Meena Kilawat

Abstract Inspirational

4.5  

Meena Kilawat

Abstract Inspirational

संस्कृती

संस्कृती

2 mins
8.8K


संस्कृती आहे तर संस्कार आहे.प्रकृतीचे देणे अमुल्य आहे.देव असेल नसेल पण श्रद्धा आहे.या श्रद्धेपाई अनेक जण जगत आहेत.असंख्य जण रोजीरोटी कमवून आपला संसार निटनेटका करुन भरण पोषण करतांना दिसतात......

देवपुजा करायला कुणाची सक्ती नाहीच मुळी,पण हिंदु करतात आणि मानतात,त्यांची प्रगाढ श्रद्धा, आशारुप घेवून त्यांची दु:ख जर कमी करत असेल तर त्या भोळ्या जनांना करु द्या की भक्ती. ज्या श्रद्धेपाई अनेक साहित्यीक अमर संत झालेले आहेत,त्यांनी आपली प्रगल्भ बुद्धी खर्च करुन जनास योग्यच मार्ग दाखविला आहे. त्यात आग ओकण्यासारखं काय आहे ?त्यांच्या श्रद्धेवर ताशेरे उडवण्याचा कुणालाच अधिकार नाही. असे मला वाटते. मी मानते त्यांच्या भक्तीत स्वर्ग नाही ,नर्क नाही,पण जर नरकात जाण्याच्या भितीमुळे घाबरुन जर चांगुलपणा येत असेल तर श्रद्धा कां ठेवू नये?

हे संस्कार घेवून कित्येक महापुरुष जगात झालेले आहेत,त्यांची नावे सुवर्णक्षरात लिहिली गेलेली आहेत.त्यांचे अतुलनिय कार्य,त्यांचे पिढ्यांन पिढ्या गुणगाण आपन गात आहोत,तर ते काय खोटे होते वाईट होते तर आपण त्यांना का मानत असतो ?कसे काय का ते माननीय ठरले? सुसंस्कांरी लोकांची कधीच अधोगती होत नसते,त्यांची आस्था  इच्छाशक्तीच त्यांना उच्चपदावर नेवून ठेवत असते. ज्यांच्याजवळ आस्था नाही ते कधी ही नाव लौकीकास पात्र होत नाही.जसे डॉक्टरवर श्रद्धा ठेवली तर मनुष्य रोगमुक्त होतो.गुरूवर श्रद्धा ठेवली विद्या येत असते.आईवडिलांवर ,कुणी नातेवाईक,परीवार,आप्त प्रत्येकाची कुणावर तरी श्रद्धा असतेच.तशीच देवावर श्रद्धा ठेवणे वाईट नाही ,असं मला वाटते.अनेक प्रश्न आपल्या मनात घोंगावत असतात. त्याचे क्षालन कुणीच करु शकत नाही.                                                               

आस्था शरीरात संवेदना निर्मान करत असते.त्यामुळे जन जाती सर्व इलाज करुनही

जेंव्हा रोगमुक्त होत नाही तेंव्हा देवाचाधावा करुन बरे झालेली लोक आपल्याला दिसतात.

डॉक्टर सुद्धा जेंव्हा हात टेकतात आणि वरती बोट दाखवतात सर्व उपरवाले के हात मे है अस का बर म्हणतात?

छोट्या मुलांना चांगले संस्कार मिळावे त्यासाठी आई बाबा भिती दाखवतात कि हे केल्याने पुण्य मिळते,

हे केल्याने पाप होते.हे सर्व त्या बालमनावर वरचेवर बिंबवल जाते,आनी बालक वाईट कृत्य करायला भित असतो.चांगले काम केले तर आपलं चांगल होईल ही भावना ९९ टक्के लोकांच्या मनात असते,व त्यातून काय बोध मिळतो ,हे सर्वांना ठावूकच आहे.

                                  

संस्कृती आहे म्हणुनच सर्व आहे. प्रत्येक धारणे मागे काही कारणे असतात.सणवार आले की नवीन कपडे मिळतात,गोडधोड पदार्थ खायला मिळतात. घरात कसा आंनद दरवळतोय. दुरुन दुरुन नातेवाईक येतात.संमारभ होतो.त्या एका नवसामुळे,किती लोकांना आंनद मिळतो.आता नवयुगात पार्टीच रुप त्याला मिळाले आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract