Sangieta Devkar

Others

4.1  

Sangieta Devkar

Others

शिवानी..(महिला दिन विशेष ,कथा

शिवानी..(महिला दिन विशेष ,कथा

5 mins
544


अभिषेक ऑफिस वरून घरी आला नुकताच चहा घेत होता . त्याच्या आई ने त्याच्या जवळ येत परत काही मुलींचे फोटो त्याच्या समोर ठेवले आणि म्हणाली,अभि आता किती दिवस लग्नाचा विषय पुढे ढकलणार आहेस या बघ किती सुंदर मुली आहेत . आई अग आजच्या या स्वतंत्र मुली यांना जरा पण तडजोड नको असते ग .खूप अपेक्षा वाढल्या आहेत यांच्या ,मला तर नकोच वाटते लग्न करायला. अभि म्हणाला. अरे सगळ्याच मुली अशा नसतात आपण शोधु ना चांगली मुलगी का अजून ती शिवानी मनात आहे तुझ्या. तिला बघून झाले आता दोन वर्षे आई म्हणाली. आई अग शिवानी चांगलीच होती पण तिचे स्वत:चा बिझनेस करण्याच खूळ विचित्र होत आज भले भले पुरुष नीट बिझिनेस करू शकत नाही आणि ही इथे एक मुलगी असून बिझनेस ची स्वप्न पहात होती आजच्या पुरुष प्रधान समाजात तिचा कितीसा टिकाव लागणार आहे सोपं नसत बिझनेस करणं. जाऊ दे आई सध्या थांबू थोडे दिवस. बर जशी तुझी इचछा आई ने तो विषय संपवला. अभिषेक ने टीव्ही लावला. चॅनल चेंज करत करत पहात होता कुठे काय पाहण्या सारख आहे एका न्यूज चॅनल वर त्याला शिवानी चा फोटो फ्लॅश होताना दिसत होता त्याने ते चॅनल लावले आणि आवर्जून पाहू लागला की खरच ती शिवानी आहे का ? तर ती शिवानी च होती . तिला येणाऱ्या महिला दिना दिवशी उदयोन्मुख ,नवतरुण आणि दोन वर्षातच आपल्या कर्तृत्ववाने उद्योग क्षेत्रात प्रचंड भरारी घेणारी धाडसी महिला म्हणून तिला पुरस्कार देऊन तिचा सत्कार होणार होता . अभिषेक तिला पहातच राहिला,एकदम बोल्ड,एलिगंट अशी शिवानी दिसत होती,तिच्या चेहऱ्यावर तिचा आत्मविश्वास झळकत होता. याच शिवानी ला त्याने 2 वर्षा पूर्वी नकार दिला होता कारण तिला स्वतंत्र बिझनेस करायचा होता आणि अभिषेक ला ते मान्य न्हवते कारण पुरुषी अहंकार,स्त्री ते ही होणारी बायको एक बिझनेस वूमन त्याला पचनी पडत न्हवते. अँज ही वॉज सो कॉलड मेल मेंटयालिटी . तो हे विसरला होता की आज ची 21 व्या शतकातील स्त्री मनात आणले तर काही ही करून दाखवू शकतो तिच्यातील क्षमते चा ,कष्टाचा या पुरुषांना जाणीव ही नाही. पण तिने अशा संकुचित वृत्तीच्या माणसाला सरळ नकार दिला होता कारण तीच ध्येय तिची स्वप्न खूप वेगळी होती.

  आज सकाळी शिवानी ला फोन आला संध्याकाळी वेळेवर कार्यक्रम च्या ठिकाणी या. तेव्हा ती खूप खुश होती तिचे स्वप्न आज पूर्ण झाले होते एक सक्सेस फुल बिझनेस वूमन म्हणून तिचा दर्जा नक्कीच उंचावला होता. संध्याकाळी आई बाबा आणि शिवानी कार्यक्रमा च्या ठिकाणी पोहचले . प्रमुख पाहुणे म्हणून बरीच मोठमोठी बिझनेस हस्ती तिथे आल्या होत्या त्याच्या हातून शिवानी चा सत्कार होणार होता. सगळ्यांनी खूप कौतुक केले शिवानी चे अगदी कमी वेळात तिने चांगले यश मिळवले होते. उपस्थित पाहुणे आपल्या भाषणात म्हणाले,आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात क्षमता असलेले मनुष्यबळ आहे. यातील महिलांचा टक्काही तेवढाच मोठा आहे. आपल्या देशात महिलांना अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला आहे आणि आजही करावा लागतोय. परंतु आजच्या काळातील स्त्री ही शिक्षणाने सक्षम झालीय. स्वत:च्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभी राहतेय. उद्योगविश्र्वात असणाऱ्या स्त्रियांचा संघर्ष अनेक पातळींवर आहे.आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही निवडक महिला उद्योगविश्वात स्वत:चा ठसा उमटवू शकल्या आहेत. ही परिस्थिती राष्ट्रीय पातळीवर आहे. जर महाराष्ट्रापुरता सिमीत विचार करायचा झाला तर त्यापेक्षाही कमी टक्का महिला उद्योजिका महाराष्ट्राच्या उद्योगविश्र्वात पहायला मिळतात. आपल्याकडे महिला या मुख्यत्वे सेवा उद्योग, आयटीक्षेत्राशी संबंधीत उद्योग, कापड उद्योग, अन्न आणि प्रक्रिया उद्योग, अवजड उत्पादन उद्योगाशी संबंधीत उद्योग क्षेत्रात जास्त कार्यरत आहेत. महिला या आता कुठेच कमी पडत नाहीत त्यांना मिळनाऱ्या पुरुषा बरोबरीचा हक्क,अधिकार याची त्यांना जाणीव झाली आहे समानतेच्या या हक्का मूळेच शिवानी सारख्या तरुण मुली आज उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत सो प्रॉऊड ऑफ यु शिवानी. असा कौतुकाचा वर्षाव होऊन तिचा सत्कार समारंभ झाला.

तिच्या आई च्या डोळ्यात पाणी म्हणजे आनंदाश्रू होते. निर्मलाबाई ना आठवले की त्यांनी शिवानी ने तिच्या या स्वप्ना बद्दल सांगीतले तर त्या म्हणाल्या होत्या,शिवानी स्वतंत्र बिझनेस करणं एका बाई साठी सोपं नाही ग खूप अडचणी येतील आणि समाजातील पुरुष तुला कधी ही पुढे जाऊ देणार नाहीत,तुला त्रास देतील असा वेडे पणा करू नकोस एखादी चांगली नोकरी बघ त्यापेक्षा. नाही आई आज जग कुठे चाललय आणि तू काय या गोष्टी घेऊन बसलीस आज प्रत्येक स्त्रीला पुरुषा सारखेच समान हक्क,अधिकार आहेत त्या जोरावर स्त्री आपली प्रगती करू शकते. कोणत्याही कामात अडथळे येणारच पण जिद्दीने कष्टाने त्यावर मात करता आली पाहिजे. मी स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिक आहे केवळ स्त्री आहे म्हणून मी पुरुषा ची बरोबरी करायची नाही हा कोणता नियम ? उलट आज समाजाला दाखवून देण्याची गरज आहे की स्त्री किती सक्षम आहे तिला ही मत,हक्क अधिकार मिळाले पाहिजेत आणि पुरुषा पेक्षा स्त्री नक्की जबाबदार आणि कर्तव्यदक्ष असते. तू काळजी करू नकोस आई शिवानी म्हणाली होती बाबा मात्र कायम तिच्या पाठीशी होते. आई म्हणायची शिवानी तू बिझनेस वूमन आहे म्हटल्यावर खूप कमी मुल तुझ्याशी लग्न करायला तयार होतील. या तुझ्या वेडा पायी किती तरी मुलांनी नकार दिला तुला. आई अशा स्त्रीला कमी लेखणार्या ,स्वहताचा इगो जपणाऱ्या पुरुषा शी मलाच लग्न नाही करायचे . जो मला स्वहता सोबत बरोबरीने वागवेल, ज्याला माझ्या हक्काची ,अधिकराची जाणीव असेल अशा मुलाशीच मि लग्न करेन. आता निर्मला बाईंना हे सगळ आठवल आणि आपल्या मुलीचा सार्थ अभिमान पन वाटला. कार्यक्रम संपल्यावर शिवानी आई बाबा घरी आले. आणि थोड्याच वेळात अभिषेक त्यांच्या घरी आला सर्वाना आश्चर्य वाटले हा इथे कसा काय असा प्रश्न पडला . अभिषेक शिवानी ला म्हणाला,मि तुज़या सत्काराची न्यूज पहिली टी व्ही वर खुप खुप अभिनंदन शिवानी आणि मि तुझी माफी सुद्धा मागायला आलो आहे तेव्हा माझ वागने पन चुकीचे होते मी तुला ओळखु नाही शकलो मला माफ् कर तू मला मना पासून आवडली होतीस पन आता मला कळते आहे की तुझा निर्णय योग्य होता यूं डीझर्व इट शिवानी. शिवानी म्हणाली मग आता का आला आहेस तू ? शिवानी मि तयार आहे तुझ्याशी लग्न करायला जर दूसर कोणी तुझ्या आयुष्यात नसेल तर अभिषेक बोलला. हो का मिस्टर अभिषेक तुम्ही माझ्याशी लग्न करणार कारण आता मि वेल सेटल्ड बिझनेस वुमन आहे आणि यशाच्या शिखरावर आहे . आता तुला माझी मत माझे विचार पटतात ? मग तेव्हा काय झाल होत ,तेव्हा मि फक्त माझ स्वप्न सांगितले होते ते तुला पटले नहवते कारण मुलगी आणि बिझनेस करणार असा सुर होता ना तुझा बट मिस्टर अभिषेक नॉउ आय एम नॉट इंटरेस्टेड ओके तुम्ही जावू शकता. अभिषेक तिथुन निघाला. शिवानी च्या चेहर्यावर आत्मविश्वास, समाधान याच तेज झळकत होत. तिने सिद्ध करून दाखवले होते येस वुई द पॉवर !!



Rate this content
Log in