akshata alias shubhada Tirodkar

Thriller Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Thriller Others

फ्लॅट नंबर ३०६-भाग २

फ्लॅट नंबर ३०६-भाग २

3 mins
219


दुसऱ्या दिवसाची नव्या घरातली नवी सकाळ अमित टेबल वर ब्रेकफास्ट करत होता "वाह अवनी मस्त परोठे झाले मज्जा आली खाताना "


अवनी किचन मधून टिफिन घेऊन येत म्हणाली "अच्छा हा घे टिफिन आज ऑफिस ला जायचं आहे तुला नव्या ऑफिसमध्ये नवीन दिवस आहे तुझा "


"अरे हो मी विसरलो होतो चल निघतो उगीच उशीर नको "


अमित पटकन तयार झाला आणि ऑफिस साठी जाण्यासाठी बाहेर पडला. त्याने अवनी कडे पहिले तर तिचा चहेरा पडला होता. कारण तसेच होते नवे शहर ना कोण ओळखीचे शेजारी हि नाही. दिवसभर घरात बिचारी एकटी असेल, तसे नव्या शहरात तिनी नोकरीसाठी अर्ज दिला होता... पण नोकरी मिळेल तो पर्यंत तिला एकटीच राहावे लागणार होते. 


"अवनी मी जातो पण लवकर परत येईन. तू मस्त पैकी एखादा सिनेमा पहा टीव्ही वर आणि हो पाहिजे तर खाली गार्डन मध्ये फिरून ये मस्त वाटेल तुला "


"पुरे लहान आहे का मी किती सांगतोस "


"मग काय करू तुझा चहेरां पडलेला पाहू "


"कुठे पडला आहे तू पण ना "


"अच्छा उलटा चोर कोतवाल को डाढ़े चल बाय मी निघतो "


"लवकर ये अमित "


"हो येईन डोन्ट वरी "


अमित गेला तशी अवनी हॉल मध्ये सोफ्यावर बसली तिने रिमोट घेतला आणि टीव्ही चालू केला पण काही क्षणातच तिला कंटाळा येऊ लागला. ती उठली आणि गॅलरी त गेली आणि बाहेर पाहू लागली गाड्याची ये जा होती. खाली गार्डन मध्ये पण लोक फिरताना बसलेले दिसत होते. एवढ्यात तिची नजर सोसायटी जवळच्या मंदिराकडे गेली आणि ती लगेच तयार होऊन मंदिराकडे निघाली. 


सोसायटीकडून अवघ्या पांच मिनिटाच्या अंतरावर मंदिर होते. मंदिराबाहेर पूजा साम्रगी च्या दुकानातून पुजेचे साहित्य घेऊन अवनी मंदीरात आली. मंगलमुर्ती चे दर्शन होताच तिचे मन शांत झाले भटजीकडे पुजेचे साहित्य देत तिने डोळे बंद करत मनोमन प्रार्थना केली. " हे गणराया ह्या नवीन शहारात आमची तुझं काळजी घे. जर काही संकट असेल तर दुर कर, असे म्हणून ती मंदिरात बसली. मंदीरात येणारा वारा गणराया चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या भक्ताना मनाची शांतता देत होता


अवनी शेजारी येऊन एक बाई बसली अवनीने पाहाताच ती हसली अवनी तशी हसरीच होती ती ही तीला पाहत हसली


" कुठे राहतेस पहिली कधी पाहीले नाही "


"समोरच्या बिल्डींगमधये वी के सोसायटी मध्ये


"काय मी पण तिथेच रहाते "


"हो का नाही आम्ही कालच आलो रहायला "


"तरीच मी तुला पाहिले नाही कुठला मजला


"तिसरा आणी तुम्ही "?


"चवथा एकटी असतेस "?


"नाही मिस्टर आणी मी त्याची बदली झाली ते कामावर गेले घरात बसून कंटाळा आला म्हणून इथे आले "


"बरं केलंस. आणी काय करणार तुमच्या मजल्यावर तर शेजारी ही तसलेच. सगळे नोकरी दार मग कोणाशी बोलणार पण एक सांगू, तुला कंटाळा आला तर पाहीजे तर आमच्या घरी ये‌ पण त्या ३०६ पासुन दुर ‌रहा "


"का सगळेच असे का म्हणतात "


"म्हणजे तुला ही कोणी सांगितले तर"


"पण का ते नाही सांगितले"


"कळेल‌ तुला बर मी निघते मला ‌जरा बाजारात जायच आहे"


त्या बाई गेल्या पण अवनीच्या मनात प्रश्नांचा भुंगा चालू करुन गेल्या ती मनातल्या मनात विचार करू लागली

"ही ३०६ बद्दल एवढे‌ लोक का वाईट बोलतात काय असेल‌ जे सगळ्यांना आवडत नाही आणी तिथे कोण रहात की नाही हे ही माहीत नाही? पाहीले तेव्हा दार बंद असते हे गणराया तुझं सांभाळ म्हणत "अवनी परत घरी परतली


लिफ्ट मधुन तिसऱ्या मजल्यावर पोहचताच तिची नजर ३०६ वर पडली तिने पाहीले की थोडा दरवाजा उघडा आहे हीच ती वेळ म्हणत अवनी दरवाजा जवळ केली ती आत पाहायच्या अगोदरच दरवाजा बंद झाला अवनी तशी धीट होती त्यामुळे न घाबरता ती परत आपल्या फ्लॅट मध्ये आली


पण तिचे विचार चालु होते कोण रहात असेल आणी लोक एवढं का वाईट बोलतात ३०६ बद्द्ल आहे नेमकी गोष्ट?


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller