Deepali Mathane

Others

4.0  

Deepali Mathane

Others

वारीचा सोहळा (अष्टाक्षरी)

वारीचा सोहळा (अष्टाक्षरी)

1 min
231


उटी केशर चंदन

टिळा कस्तुरी लल्लाटी

कटी पितांबर शोभे

मुर्ती सावळी गोमटी

   सजे आषाढी-कार्तिकी

   नित्य वारीचा सोहळा

   वाट पाहे विठूराया

   होई अधीर राऊळा

टाळ चिपळीही पहा

आज नाचे आनंदात

मेळा वैष्णवांच्या शोभे

दंग विठू अभंगात

    मुखी चालला गजर

    नावे विठूच्या भक्तीचा

    नाद टाळ चिपळीचा

   भाव भक्तीच्या शक्तीचा

सखा पांडुरंग हरी

येई हाकेला धावून

मनी वैष्णवांच्या वसे

मुर्त विश्वासी दावून

   विठू कृपाळू साक्षात

   भक्ता सांभाळी वारीत

   रूप सगुण साकार

   भाव दिसे पंढरीत

क्षण भेटीचा उत्कट

घ्यारे साठवूनी डोळा

आर्त दर्शनात दंग

माझा वारकरी भोळा


Rate this content
Log in