Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrs. Smita Vijay Shinde

Others

4.3  

Mrs. Smita Vijay Shinde

Others

नृसिंह तुझा जन्म मनोहर

नृसिंह तुझा जन्म मनोहर

1 min
210


हिरण्यकश्यपूचा पुत्र "प्रल्हाद" विष्णूचा परम भक्त |

दैत्य पिता हिरण्यकश्यपू करे त्यास परावृत्त ||

वैतागून दैत्याने घेतला त्याच्या वधाचा निर्धार |

कार्य सिद्धीस घेतला बहीण होलिकेचा आधार ||

आग करणार नाही भस्म असं होलीकेस वरदान |

होलीकेस केले दैत्याने स्वपुत्राला स्वाधीन ||

होलिका बैसली प्रल्हादस घेऊनी चितेवरी |

विष्णूभक्त तो वेडा तरीही प्रभुचेच नामस्मरी ||

विष्णूभक्तच तो थोर अग्नीही अखेर हारली |

घडले अपरिचित असे होलीकाच भस्म झाली ||

भक्ताची आर्त हाक ऐकुनी प्रभू झाले प्रसन्न |

वध असुराचा करण्यास प्रगटले खांबातून ||

घेऊनी नृसिंह अवतार प्रगटले वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिनी |

वध दैत्याचा करण्यास फाडले पोट नख प्रहारांनी ||

ताराया भक्तास घेतला चौथा अवतार |

विष्णू देवा "नृसिंह" तुझा जन्म मनोहर ||


Rate this content
Log in