Sangieta Devkar

Others

5.0  

Sangieta Devkar

Others

वूड बी माय व्हॅलेन्टाईन??

वूड बी माय व्हॅलेन्टाईन??

10 mins
748


आय एम सो सॉरी रुची ,मला माफ कर मला हे आपलं नात पुढे नाही कन्टिन्यून करता येणार,,मितेश म्हणाला. काय बोलतोस तू हे मितेश? का पण काय प्रॉब्लेम आहे हे बघ रुची तुला माहीत आहे की वडीलांच्या माघारी मला आई ने लहानाचे मोठे केले तिला आपले नाते मान्य नाही .आता तिला माझी गरज आहे ग, मितेश म्हणाला,हो मितेश तुझे म्हणणें मला पटते पण माज्यावर प्रेम करताना तू ही गोष्ट का नाही लक्षात घेतलीस की तुझ्या आई ला एक विधवा सून म्हणून चालेल का? मितेश तुला कोणी हक्क दिला रे माझ्या भावनांशी खेळण्याचा,मला नवीन आयुष्याची स्वप्ने दाखवण्याचा ? 

रुची रागाने बोलत होती,तिच्या डोळ्यात आसवांची गर्दी झाली होती. ती डोळे पुसत म्हणाली,,मितेश का आलास माज्या आयुष्यात ,मी एकटी माझ्या छकुली सोबत जगत होते ना रे, खूप सोसलं मी माझ्या आयुष्यात,विक्रम चा अपघाती मृत्यू,सासरच्या लोकांनी मला दिलेली परके पणाची वागणूक,सगळं सहन केले रे फक्त माझ्या मुली कडे बघून! विक्रम गेला तेव्हा सई दोन वर्षांची होती. खूप एकटी पडले होते पण जगत होते. तू आलास आणि पुन्हा नव्याने जगायला शिकवलेस मला हसवलेस सई ला जीव लावलास आणि अस तडकाफडकी आता हे सगळं तोडून चालला आहेस? मितेश तिच्या जवळ आला तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला,माझा नाईलाज झाला आहे ग रुची तू तरी समजून घे,आई माझी जुन्या विचाराची आहे पण मला वाटलं होतं माझ्या सुखा साठी ती आपल्या लग्नाला तयार होईल. मी तुला सोडून नाही चाललो आपण मित्र राहूच ना कायम! तिने आपला हात त्याच्या हातातुन काढून घेतला म्हणाली,नाही मितेश तुला हे नातं च नको आहे तर मैत्री तरी कशाला हवी,मी प्रेम केलंय तुझ्यावर ,तुला माझा जोडीदार म्हणून पहात आले ,नको हे मैत्री वगैरे हे उपकार पण नको आता. तू जा तुझ्या मार्गाने मी तुला अडवणार नाही कारण जबरदस्ती ने कोणावर नात लादता येत नसत. माझं मी पाहीन मितेश तू नको काळजी करुस,बाय अँड टेक केयर. प्लिज रुची दोन मिनिटं तरी थांब ऐकून घे ना माझं तो म्हणाला. सॉरी मितेश आता थांबून उपयोग नाही जाते मी, असे म्हणत रुची निघाली ,डोळ्यातुन अश्रू वाहतच होते ते थांबायचे नाव घेत न्हवते.

आज रुची पुन्हा एकदा पोरकी झाली होती.मितेश सोबत च दोन वर्षाच नात आज संपलं होत.मितेश घरी आला संध्याकाळचे सात वाजले होते,रुचिताला त्याने आज खूप दुखावले याची सल त्याच्या मनात होती तो अपसेट होता. आल्या आल्या त्याच्या आई ने सुमित्रा बाईंनी त्याला विचारले चहा घेणार आहेस का मितेश? नको काही माझी इच्छा नाही आई. आणि तो रूम कडे जाऊ लागला,तसे सुमित्रा बाई नी पुन्हा विचारले काय झाले तुझा चेहरा का उतरला आहे असा? आई काही नाही तुझ्या मना सारख करून आलो आहे रुची शी असलेले संबध तोडून आलो आहे. अरे मग इतकं अपसेट होण्यात काय आहे त्यात आई म्हणाली. आई मी खर प्रेम केलंय ग तिच्यावर उगाच दोन वर्ष टाईमपास नाही केला. हे बघ मितेश वेळ जाईल तसे हे प्रेम पण तू विसरून जाशील,प्रत्येक गोष्टीला विसरायला थोडा वेळ जाऊ द्यावा आणि तुला मुलींची काय कमी ? खूप चांगली चांगली स्थळ येतील तुला! आई म्हणाली. आई तुला नाही समजणार आणि रुचीला विसरणं आता तरी मला शक्य वाटत नाही तेव्हा प्लिज लगेचच स्थळ वगैरे पाहू नकोस. तुझे मी ऐकले ना आता माझे इतके ऐक असे बोलून मितेश रुम मध्ये गेला. खूप वाईट वाटत होतं त्याला पण आई असा पवित्रा घेईल याची स्वप्नात पण त्याला कल्पना न्हवती,रुची खरच संस्कारी सालस मुलगी होती प्रेमळ होती,तिची चूक फक्त इतकीच की ती विधवा होती. तिला तरी काय माहीत होते की निववळ पाच वर्षाचा तिचा संसार होता मध्येच अचानक विक्रम तिला सोडून जाणार होता,काय दोष यात तिचा? इकडे रुची पण घरी आली ती ही सैरभैर झाली होती,किती स्वप्न तिने मितेश सोबत रंगवली होती नवीन आयुष्याला सुरवात करणार होती पण आता हे काहीच होणार न्हवत. तिच्या आयुष्यात कोणाचंच प्रेम लिहिलं न्हवत,कदाचित! ती ही खूप रडली,मितेश सोबत घालवलेले क्षण क्षण तिला आठवू लागले,त्याला विसरणं तिला तरी अशक्य होतं कारण मना पासून दोघ एकमेकांवर प्रेम करत होते. रुचीला वाटले ही नाही की आजच्या 21 व्या शतकात सुद्धा तीच विधवा असणं तिच्या सुखा च्या आड येणार होत!! मितेश रुचीला रोज कॉल करायचा पण ती कॉल घेत नसायची कित्येकदा तिला ऑफिस सुटल्यावर त्याने भेटण्याचा प्रयत्न केला पण रुची भेटत नसे त्याला,आता भेटण्याने काय साध्य होणार आहे असा ती प्रश्न मितेश ला करत असे. मग हिरमुसला होऊन मितेश माघारी फिरायचा पण सई ची ही त्याला खूप आठवण येत असे,तिला ही भेटायचे नाही असे रुची ने सांगितले होते. मितेश ऑफिस ला जायचा आणि कंटाळून घरी यायचा,कशातच त्याचे लक्ष नसायचे त्याचा आनंद उत्साह जणू कुठे गायब झाला होता. अगदी एकलकोंडा झाला होता पण त्याची ही परिस्थिती सुमित्रा बाई पाहून ही न पाहिल्या सारख्या करायच्या,त्या त्यांच्या मता वर ठाम होत्या,आणि वेळ जाईल तसा मितेश रुचिता ला विसरेल असे त्यांना वाटत होते.

मितेश आणि रुचिता वेगळे होऊन आता सहा महिने होत आले होते. मितेश अधून मधून तिला कॉल करायचा प्रयत्न करायचा पण ती काहीच रिप्लाय देत नसे,मग तिच्या मैत्रिणी कडून मितेश तिची खबरबात ठेवायचा,ती कशी आहे याची चौकशी जरूर करायचा,आज ही त्याच प्रेम फक्त रुची वर च होत. रविवारी होता त्यामुळे मितेश उशिराच उठला होता त्याची आई नाष्टा ची तयारी करत होती. मितेश त्याच आवरत होता. बेल वाजली तश्या सुमित्रा बाई दार उघडायला आल्या,तर शेजारच्या देशमाने बाई आल्या होत्या. तुम्ही आणि सकाळी सकाळी काय काम काढलत या आत या,असे म्हणत सुमित्रा बाईंनी देशमान्यांना आत घेतलं. त्यांना बसायला सांगून चहा आणायला गेल्या. त्या म्हणाल्या काय हो मितेश कुठे आहे? आज सुट्टी ना त्याला. हो आहे तो नुकताच उठला आहे गेला असेल अंघोळी ला. सुमित्रा बाई चहा घेऊन आल्या म्हणाल्या,बोला काय म्हणता, तश्या देशमाने बाई म्हणाल्या,आमच्या रुपेश चा साखरपुडा आहे पुढच्या रविवारी त्याच आमंत्रण द्यायला आले आधी आपल्या सोसायटीत सांगू म्हणून आले. छान झाले ,मुलगी कोणाची आणि कुठे राहते? देशमाने -- मुलगी त्याच्या ऑफिस मधलीच आहे त्याची मैत्रीण आहे दोघांच प्रेम जमले मग काय आता लवकर लग्न लावून द्यायच. सुमित्राबाई -- मैत्रीण आहे का अच्छा नाव काय मग होणाऱ्या सुनेच ? देशमाने -- रिया सिंग आहे नाव ती दिल्लीत राहते आणि शिक्षण तिच इथेच पुण्यात झालं मग इथेच जॉब लागला . आई वडील तिचे दिल्लीत असतात. हे ऐकून सुमित्रा बाई म्हणाल्या,पण तुम्हाला कसे काय हे चालले म्हणजे मुलगी पंजाबी आहे. देशमाने --- अहो सुमित्रा ताई आपण आजपर्यंत मुलांच्याच सुखा साठी झटत आलो,त्यांना काय हवं नको पहात लहानाच मोठं करतो मग त्याचं सुख ,त्यांचा आनंद यातच आपला आनंद नाही का ? फक्त जात वेगळी धर्म वेगळा म्हणून मुलीला नकार द्यायचा मुलाचं मन मोडायच यात कसला शहाणंपणा! जात वेगळी म्हणून माणूस वेगळा होतो का? जर आपणच असे जाती भेद मानत राहिलो तर आपल्या सुशिक्षित असण्याचा उपयोग काय ? आज जग कुठं चाललंय आणि आपण तेच तेच जुने विचार घेऊन जगत राहिलो तर मुलाचं मन कोण सांभाळून घेणार ना आणि रिया स्वभावाने खूप छान आहे घरी आली होती सर्वांशी हसत मुख मोकळ्या मनाने बोलत होती हुशार आहे समंजस आहे आणि मुख्य म्हणजे रुपेश आणि रिया एकमेकांवर प्रेम करतात. आणि एखाद्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून नंतर फक्त जात वेगळी म्हणून नकार देणं हा पुरुषार्थ नव्हे,त्या जागी आपली मुलगी असती तर असा विचार केला ना तर मग सगळं सोपं होतं जात. चला मी निघते मितेश ला ही सांगा आणि नक्की या साखरपुड्याला. असे सांगत देशमाने बाई गेल्या. मितेश अंघोळ करून आला . सुमित्रा बाई नी त्याला नाष्टा दिला आणि म्हणाल्या,अरे त्या देशमाने काकू आलेल्या आता,त्यांच्या रुपेश चा साखरपुडा आहे त्याच आमंत्रण देऊन गेल्या. हम्म इतकंच बोलून मितेश नाष्टा करू लागला. सुमीत्रा बाई आपल्या एकुलत्या एक मुला कडे टक लावून पहात होत्या,त्याचे डोळे खोल गेले होते,बरेच दिवसात त्याने दाढी केली नवहती,उदास मलूल चेहरा दिसत होता,आपल्याच विचारात मग्न तो नाष्टा नुसता गिळत होता. हल्ली तो आई ला हे कर खायला आज हे दे डब्यात असा कुठला च हट्ट केला नवहता. त्याची ही अवस्था सुमित्रा बाई मूळे च झाली होती जणू तो हसणं विसरला होता जगणं विसरला होता. आई चे मन मोडायचे नाही म्हणून स्वताच्या मनाचे तुकडे केले होते. स्वताच आयुष्य रंगहीन केले होते पूर्वी असा नवहता मितेश असे सुमित्रा बाई ना वाटले किती आनंदी उत्साही आणि सारख गाण गुणगुणत राहायचा,मोठ्याने गाणी लावायचा मस्त जगायचा आणि आता हा कुठला मितेश मी पाहतेय? माझा मितेश कुठे हरवला ? नाष्टा झाला तसा तो परत रूम मध्ये गेला. सुमित्रा बाई ना देशमाने चे बोलणे आठवत राहिले, त्या म्हणाल्या तसे मुलाचं सुख हेच आपलं सुख ,मग मी मितेश च सुख हिरावून तर घेत नाही ना, माझ्या शब्दा साठी आनंदा साठी त्याने आपल्या प्रेमाची तिलांजली दिली,माझ्या शब्दा बाहेर नाही गेला आणि मी मात्र माझा हट्ट धरून बसले त्याच मन त्याचा आनंद याचा ही विसर पडला मला. मी खरच चुकीचे वागले आता लगेच मितेश कडे जाते आणि त्याला सांगते मला रुची सून म्हणून पसंद आहे. सुमित्रा बाई ना खूप हलकं वाटलं आणि त्या आनंदाने मितेश च्या रुम कडे आल्या. दार नॉक केले. तसा मितेश म्हणाला,ये आई दार उघडच आहे. त्या आत आल्या आणि मितेश च्या डोक्यावरून हाथ फिरून म्हणाल्या,मितेश माझे चुकले रे राज्या, आई काय बोलतेस आणि काय चुकलं.?मितेश माझे डोळे उघडले रे आता,मला हे पटले आहे की तुझे सुख तेच माझं सुख याचा मला विसर पडला होता. मला माफ कर आणि रुचीला घेऊन ये माझी सून बनवून. मितेश आनंदाने म्हणाला,आई म्हणजे तुला रुची पसंद आहे ना? हो रे बाळा मी चुकीचा विचार करत होते पण तुझ्या कडे पाहून उमगले मला की तुझं खर प्रेम आहे रुचीवर आणि तू नाही राहू शकणार तिच्या शिवाय. मितेश ने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला,थँक्यू आई सो मच.मितेश ला अस हसताना खूप दिवसांनी त्या पहात होत्या.आनंदाश्रू त्याच्या डोळ्यात आले. मितेश ने ठरवले की रुची ला काही ही न सांगता अचानक तिच्या घरी जाऊन तिला सरप्राईज द्यायचे.

दुसऱ्या दिवशी मितेश ऑफिस वरून डायरेक्ट रुची कडे निघाला. जाताना त्याने सई साठी मिठाई आणि कॅडबरी घेतली,रुचीला एक गुलाबाचा मोठा बुके घेतला कारण आज वेलेन्टाइन डे होता. रुची नुकतीच ऑफिस मधून आली होती . दाराची बेल वाजली तसे ती दारा कडे आली आता कोण आलं असेल असा प्रश्न पडला तिला. तिने दार उघडले आणि मितेश ला इतक्या महिन्यां नी पहात होती,खोल गेलेले डोळे ,थोडीशी उतरलेली तब्येत पण आता तो हसत उभा होता. रुची ने त्याला दारात च विचारले काय काम आहे का आलास तू इथे अजून काही बोलणं शिल्लक आहे का ? हो रुची पण आधी आत तर येऊ दे मला प्लिज. मितेश आत आला त्याला पाहताच सई आनंदाने ओरडत त्याचा कडे आली मितेश अंकल तू आलास म्हणत त्याच्या गळ्यात पडली. मितेश ने ही तिला जवळ घेतले म्हणाला,हो मी आलोय तुला भेटायला, हा घे खाऊ म्हणत त्याने त्याच्या बॅग मधून मिठाई आणि चॉकलेट सई ला दिले. सई ने ते घेतले आणि म्हणाली,थँक्यू अंकल आणि त्याला गालावर किसी दिली. रुची सई ला म्हणाली,सई आत जा तू आता. नाही ममा बघ ना अंकल किती दिवसानी आला आहे मला खेळायच त्याच्या सोबत. तसा मितेश म्हणाला,सई तू गुड गर्ल आहेस ना मग जा आत आणि मी बोलवेन ना तुला बाहेर ओके. सईने त्याचे ऐकले. रुची म्हणाली,मितेश कशाला आला आहेस,तुझ्या शिवाय मी कशी जगते आहे माझे काय हाल होत आहेत हे पाहायला आलास का? की तुझ्या नकाराने मी अजून पर्यंत जिवंत कशी काय राहिले,तर मिस्टर मितेश तुझ्या नसण्याने आम्हा दोघींना काही ही फरक पडला नाही,आम्ही छान मजेत आहोत समजले. रुची मला बोलून तर दे. काय बोलणार आहेस आता,काही बोलायला आपल्यात कोणतंच नात शिल्लक नाही उरलं. सो आता तू जा,उगाच त्रास देऊ नकोस,तुझ्या शिवाय जगण्याची सवय झालीय आता. अस म्हणत रुची चे डोळे भरून आले. मितेश तिच्या जवळ जात म्हणाला,रुची मला माफ कर मी खूप त्रास दिला तुला दुखवले. मग आता काय बाकी आहे मितेश रुची रागाने म्हणाली. तसा तो म्हणाला,आहे ना बाकी माझी एक गोष्ट तुझ्या कडे आहे ती मला परत दे मग मी जातो इथून. रुचीला समजेना कोणती गोष्ट आहे,ती विचारात पडली. तसा मितेश हसत पहात म्हणाला,रुची माझं हृदय तुझ्या कडेच राहिलंय ग ते परत न्यायला आलोय. म्हणजे ती म्हणाली,म्हणजे वाघाचे पंजे मॅड आपल्या लग्नला आई तयार झाली आहे डियर. तिला ऐकून धक्काच बसला ती म्हणाली काय म्हणालास पुन्हा सांग. तसा मितेश ने तिझा हात हातात घेतला म्हणाला,आई ला तू पसंद आहेस आणि ती आपल्या सुनेची आणि नाती ची घरी वाट पाहतये. खर बोलतो आहेस ना मितेश,तिने विचारले. हो अगदी तुझी शपथ. रुचीला हे ऐकून खूप आनंद झाला तिने त्याला घट्ट मिठी मारली,दोघे अगदी तळमळीने भेटत होते,. मितेश ने रुची चे अश्रू पुसले म्हणाला, खुश आहेस ना आता स्वीटहार्ट. हो मितेश खूप मिस केले तुला आता मला एकटीला सोडून जावो नकोस. नाही ग आता कधीच तुझ्या पासून सई पासून मी दूर जाणार नाही. अस म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केले. त्याने रुचीला तिच्या सोफ्या वर बसवले आणि म्हणाला,रुची बस इथे आणि डोळे बंद कर. अरे का पण मितेश? अग तू बंद कर डोळे आय हॅव अ सरप्राईज फॉर यु. ओके म्हणत रुची ने डोळे बंद केले. मितेश ने आपल्या बॅग मधून गुलाबाचा बुके काढला आणि रुचीला म्हणाला,उघड डोळे आणि स्वहता गूढघ्या वर बसला,रुचीला बुके देत म्हणाला,वूड बी माय व्हॅलेन्टाईन स्वीटहार्ट? ती म्हणाली,अरे हा,आज व्हॅलेन्टाईन डे आहे ना? येस माय डियर मितेश म्हणाला. तिने त्याला पुन्हा मिठी मारली म्हणाली आय लव यु मितेश .. आय लव यु टू डार्लिंग!!! आणि तेव्हाच सई बाहेर आली आणि म्हणाली,काय रे अंकल किती वेळ झाला तू मला आवाजच नाही दिलास. त्या दोघांना असे एकत्र पाहून सई थांबली ,तसे दोघे वेगळे झाले. सई ला इतके समजले की त्यांची आता गट्टी झाली आहे,ती म्हणाली,ममा अंकल शी तुझी बट्टी झाली ना. हो ग बाळा असे म्हणत रुचीने तिला जवळ घेतले सई ने तिच्या गालावर किस केले. मितेश म्हणाला,सई आता मला अंकल नाही डॅडा म्हणायचे चालेल ना. ओके डॅडा लव यु सई म्हणाली. मितेश ने दोघींना आपल्या मिठीत घेतले ,म्हणाला,बोथ ऑफ यु माय व्हॅलेन्टाईन,,,लव यु !!


Rate this content
Log in