Pradip Warade

Romance

4.4  

Pradip Warade

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

10 mins
9.5K


"जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयाच्या कोरलेलं असलं जगणं म्हणजे खरं जगणं "

त्यांच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनातील सुरुवात ....

पहिल्याच नजरेत त्यांनी मला आपलसं करून घेतलं होत, त्यांचा तो गौर वर्ण , सिंहासम स्वाभिमानाने भरलेला तेजस्वी चेहरा ,त्यांच्या बोलण्यातील करारी बाणा , हिमालयासारखी उंची,चमकत्या डोळ्यातील कर्तृत्वाची धजग, बलशाली शरीर, वक्तृत्व तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावेत.... त्यांच्या पहिल्याच lecture मध्ये मी मनोमन माझं सर्वस्व देऊन बसले होते माझा कुणी जीवन साथी असतील तर फक्त हेच त्यांना बघताच मला माझ्या “त्या स्वप्नाची” आठवण झाली जे मला रोज रात्रीला छळायचे "एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन माझ्या भेटीसाठी आतुर होऊन येणारा तो राजकुमार, राज्यातून येत असताना ज्याच्यावर फुलांचा वर्षाव चालू आहे, काही लोक सन्मान म्हणून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालत आहेत आणि अचानक एक माळ माझ्या हातात आली,मी ती त्याच्या गळ्यात टाकली आणि ते माझ्या गळ्यात टाकणार तेवढ्यात ....

"गुणगुण ए गुणगुण !" अचानक ज्योतीने दिलेल्या आवाजाने मी भानावर आले होते...

प्रोफेसर अगदी होतेच तसे कुठलीही मुलगी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या प्रेमात पडल्या शिवाय राहणार नाही असं त्यांचं चारित्र्य ,प्रेमळ वागणं ,मधुर वाणी आणि नेहमी शांत व प्रसन्न मुद्रा असणारे पण तत्वांच्या बाबतीत मात्र फारच स्ट्रिक्ट होते त्यांना वेळ न पाळणारे लोक बिलकुल आवडायचे नाही, कुणाबद्दल वाईट बोललेल पण नाही चालायचं ते म्हणायचे "दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणारा कोल्हा आयुष्यभर जंगलातील सदस्य म्हनुनच राहणार आणि राजा बनणार तो फक्त सिंह जो कोण काय म्हणतो ? त्याकडे लक्ष न देता नवीन आव्हान स्वीकारतो ! जो ठाम असतो स्वतःच्या निर्णयावर ...जो जगतो फक्त स्वतःच्या हिंमतीने आणि मस्तीने...."

ज्योती ने जोरात चिमटा काढला आणि माझी विचारांची शृंखला तुटली " सस्स्स ...अस काय हे दुखतंय ना.. " मग मी काय वेडी हे का? तुला एवढा आवाज देऊन पण तू मला दादच नाही देत ..." ज्योती माझी बालपणीची मैत्रीण माझ्या मनात काय चाललंय हे तिला लगेच कळलेलं असावं म्हणूनच कि काय ती माझ्याकडे साशंक नजरेने बघत होती "काय झालं? असं का बघतेस ?" मी तिला विचारलं "एवढ्या लवकर अस चांगलं नव्हे... आज पहिलाच दिवस आहे कॉलेज चा..." "अगं तस काही नाही " म्हणत मी तिला नाकारलं होत.

आज कॉलजे ला जायला जरा उशिराच झाला होता म्हणूनच आम्ही दोघी घाई घाई ने निघालो होतो कारण पाहिलंच LECTURE त्यांचं असायचं कसं बसं आम्ही कॉलेज मध्ये पोचलो,आम्ही पोचतो न पोहचतो तोच प्रोफेसर वर्गात आले होते सगळा वर्ग शांत...एरवी मोबाईल मध्ये असणारे २२० डोळे फक्त प्रोफेसरांकडे होते प्रत्येक जण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असायचा ...

त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि इकडे माझ्या HEARTBEATS ची स्पीड वाढायला लागली त्यांनी शिकवायला सुरुवात केली "आज च्या कवीतेचं नाव आहे "प्रेमाचा गुलकंद" प्रेम म्हटलं तसं सर्वांचेच कान टवकारले गेले सगळे जण मन लावून ऐकत होते...... काय कल्पना होती ती "दोन जिवांनी एकमेकांकडे पाहणे म्हणजे प्रेम नाही ...दोन जीव वेगळे नसणे म्हणजे प्रेम ....वेली झाडाशी एकजीव होते ते खरे प्रेम... पृथ्वी सागरात एकरूप होते ते खरे प्रेम...,सुखासाठी निखळ हास्याची भरती आणि दुःखासाठी ओहोटी म्हणजे खर प्रेम...., शेवट पर्यंत तव्यावर भाजल्या जाणाऱ्या दवबिंदूने निभावलं ते खरे प्रेम ...

प्रेमात मर्यादा नसते,भय नसते,अपेक्षा नसते असते ती फक्त जाणीव न बोलताही एकमेकांच्या मनातील भाव कळतो...."

हे ऐकल्यावर मी तर थक्कच झाले त्यांना कसं कळलं ? ते माझ्याबद्दलच बोलत असतील का.... ?

क्लास संपला तसं मी न राहवून सरांना गाठलं खरं... पण अचानक ते समोर आल्यानंतर काय बोलायचं तेच मला सुचेना

"अगं बोलना काय झालं? ते मला म्हणत होते परंतु मला तर काहीच सुचत नव्हते "स्स्स.. सर तुम्ही खूप छान शिकवता प्रत्येक शब्दाला एक वेगळी धार असते काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत निर्माण होते आणि तुमची ती फेसबुक वरील कविता देखील वाचली "

मनातली गोष्ट करायला मिळणं म्हणजे खरं जगणं....

अस्तित्व निर्मितीसाठी लढणं म्हणजे खरं जगणं .......

स्वप्नांना सत्यात उतरवणं म्हणजे खरं जगणं...........

प्रत्येक श्वासात सामर्थ्य असणं म्हणजे खरं जगणं ..........

त्रास देणार्यालाही सहज माफ करनं म्हणजे खरं जगणं ........

स्वतः पुढे जाऊनही इतरांसाठी थांबणं म्हणजे खरं जगणं.....

आपल्यावर हसणाऱ्यालाही स्मित देणं म्हणजे खरं जगणं .......

मृत्यूलाही आपलंस करून घेणं म्हणजे खरं जगणं ......

कसं काय सुचत सर तुम्हाला ? मी जेंव्हा पासून वाचलंय मी तुमची खूप मोठी फॅन झालीय ".... "अगं थांब ..थांब श्वास तर घे आधी मला सांग तुला काय चहा प्यायचीय का माझ्याकडून ? तू एवढी बोलली म्हणजे नक्कीच काही तरी असणार... हा हा हा ..." "नाही ह्म्म्म सर असं काही नाही जे वाटलं ते सांगितलं आणि मला पाहिजे असेल तर मी मागून घेईल .." अल्लड आवाजात मी बोलले ज्योती तर माझ्याकडे अवाक होऊन पाहत होती मी एवढं कसं काय बोलत आहे? प्रोफेसर हसले आणि हसत हसत एक आल्हाद पण प्रेमळ कटाक्ष टाकत "थँक्स" म्हणाले आणि निघून गेले....

ते असेच विनोदी. आंत्मस्तुती आणि परनिंदा यापासून योजनं दूर होते ते.ते मानायचे कि "आत्मस्तुती ने माणूस पोकळ बनतो त्याला नेहमी गरज पडते ती दुसऱ्यांच्या मताची ज्यामुळे इशाऱ्यावर चालणाऱ्या मोठ्या बाहुल्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने जगणारी मुंगी श्रेष्ठ ..."

६ महिने लोटले होते, फर्स्ट सेमिस्टर संपले होते आणि मी "मराठी" विषयात ९५ मार्क्स घेऊन टॉप केले होते आणि ठरल्याप्रमाणे सरांकडनं मला "ट्रीट" मिळणार होती. त्या ट्रीट पेक्षा हि मला महत्वाचं होत ते म्हणजे सरांसोबत "निवांत वेळ" या मधल्या काळात बरच काही घडून गेलं होत ते आता माझ्यासाठी " हृदयातील प्रोफेसर " बनले होते. आम्ही कळत नकळत एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो. मी नसेल तर ते ज्योतीला खूप काळजी पूर्वक हमखास विचारणार "गुणगुणची तब्येत तर ठीक आहे न ?" आणि ते नसतील तर मला तर १ सेकंद सुद्धा महिन्यासारखा वाटायचा ....

त्यांच्या बाबतीत तर काय बोलणार माझंच काय सगळ्यांनाच ते नसताना कॉलेज ला पण यायची इच्छा व्हायची नाही बाकीच्या LECTURE ला २० -२५ जण असणार पण प्रोफेसरांच्या LECTURE ला हॉलमध्ये बसायला जागा मिळायची नाही ... syllabus संपताना त्यांनी announce केलं होत कि "माझ्याकडनं मराठी मध्ये टॉप करणाऱ्याला डिनर असेल" आणि म्हणूनच मी दिवस रात्र मेहनत करून हि ट्रीट मिळवायचीच हे मनोमन ठरवलं होत ...

उद्या माझं स्वप्न सत्यात उतरणार होत... पण आजची रात्र ती कधी संपणार !!.काय होत होतं कुणास ठाऊक? काहीच कळत नव्हतं कधी उद्याची संध्याकाळ होतेय असच वाटत होत... प्रत्येक क्षण एखाद्या जन्मासारखा वाटत होतां ..

अगदी आतुर झाली होती मी. मग शेवटी पेन घेऊन डायरी मध्ये लिहायला सुरुवात केली....

"चांदण्या रात्रीत या आज माझी पहाट सजली

अंधाऱ्या या वाटेवरती शुभ्र बकुळी कशी बरसली !

का नियती मग मृदगंध मातीचा तनामनात बसवते

दोन जीवांच्या आतुर मिलनास नखशिकांत तरसवते ....."

जे हृदयातील प्रोफेसरांबद्दल वाटत होत ते सगळं लिहून काढलं मनावरील भार हलका झाल्यासारखा वाटलं लिहिता लिहिता कधी झोप लागली कळलंच नाही ....

इकडे प्रोफेसरांनाही झोप लागत नव्हती कारणही तसेच होत.. एव्हाना त्यांच्याही लक्षात आलं होतं कि गूणगूण काय विचार करत आहे तशी तीही अतिशय सुंदर, गुणी, सद्वर्तनी, गंगेची प्रांजळता,चंद्राची शीतलता असणारी, तिची जिद्द नक्कीच त्यांना आवडली होती, महत्वाकांक्षी - जे ठरवलं ते मिळवणारी - 'एक जीवनसाथी म्हणून अजून काय हवं असत ? शी वॉज जस्ट ब्युटी विथ ब्रेन, घराची परिस्थिती जेमतेम असल्यामुळेच तिला बऱ्यापैकी गोष्टीची जाणीव होती , मेहनत भरपूर करायची फर्स्ट इयर ला असूनही तिची MATURITY एखाद्या गृहिणी प्रमाणे होती .परंतु ज्या विद्यार्थिनीला मी शिकवतो तिच्यासोबत असला प्रकार ! हे त्यांच्या तत्वात न बसणारं होत पण कितीही नाही म्हटलं तरीहि अवघ्या २६ वर्षात त्यांनी हि नौकरी, हे पद, ख्याती कमावलेली होती, अजून लग्नाचा विचारही नव्हता पण कधीतरी कुणाशीतरी करायचंय मी हि का नको ?"

बाहेर मस्त विजा चमकायला लागल्या आणि पावसाच्या सरींनी या विचारात भर घातली... गरम गरम चहा बनवण्याची प्रोफेसरांनी खूप जास्त आवड होती,त्यांनी गॅस पेटवला एक पातेले धुवून घेऊन गॅसवर ठेवले आणि त्यात चहापत्ती अद्रक आणि मस्तपैकी मलाईदार दूध टाकले अद्रकीने कडकपणा वाढवला होता अगदी ३ ते ५ मिनिटातच चहा उकळायला लागली... चहाचा सुवास आता सगळ्या घरात पसरला होतां , त्यांना गिफ्ट म्हणून मिळालेल्या "गुणगुण कपात " तो चहा टाकला... हो "गुणगुण कप" तिने वाढदिवसाला दिलेला कप होतां तो .... त्या कपात चहा ओतून फ्लॅट मधील आवडीच्या ठिकाणी म्हणजेच खिडकीजवळ येऊन प्रोफेसर उभे राहिले काचेवरील ओघळणाऱ्या त्या सरी, मस्तपैकी होणारी "रिमझिम बरसात" प्रोफेसरांना अजून confuse करत होती तेवढ्यात त्यांनी बघितलं एक माशी कपात पडली होती. तिला बघून त्यांनी कप लगेच बाजूला ठेवला आणि बाहेर बघू लागले "मूड घालवला" म्हणून आज माशीवरती ते रागावलेही होते आणि तिची त्यांना कींव हि वाटत होती किती मजबूर आहे हि ठरवून सुद्धा बाहेर पडू शकत नाही आणि लगेच त्यांच्या डोक्यात tube पेटली. त्यांचच वाक्य त्यांना आठवलं "प्रेम तुम्हाला मजबूत बनवतं असेल तर ते शस्त्र आहे आणि जर ते तुम्हाला कमकुवत बनवत असेल तर कीड..." चहा इतका सुंदर असूनही, मूड एवढा भारी असूनही, चव न घेता ठेऊन द्यावा लागला कदाचित असच आपलंही होईल एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही एक कलंकच आपल्याला सर्वांपासुन दूर करेल ...... तर मग ठरलं उद्या तिला समजावून सांगायचं आणि एक गोड स्वप्न म्हणून हे सगळं विसरून जायचं ......

आताशी कुठे जरा हलकं वाटायला लागलं आणि विचार करता करता सोफ्यावर त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही ...

संध्याकाळी ५ वाजले होते फक्त १ च तास बाकी होता ६ वाजता "कोकण किनारा हॉटेल" मध्ये भेटायचं ठरलं होतं त्याप्रमाणे नेहमी १० मिनटात तयार होणारी गुणगुण आज मात्र एक तास झाला तरी एकाच प्रश्नावर होती ,"नक्की चांगला दिसेल ना हा ड्रेस? त्यांना आवडेल ना सांग ना ज्योती, प्लीज ?" "अगं हो, तसंही तुम्ही कुठे सजावटीला बघणार आहेत, तुम्ही तर मनाच्या शृंगारावाले लोक" असं म्हणत ज्योतीने टोमणा मारला "ए नाही ह्म्म्म तस काही नाही, बरं.. सोड प्लिज सांगना चांगला वाटेल ना? त्यांना आवडेल ना हा ड्रेस ? असं म्हणत हा १० व ड्रेस तिने बदलला होता हे ओळखून ज्योतीने तिला वेळेची जाणीव करू दिली ५:४५ झालेत ह्या क्षणाची तू कालपासून वाट पाहात आहे आणि आता त्यांना उगाच का तरसवणार आहेस ?

"अरे देवा! खरंच की "... असं म्हणत घाईघाई ने मी घरातुन निघाली आणि त्यांना अर्ध्या रस्त्यात गेल्यावर कॉल केला. त्यांनी कॉल उचलला "हो मी पोहचतोच आता रस्त्यात आहे आलोच..." असं म्हणत त्यांनी 'बाय' न म्हणताच कॉल कट केला...

मी ६:३० ला हॉटेल मध्ये पोहचले होते . हॉटेलचे नावच "कोकण किनारा" ....तिथे कोकण चा फील होता, थंडगार वारा, आजूबाजूला हिरवागार वातावरण मस्त lawn वरती फिरले, काय बोलायचं? याची रंगीत तालीमही झाली होती ,पण आता मात्र असह्य झालं होतं, दोन कॉल केले तरी काही उत्तर मिळत नव्हते. आता ७:१० झाले तरी त्यांचा रिप्लाय नाही हे बघून मी अजूनच अधीर झाले आणि रागही येत होता "यायचंच नव्हत तर मग मला हो तरी कशाला म्हटले? आधीच नाही म्हणायचं ना विनाकारण माझ्यासारख्या एकट्या मुलीला असं सोडून कुठे गेलेत कुणास ठाऊक ? हे शोभत का यांच्यासारख्या जबाबदार माणसाला ? ७:१५ झाले आणि अचानक "मिले हो तुम हमको,.." त्यांच्यासाठी लावलेली खास रिंगटोन वाजली आणि त्यांचाच कॉल होता अल्लड आवाजात मी बोलले हॅलो " परंतु तिकडनं एका अनोळखी व्यक्तीचा आवाज होता " कोण आहेत माहिती नाही परंतु ह्या व्यक्तीचा accident झालाय आणि कॉल लिस्ट मध्ये तुमचा नंबर मिळालाय खूप जास्त रक्त वाहतंय त्यामुळे कुणीही जवळ यायला तयार नाही लौकरात लौकर आलात तर बरं राहील " .... काय होतंय हे कळायच्या आतच देवाने बुद्धी दिली मी ज्योती ला सांगितलं आणि सगळ्यांना बोलावून घेतलं ...रस्त्याने एकटीच पळत होते कुणाचीही पर्वा न करता बिनधास्त पळत होते. ५ मिनिटें सुद्धा एक काळ असल्यासारखे वाटत होते... तिथे पोहचले आणि त्यांना पाहिलें आता मात्र माझी शुद्ध हरपली आणि काय होतंय ते कळण्याच्या आतच मूर्च्छित होऊन मी धाडकन जमिनीवर कोसळले .....

जाग आली तेव्हा मी एका रंगहीन भिंती असणाऱ्या हॉस्पिटलच्या बेडवर होते माझ्या बाजूलाच ज्योती बसलेली होती.तिला अपेक्षित प्रश्न मी नजरेनेच विचारला होता ....तिने देखील एकही शब्द न बोलता तिच्या डोळ्यातील आसवांनी मला उत्तर दिले आणि तशी मी गारठले माझ्या आनंदाचे आणि जगण्याचे कारणच हरवले होते हृदयातील प्रोफेसर आता अस्तित्वात नव्हते .... तेही माझ्यामुळेच.... ना मी त्यांना कॉल केला असता.... ना त्यांनी उचलला असता.... ना हे सगळं घडलं असता..... याला मीच सर्वस्वी जबादार आहे ......

पण हे माझ्याच सोबत का? देवा मला कधीच हवं ते दिलं नाहीस एवढी रे काय माझ्याशी दुश्मनी.....?

आता गुण गुण गुणगुणायची परंतु ते सर्व विरहगीते, वेदना ,दुख ,लाचारी, अगदी नकारात्मक गुणगुणयायची... तीच लिखाण देखील बदललं होत ...

काळ बदलला वेळ बदलली

नियतीने सारे खेळ बदलली

निसर्ग हसता ऋतूही बदलली

माझीच का मग केली उपेक्षा ?

आयुष्यभराची दिली प्रतीक्षा ....

मरण येत नाही म्हणून जगायचं असंच ठरवून ती दिवस काढत होती,ती अचानक १५ दिवसांनी प्रोफेसर तिला स्वप्नात भेटले...

हसत हसत ते बोलत होते गुणगुण ऐकून घे " शरीरावरती बंधनं फार असतात म्हणूनच कदाचीत मी तुझा अस्वीकार केलाही असता परंतु 'मी तुझं हृदय तोडावे' हे नियतीला देखील मान्य नसावं आणि म्हणूनच तर हे सगळं घडलं .....

एक सांगू मी जरी नसलो ना तरी तुझ्या हृदयात छोटीशी जागा माझ्यासाठी असू दे !! अचानक मला जाग आली ...

एक नवी पहाट झाली होती .... माझ्या जीवनातही ....

आता माझे शब्दही बदलले .....

येईल परत जीवनी मग तो

ओढ एक ती मणी लागते

हळूच हस्ते स्वप्नी मग मी

स्वप्नातही अलगद जपते ...

स्वप्नी मजला रोज दिसे तो

गाली अगदी हळूच हसे तो ....

आणि शेवटी मी ज्योतीला भेटून सगळं सांगितल्यावर ती बोलली "गुणगुण बघ ना !! "हृदयातील प्रोफेसर" ह्रद्यातलेच झाले ना !!.."


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance