Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

पोलीस

पोलीस

1 min
134


     पोलीस खात्यात वीस वर्ष नोकरी केल्यानंतर पोलीस हवालदार स्वेच्छा निवृत्ती मंजूर करण्याकरिता डी सी पी यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर, डी सी पी ने बराच वेळ पोलीस हवालदार यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. शेवटी नाविलाजास्तव मंजूर केला.पण न राहून एक प्रश्न विचारला, "सर्व काही मिळत होते या नोकराने, तरी सुद्धा नोकरी का सोडत आहे तुम्ही?" 

      यावर पोलीस हवालदार यांनी सुंदर हृदयस्पर्शी व मार्मिक उत्तर दिले, "सर, बऱ्याच वेळा पासून तुमच्या समोरील खुर्च्या खाली असून देखील मी गेल्या दोन तासापासून मी सावधान मध्ये उभा आहे पण तुम्ही साधी माणुसकी सुद्धा दाखवत नाही आणि बसायला सुद्धा सांगत नाही आणि हे अमाणूषपणाचे वागणे आता मला सहन होत नाही. कारण वीस वर्षांपूर्वी जी ताकद माझ्या मध्ये सहनशीलतेची होती ती आता संपलेली आहे. पण तुमच्या पदामधील इंग्रज अधिकाऱ्याची वृत्ती अजून काही बदललेली नाही. बस्स! एवढेच कारण आहे नोकरी सोडण्याचे."      

हे एक पोलीस दलातील बोलके उदाहरण असले तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात थोडया फार प्रमाणात दुर्दैवाने हीच परिस्थिती आहे. साक्षात देवाने पृथ्वीतलावर सर्व कामगार, कर्मचारी तसेच आपल्या अधिनस्थ शासकीय सेवा बजावणारे  यांचेवर अधिराज्य गाजवण्यासाठीच आपल्याला पाठवले असल्याची भावना अधिकारी वर्गात निर्माण झालेली आहे. 

     कर्मचारी वर्गावर अन्याय, तुच्छतेची वागणूक देण्यासाठीच शासनाने नेमणूक केली असल्याची काही सन्माननीय अपवाद वगळता व अधिकारी वर्गाची भावना झालेली आहे...... 


Rate this content
Log in