Manish Vasekar

Others

2.8  

Manish Vasekar

Others

तोंडली

तोंडली

5 mins
22.8K


"मला हे बिलकुल पटलं नाही. किमान आजच्या दिवशी तरी तिने हे असं करायला नको होत! अन ती तर हे जाणूनबुजूनच करते, म्हणा ना. चाळीस वर्षे झाली आता आमच्या संसाराला. बाकी तस म्हणाव तर हीच माझ्यावरच प्रेम तिळमात्र हि कमी झालं नाही. पण हिला अशी अधूनमधून हुक्की येतेच, मला त्रास द्याची. लग्नच्या वाढदिवसाच्या दिवशी असं हे सूरी खुपसून तिने घात करणं मला बिलकुल आवडलेलं नाही, आता हार नाही, कदापि हार नाही . कायमचा अबोला. " हनुमंतराव हे उद्रेकी विचार मनात घोळत भर दुपारी मंदिरातच रुसून बसले होते.

“जळलं मेलं ह्यांचं लक्षण, जरा म्हणून समजूतदारपणा नाही. आणि हे म्हणे आता, आमच्या सोसायटीचे सिनियर सिटीझन ग्रुपचे प्रेसिडेंट. काय कामाचे! वागा म्हणावं कि मग सिनियर सारखं. भांडणच करायचं तर, काही तरी ज्वलंत मुद्दा नको, साधी तोंडलीची भाजी केली म्हणून का कुणी इतक रागावत. शोभत नाही हे ह्यांना. मी म्हंटल, दोन दिवसापासून हे तोंडातलं आल्याने खूप बेजार आहेत. म्हणून ताजी तोंडली बाजारातून आणली आणि फक्त औषध म्हणून हा , ह्यांच्या पानात तोंडलीची भाजी वाढली तर हा एवढा उद्रेक.काय-काय म्हणून बोलले मला. खरंच, माहेर असलं असत तर केव्हाच, अगदी ह्या वयात, अगदी साठीतही, माहेर गाठलं असत. पण आता न माहेर राहीलं न सासर.हे घर सोडून कुठे जाणार. पण आता माघार नाही, बघू या किती दिवस अबोला धरतात हे" सुलक्षणा आजीने हि आपली मोर्चेबांधणी चालू केली.

एका सुखवास्तू बंगल्यात ह्या दोघांचा संसार सुखात चालत असे, अगदी राजा-राणीसारखा दिवाळी सोडली तर तस ह्या त्यांच्या राजवाडात फक्त ह्या दोघांचं राज्य. पण दिवाळी आली कि चांगलं आठ- पंधरा दिवस हे घर त्यांच्या राजकुमार आणि राजकुमारीच्या हवाली जायचं.अमित, हनुमंतरावाचा जेष्ठ रत्न, सध्या वास्तव्य शिकागो. सुनबाई गुजराती, तशीच वागा-बोलायला गोड. तेजस्विनी ही हनुमंतरावांची कन्या-रत्न, नवऱ्या सोबत दिल्लीस्थित. दिवाळीत हे त्यांच्या सर्व गोतावळ्यासोबत आवर्जून ‘राजवाडात’ यायचे. बाकी इतर वेळी मात्र सुख-दुःखाला हेच दोघे आजी -आजोबा काय ते एकमेकाला आधार द्यायचे. दोघांनी संसारही फार उत्तम केला होता, अगदी नजरलागण्याजोगा.

हनुमंतरावाना लहानपणापासूनच तोंडलीच वावडं, द्वेषच खरं तर कसं काय ते त्यांच्या आईला पण माहित नव्हतं. आणि इकडे सुलक्षणाबाईंना तर तोंडलीच फार वेड.लहानपणी म्हणे त्या कच्ची खायच्या तोंडली.लग्नहोऊन जेव्हा त्या हनुमंतरावच्या घरी आल्या आणि जेव्हा त्यांनी हि भाजी करून पानात वाढली तेव्हा काय धिंगाणा घातला होता हनमतरावांनी. हे आठवलं कि सुलक्षणाबाईंना खरं तर हसू येत असे. हे तोंडली प्रकरण सोडलं तर हनुमंतराव माणूस म्हणून काय झाक होता,एक नंबर - पुरूषोत्तम. त्या दिवशी सुलक्षणाबाईंच्या सासूबाईने एक पैज लावली त्यांच्याशी, 'ज्या दिवशी तुझा नवरा तोंडलीची भाजी खाईल, त्या दिवशी मी स्वतःअख्या गावाला सांगेल माझी सून म्हणजे एक नंबर'.आजतागात हा योग काय आला नाही. वाट बघून सासूबाई हि वर मुक्कामाला गेल्या. अधून मधून सुलक्षणाबाई तोंडलीचा प्रयोग करत असतात आणि मग दर वेळी हनुमंतराव असा धिंगाणा घालतात.आज मात्र त्यांनी हा प्रयोग करायला नको होता, कारणआज त्यांचा खरं तर लग्नाचा चाळिसावा वाढदिवस. आज गोडधोडासोबत इतर कुठलीही भाजी केली असती तरी हनुमंतरावांनी ती ख़ुशी-ख़ुशी ने खात जुन्या आठवणी रंगवल्या असत्या. पण नेमकं आजच सुलक्षणाबाईनी तोंडली केली, आणि हा धिंगाणा झाला.त्यांनी हि तोंडलीची भाजी, त्यांना आलेल्या तोंडातल कमी व्हावं यासाठी औषध म्हणून खरं तर ती केली होती.नेमकी हीच गोष्ट हनुमनरावांना खटकली. आणि म्हणून त्यांनी जोरदार भांडण केलं आणि आता हा अबोला. दोघेही फारच पेटून उठले होते, कुणीच माघार घ्यायला तयार नव्हतं.

सुलक्षणाबाई आपल काम करून शांत बसत. रात्री जेव्हा हनुमंतराव घरी आले तेव्हा सुलक्षणाबाईंनी त्याचं जेवण टेबलवर वाढून ठेवत, त्या शांतपणे सोफ्यात जाऊन बसल्या. कुणीही कुणाला बोलल नाही. घरात अगदी सुतकी शांतता पसरलेली.

अश्याच अबोल्यात दुसरा दिवस हि गेला. पण ह्या हि अबोल्यात हनुमानरावांनी सुलक्षणा बाईची ब्लड-प्रेशरची गोळी चुकू दिली नाही. ते ती गोळी वेळेनुसार काढून टेबलवर ठेवून, सुलक्षणा घेत नाही तोपर्यंत समोर बसत.खरं तर दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत. पण यावेळी हा अबोला मात्र कुणी सोडायला तयार नव्हतं. बघता बघता सहावा दिवस उजडला, पण शीतयुद्ध चालूच होत. माघार घेऊन तह करायला कुणीच तयार नव्हत. आजचा शीत युद्धाचा सहावा दिवस. तो ही अर्ध्याच्या वर संपत आलेला, शिरस्त्याप्रमाणे हनुमंतराव संध्याकाळचे फिरायला निघाले, आठवणीने लैच-की नघेता निघाले. संध्याकाळी रोज फिरून आले कि ते दारावरची बेल वाजवत आणि मग सुलक्षणाने ते उघडावा.ह्यात हनुमंतरावांना एक वेगळीच मज्जा वाटायची, त्यांना ऑफिसहुन घरी येतोय असच वाटून जायचं.

इकडे सुलक्षणा बाईंनी संध्याकाळचा स्वयंपाक करायला चालू केलं होतं. दोघांचा तर तो स्वयंपाक लगेच झाला.टीव्ही लावून सुलक्षणा सोफात बसल्या. सात वाजले, साडे सात वाजले, राणाची ‘तुझ्यात जीव रंगला’ सिरीयल चालू झाली, आठला ती हि संपली. पण अजून दारावरची बेल वाजली नव्हती. सुलक्षणाबाई ने दार उघडून ती एकदा वाजून बघितल तर चालू होती.एव्हाना हे यायला हवे होते असं त्यांनी बोलूनही दाखवलं स्वतःला. भिंतीवरच्या घड्याळाने नऊ चे ठोके दिले,तेव्हा सुलक्षणाबाईचा काळजाचा ठोका चुकला.त्यांनी ताबडतोब पायात चपला सरकवल्या आणि त्या हनुमंतरावच्या नेहमीच्या रस्त्यांनी चालायला लागल्या.अंधार चांगलाच पडला होता, मुळातच कमी रहदारीचा रस्ता आता चांगलाच निर्मनुष्य झाला होता.बरचसं अंतर चालूनही हनुमंतराव त्यांना दिसत नव्हते.सुलक्षणाबाई भराभरा चालत होत्या.एरवी त्या एवढ्या अंधारात कधी चालत नसत. पण आज बाका प्रसंग आला आहे असं त्यांचं मन त्यांना खुणवत होत. इतक्यात त्यांना रस्त्यात आडवे झालेले हनुमंतराव दिसले. त्यांना अगदी रडू येईल असं वाटलं. धावतच त्या तिकडे गेल्या आणि सर्व काही ठीक असल्याची खातर जमा केली.हृदय ते चालू होत.त्यांचा जीव भांड्यात पडला.देवाला नमस्कार घालत त्या मदतीसाठी इकडे तिकडे बघू लागल्या.देवाला नमस्कार केल्याने बहुदा एक ऑटो त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसला.ऑटोवाला भला माणूस होता, त्याने हनुमानरावांना स्वतःऑटोत घेतलं आणि सुलक्षणाबाई नि त्यांना थेट हॉस्पिटलला ऑटो घ्या म्हणून सांगितलं. हॉस्पिटल बंदच होत होतं, पण डॉक्टर ओळखीचे असल्याने त्यांनी हनुमंतरावांना ऍडमिट करून चेक केलं आणि मग सकाळी काही टेस्ट करू म्हणून सांगून ते घरी निघाले.एव्हाना हनुमंतराव शुद्धीवर आले होते पण ते शीत युद्ध संपवण्याच्या तयारीत नव्हते. आजचा हा सातवा दिवस.डॉक्टर आले तेव्हा खूप साऱ्या टेस्ट झाल्या आणि मग त्यांना सुट्टी मिळाली.रिपोर्ट यायला काही दिवस गेले. रिपोर्ट आल्यावर स्वतःडॉक्टर त्यांच्या घरी आले. ते थोडे तणावग्रस्त वाटले सुलक्षणाबाईंना. डॉक्टरनी त्यां दोघांना बोलावले.डॉक्टरांनी अमित- तेजस्विनी बद्दल विचारपूस केली आणि मग शांतपणे ते रिपोर्ट उघडत काही तरी विचित्र सांगत होते.दोघांना हि काही तरी समजावून सांगत होते. सुलक्षणाबाई रडत रडत ते ऐकत होत्या. हनुमंतराव धीट होते अगदी स्तीतप्रज्ञ. त्यांचे तंबाखूचे व्यसन त्यांना बांधले होते, हनुमंतरावांना बहुदा ह्याची कल्पना असावी. तोंडातल् आल्यासारख जे वाटत होतं, तो कॅन्सर होता, तोंडाचा कॅन्सर. थर्ड स्टेज.फार फार तर एक वर्ष.

डॉक्टर त्या दोघांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. सुलक्षणाबाई रडत होत्या. हनुमंतराव शांत बसले होते. काही क्षण सर्वजण स्तब्ध झाले. आता हनुमंतरावांना हि शांतता संपवून टाकायची होती, ही मागच्या सातदिवसांपासूनची सूतकी शांतता. अबोलपण सोडत ते त्यांच्या नेहमीच्या सुरात बोलले "सुलु ,भूक लागली आहे. दुपारच्या जेवणाचा काय बेत, आज छान तोंडलीची भाजी कर. बघू तरी तिची चव ……. तोंडलीची! "


Rate this content
Log in