Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Chandak

Inspirational

4  

Anil Chandak

Inspirational

घर एक मंदीर

घर एक मंदीर

1 min
673


स्पर्धेसाठी- काव्य (स्टोरी मिरर)

विषय-चित्रकाव्य, प्राँम्प्ट 18

भाषा- मराठी


प्रत्येकाला, असे वाटते,

 हक्काचे,घर असावे आपले!

आयुष्यभर,उराशी जपलेले,

घर,स्वप्नातले,मनातले !!1


घर, असावे  टुमदार,

खेळती, हवा  असावी!

घराबाहेर, फुलझाडांची,

एक,छोटीसी बाग असावी!!2


बचतीचा, मंत्र जीवनांत,

सदैव, मनांत  असावा!

वाऱ्यावरी,पैसा न उधळता,

योग्य जागी, गुंतवावा!!3


प्रत्येक  कुटुंबापोटी, फक्त,

एकच,  मुल   असावे !

वाढत्या, लोकसंख्येचा विचार,

सतत, ध्यानात  ठेवावे !!4


समाजात,जबाबदारीने वागावे,

स्वच्छतेची,कास धरावी!

सार्वजनिक, आरोग्याची जपवणूक,

आपल्यापासूनच , करावी!!5


आपल्या,कुटुंबातील,वृद्धजनांचा,

प्रेमाने,प्रतिपाळ करावा!

म्हातारपणाची, काठी होऊनी,

सुखाचा, वटवृक्ष  व्हावा !!6


मुलांना,संस्कार देण्याबाबत,

डोळ्यात,तेल घालून असावे!

आजची मुले,उद्याचे जबाबदार,

नागरिक, हे ध्यानी असच द्यावे !!7


प्रेमाच्या धाग्यात सारे घर,

स्नेह रज्जुत, बांधले जावे!

आपुलकी,एकमेका प्रती आदरभाव,

घराचे, मंदीर होऊन जावे !!8


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational