Aruna Garje

Others

5  

Aruna Garje

Others

सोय...

सोय...

1 min
619


आज शनिवार असल्याने झाडाखालील श्रीशनिदेवाच्या शिळेवरचे तेल अजुनही खाली ओघळतच होते आणि उडदाची दाळ इकडे तिकडे विखुरली होती. भाविकांची गर्दीही पांगली होती. 


   नेहमीप्रमाणे ते छोटे बहिण-भाऊ तिथे आले. देवाला नमस्कार करून तिने विखुरलेली उडदाची डाळ गोळा करून ओच्यात भरली आणि त्याने खाली ओघळलेले तेल हाताने सावरीत छोट्याशा डब्यात घेतले. 


आता आठ दिवस भाकरीसोबत डाळीची सोय झाली होती तर तेलाच्या दिव्याने त्यांची झोपडी उजळून निघाली होती.


Rate this content
Log in