" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3.5  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

स्वार्थ...

स्वार्थ...

1 min
88


स्वार्थ हा अतिशय वाईट.स्वार्थ माणसाला पशू बनवतो.स्वार्थ माणसाला संपवून टाकतो.जे जे वाईट घडतं त्याला कारणीभूत हा स्वार्थ असतो.

     भाऊ भावात नी आई लेकरांतं नसते ती या स्वार्थामुळे.माणसाचा घात नी समाजाचा नाश होतो तो या स्वार्थामुळे....नाती जुळतात नी तुटतात ही या स्वार्थामुळे. लोकं मरतात नी मारतात स्वार्थामुळेच...जे घडू नये ते घडतं ते स्वार्थामुळे ..स्वार्थामुळे नी स्वार्थामुळेच...

     वाईट स्वार्थ का माणूस हे सांगणे सोपे नसले तरी निश्चितच स्वार्थ चांगला नसतो...अशा ह्या स्वार्थाला माणूस का म्हणून जवळ करतो ते त्यालाही कळत नसतं कधी पण होईल आपलं ही भलं असं त्याला वाटत असतं.स्वार्थी माणसांचं भलं कसं होईल हे त्याला कोणी सांगावे...तो तरी वेडा असतो का ? वेड्याला कुठला स्वार्थ ? स्वार्थ तर शहाण्यांलांचं फार.. पण तो शहाणांच.. अतिशहाणा म्हणालात तरी चालेल...

   विषय माणसाचा नाही, स्वार्थाचा आहे.माणसाच्या स्वार्थाचा... प्राण्यांना कुठे असतो स्वार्थ ? चाबकाचे फटके खावून ही ओझे ओढतातचं बिचारे प्राणी...

स्वार्थापुढे कशाची आली दया,माया...? 

   राहवत नाही म्हणूनच सांगतोय माणसाला...माणसा ,माणसा ..सोड रे स्वार्थ हा... ज्यांनी स्वार्थ सोडला . ते महामानव झाले...संत,महात्मे झाले...तू पशू नाही माणूस आहेस माणूस... तुला जपायचे आहे धर्माला, मानवतेला, संस्काराला आणि मूल्यांना...तू तर जगातला बुध्दीमान प्राणी...आरे हो प्राण्या सारखं वागू नको.. माणसानं वागावं माणसासारखे... लक्षात ठेव स्वार्थ वाईटच असतो... स्वार्थ.. स्वार्थ चं आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract