणवल असाव किंवा दया येवून म्हना बाईक स्वाराने कमला पासून जवळ जवळ दहा फूट अंतरावर बाईक थांबवली, व वळून तो म्हणाला ""

""मँडम लिप्ट हवी का?"

आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे,तसा आनंद कमलाला झाला.ती झपझप पवल टाकत बाईक जवळ जात म्हनाली,

" हो मला मेहरबानी करून मेन रोड पर्यंन्त लिप्ट दीलीत तर आपले फार ऊपकार होतील"

""अहो मँडम त्यात ऊपकार कसले बसा लवकर मलाही वेळेत ड्युटीवर पोहचायला हव"

आढे वेढे न घेता कमला पहील्यांदा अशी अनोळखी मानसाच्या बाईक वर बसली होती. त्यामुळे साहाजीकच ती थोडी अवघडून बसली ,तीला त्याही पेक्षा मागे पकडायला काही मिळत का हे हाताने चाचपून पाहील, तीला सिटचा छोटे खाणी हँडल हाताला लागला, त्याला पकडून कमला बसली आणि बाईक पून्हा हवेशी बोलायला लागली. एका एकी बाईक स्वारने ब्रेक लावला आणि कमलाचा तोल सुटला. स्वतःला सावरायला तीने पटकन बाईक स्वारला मागून पटकन पकडल.

""साँरी मँडम अचानक ब्रेक लावयला लागला ,मी घाईत स्पीड ब्रेकर पाहीला नव्हता.तूम्ही ठीक आहात ना!!

"""हो मी ठीक आहे""

या खेरीज दोघही काही बोलले नाहीत कदाचीत आपआपल्या ड्युटीवर जाण्याची दोघांनाही घाई असावी.पूढच्या पाच मिनिट मधे बाईक मेन रोडवर येताच बाईक स्वाराने गाडी बाजूल ऊभी करून म्हणाला.

""मँडम उतरा मेन रोड आला""

""हो""

कमला खाली उतरली.

""आभारी आहे तूमची सर""

""सर नाही मिलींद नाव आहे माझ""

"ओके मिलींद सर थँक्स"

""अहो मँडम ओके बट तूम्ही थँक्स का म्हणता "

"""असकस !तूम्ही मला ईथवर आणून सोडल""

""मी काही मुद्दाम तूमच्यासाठी आलो नाही..हो याच रस्त्यावरन निघालो म्हनून तूम्हाला लीप्ट दिली एवढच"

""तरी ही""

""बर मी निघतो"

""कमलाने उत्तरादाखल दोन्ही हात जोडून मानेनच होकार दीला तसा तो निघून गेला .

कमलाही रीक्शा पकडून आपल्या कामावर रवाना झाली. मिलींद आणि तीची भेट पहीली आणि शेवटची नव्हती. हे तुर्तास दोघांनाही माहीत नव्हत...

...क्रमंश.....पुढे


Rate this content
Log in