Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Nannar

Horror Thriller

4.2  

Ajay Nannar

Horror Thriller

Wrong Turn

Wrong Turn

27 mins
1.2K


Wrong Turn.... 


आता 26 ऑगस्ट ची हि घटना… वेळ रात्रीचे ९.००.. ठिकाण नेरळ रेल्वे स्टेशन… रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांची वर्दळ अगदीच कमी होती… पण नेरळहून पुढे काही पर्यटन स्थळं आहेत…तिकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनचालकांची मात्र भाऊगर्दी झाली होती… ६ अनोळखी मित्र..पहिल्यांदाच भेटलेले..एकमेकांच्या स्वभावापासून अगदीच अनभिज्ञ.. कोण कधी काय करेल किंवा काय करू शकतो याचा किंचितदेखील अंदाज नाही… मंगेश(मंग्या) च्या वाढदिवसासाठी भेटलेले…

अचानक रोह्या(रोहित) ने overnight चा plan केला आणि किश्या(कृष्णा) ने तो overnight कुठे करायचा यावर शिक्का मारला.. माथेरान च्या आसपास कोथळगड नावाच्या एका किल्ल्यावर overnight करायचा बेत आखला गेला… हसीम ने त्यच्या मराठी शाळेची काच-कूच करीत करीत अखेर overnight करायचं मान्य केलं… सुब्या (सुबोध) ला काही पर्यायच नव्हता…

त्यांनी नेरळस्टेशन ला जेवण केलं, खाण्यासाठी काही खाद्य सोबत घेतलं.. आता कोथळगड ला जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यात खाजगी वाहनाने आणि उरलेल्या रस्त्यात रेल्वे track ने पायी जायचं ठरलं… पण कोथळगड नक्की कुठे आहे याबद्दल कोणालाच माहिती नव्हते..मग काय तोंड तर सोबत होतेच कि… त्यांनी तिथेच उभ्या असलेल्या वाहनचालकांना कोथळगडच्या च्या रस्त्याबद्दल विचारले असता वेग वेगळी उत्तरं मिळाली ती ऐकून ह्या ६ जणांच्या बोऱ्या उडाल्या…!! ६ हि जन full on confuse झाले…आता काय करायचे??? एवढ्यावर येऊन पुढचा plan रद्द तर करता येणार नव्हता. मग आता पुढे काय?? तरी कृष्णा ने, इतर चालकांपासून दूर उभ्या असलेल्या एका माणसाला कोथळगडाविषयी विचारले असता त्याने, तो गड माथेरान च्या डोंगरांमधून पुढे माथेरानच्याच विरुद्ध दिशेला असणाऱ्या डोंगरात आहे, असं अगदी ठामपणे सांगितलं. आता अशा द्विधा मनस्थिती मध्ये जी व्यक्ती ठामपणे बोलत असेल अशा व्यक्तीवर आपले मन लगेच विश्वास ठेवला.. त्यांनीदेखील हेच केलं.. त्या अनोळखी वाहनचालकावर अगदीच सहजतेने विश्वास ठेवला… आणि इथेच यांची फसगत झाली…


ज्या वाहनचालकाने त्यांना कोथळगडाविषयी माहिती दिली त्याच्याच गाडीत हे ६ जण बसले आणि दंगा मस्ती करीत करीत गाडी घाट चढू लागली. रोह्या आणि सुब्या पुढे त्या चालकाजवळ बसले होते..रोह्या ची मस्ती चालली होती पण सुब्या मात्र अगदीच शांत बसला होता..त्याचं त्या वाहनचालकाकडे आणि त्याच्या हालचालीकडे एकदम बारीक लक्ष होतं. रोह्यानं सुब्याला २-३ वेळा गप्पा मारण्यासाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न केला पण सुब्यानं रोह्याकडे रागाचा कटाक्ष टाकला..रोह्याला सुब्याच्या त्या कटाक्षात एक प्रकारची गोपनीयता दिसली आणि रोह्या घाबरून पूर्ण घाटात गप्प बसला.. सुब्याची शांतता म्हणजे जणू तो त्या चालकाकडून संमोहितच झाला होता, इतकि भयानक वाटत होती..


मधेच थंडीची झुळूक अंगावर शहारे आणत होती… सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती कि, ‘आज रात्रभर full on धिंगाणा… खूप सारी मस्ती आणि खूप साऱ्या गप्पा-गोष्टी आणि बरेच काही…


घाटात गाडी एकेक वळण घेऊन चढत होती. एक वळणावर चालकाने जोरदार ब्रेक मारून गाडी थांबवली. किशा आणि हसीम त्याला विचारू लागले काय झालं म्हणून??? त्याने दोघांकडे front rear mirror मधून पाहिलं…त्याची ती करडी नजर अनुत्तरीत होती.. त्याने मारलेल्या त्या जोरदार ब्रेकमुळे जणू सुब्याचं संमोहन भंग पावलं होतं आणि सुब्या जागा होऊन विचारत होता काय झालं???


तो चालक म्हणजे एक भयानक प्रकार होता. आख्ख्या रस्त्यात एक शब्दाने देखील बोलला नाही. त्याचा अवतारदेखील एकदम भयानक होता. दाढी वाढलेली. अंधारातसुद्धा त्याचे डोळे लाल पानावाल्यासारखे दिसत होते.. ओठ काळपट लाल होता.. गळ्याभोवती एक काळा मफलर गुंडाळलेला, आणि तसाच मफलर डोक्याभोवती देखील बांधलेला.. थंडी असूनदेखील शर्ट ची वरील २ बटणे उघडीच!!! असो, त्याने गाडी थांबवाल्यानंतर लगेच घाईतच गाडीतून खाली उतरला. आणि आम्हाला काहीच न बोलता फक्त मान हलवून ग्दीतून खाली उतरण्याचा इशारा केला. त्याचे हावभाव पाहून अगोदरपासुनच भित्रा असणारा सुश्या(सुशील) मात्र अजूनच घाबरत होता. त्याने तर हनुमाननामाचा जापच चालू केला होता.

असो,

ते ६ हि जण गाडीतून उतरून त्या चालकाला पैसे देऊन त्याला पुढील मार्ग कसा, आणि कुठून जातो ह्याची विचारणा करताच त्याने त्याचे तोंड उघडले.. प्रवासादरम्यान त्याने बोलण्याची हि पहिलीच वेळ होती.त्याने शब्द उच्चारताच मंग्याच्या अंगात थंडीच भरली.मंग्याला जणू कापरंच भरलं, त्याला त्या चालकाच्या आवाजातील भयानकता प्रकर्षाने जाणवली. त्याने चालकाचा आवाज ऐकताच दोन पावले मागे सरकण्याचा पवित्रा घेतला. त्या चालकाचा आवाज आता अतिशय घोगरा आणि मागच्यापेक्षा खूप वेगळा (भीतीदायक) भासत होता. सुश्या आणि मंग्या यांच्यात डोळ्यांतल्या डोळ्यांत काही इशारे झाले… त्या चालकाने त्यांना एका रेल्वे track कडे बोट दाखवले आणि सांगितले कि ह्या track ने सरळ एक तास चालत राहा, एक तासाभरात कोथळगड येईल… ह्यांनी आपल्या माना होकारार्थी हलवल्या आणि त्या चालकाला thank you म्हणून पुढे त्या track वर जाऊन उभे राहिले.


पाण्याच्या प्रवाहात भोवऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्या पानाला कुठे माहित असतं कि त्याचा प्रवास विनाशाकडे होत आहे. अशीच काहिशी गात ह्या 6 मित्रांची झाली होती. इथे नियतीने त्यांची दुसऱ्यांदा फसगत केली होती… एक खेळ त्यांसोबत खेळला जात होता.. त्याचा सूत्रधार कोणीतरी भलताच होता.. हे ६ जण म्हणजे, “शिकारी एक आणि शिकार अनेक”,अशी गत ह्या ६ जणांची होणार होती..


सगळे उभे असतानाच सुश्या चे एका फलकावर लक्ष गेलं.. त्याने तो फलक मोबाईल च्या उजेडात पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावर “track no 134” असं लिहिलेलं त्यास दिसलं.. त्याच्या मनात एक शांतता निर्माण झाली… त्याला मधेच कुठल्या horror मालिका किंवा पुस्तकाची आठवण झाली असावी!


वेळ साधारण रात्रीचे १०.३० झाली होती. हवेतल गारवा वर-वर चढत हिवाळ्याची जाणीव करून देत होता. लक्ख चंद्र्पकाश असूनदेखील(ते चालत असलेला रस्ता दिसण्याइतपत) ते ६ मित्र काळ्या वावटळाच्या गर्द छायेत चालत होते. चालता चालता त्यांनी त्या डोंगराचे एक वळण पूर्ण केले आणि चंद्र त्यांच्या विरुद्ध बाजूला गेल्याने तो त्या डोंगरआडोशाला झाकून गेला… आणि जवळपास पूर्णवेळ असणारा तो मंद चंदेरी प्रकाश आता अंधारात बदलला होता.. तो अंधार एक भयानकता निर्माण करीत होता. ह्या लोकांच्या गप्प रमल्या होत्या…


त्या अचानक येणाऱ्या काळोखाने त्या गप्पा मंदावल्या होत्या.. मंदावल्या कसल्या??? पूर्ण बंदच झाल्या होत्या.. वातात्वारणात एक गंभीरत आली होती.. सगळे जण रेल्वे रुळावरून जोडीने चालत होते..सगळ्यात पुढे कृष्णा आणि सुबोध होते.. त्यांच्यामागे गारठलेला मंग्या आणि भिलेला रोह्या, आणि सगळ्यात शेवटी हनुमाननामाचा जाप करणारा सुश्या आणि सुश्यावर हसणारा हसीम असे सगळे चालत होते… रोह्या ला इतर गोष्टींपेक्षा त्या भयावह अंधाराचीच जास्त भीती वाटत होती..


मनातल्या भयकारांना अंधारात स्वैर स्वातंत्र्य मिळते आणि तेच आकार प्रत्यक्षात आले तर माणसाची भीतीने बोबडी वळते… रोह्या त्यापैकीच एक होता…. मधेच थंडीची एखादी झुळूक वातावरण भयावह कारला पुरेशी होत होती… आणि थंड जुळूकेने देखील सुश्या ला घाम फुटत होता…

रेलेव रुळावर मधेच खड्डे येत होत होते आणि त्या खड्ड्यांवरून हे रेल्वेरूळ जात होते… अशाच एक खड्ड्यावर रेल्वे रुळात सुश्याचा पाय अडकला.. इथूनच खेळ सुरु झाला त्या ६ मित्रांच्या जीवघेण्या overnight चा!!


सुश्याचा पाय रेल्वे रुळात अडकलेला पाहून त्याच्याबरोबर चालत असलेला हसीम घाबरला आणि त्याने बाकीच्यांना आवाज दिला.. त्याच्या त्या आवाजाने अंधारातील शांतता भंग पावली होती. सुश्याच्या तर डोळ्यातच पाणी आले होते. स्ब्या, किशा, रोह्या आणि मंग्य तिथे जमा झाले होता, सुब्या ने त्याच्या मोबाईल चा torch on केला. त्याने तो torch सुश्याचा पाय अडकलेला तिथे मारलं. त्याच्या पायाला थोडीशी जखमा झाली होती. त्यात घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. थोडंसं रक्त येत होतं..

पण…


इतक्यात सुब्याने जोरात किंकाळी फोडली…. त्याच्या त्या किंकाळीने सगळेच भेदरून गेले, कि ह्याला झाला तरी काय?? माथेरान च्या अंधार डोंगररांगेत त्याच्या त्या किंकाळीचे प्रतिध्वनी उमटू लागले. तो क्षण अतिशय भयावह होता.. त्या किंकाळीने जणू त्यांच्यावरील भीतीचे सावट जणू अजूनच गडद केले होते…सुब्याच्या त्या विस्मित

किंकाळी ने झोपलेले रातकिडे जणू जागे झाले आणि कीर – कीरु लागले… कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज जोर धरू लागला होता.


सुब्या ने ओरडतच सुश्याचा पाय जिथे अडकला होता त्या खड्ड्याकडे बोट दाखवून इशारा केला….


मोबाईल चा उजेड देखील अपुराच होता त्या उजेडात त्यांना दोन लाल रंगाच्या गोल (हिरेसदृश) वस्तू चमकल्यासाखे दिसत होते…त्या वस्तूची चमक मनमोहून टाकणारी आणि तितकीच भयानक होती.. सर्वांनी सुश्याचा पाय तिथून काढायचा प्रयत्न चालू केला… सुब्याचे त्या दोन हिऱ्यांवरून लक्ष काही केल्या हटत नव्हते.. सुश्याचा पाय तिथून काही केल्या निघत नव्हता.. मंग्या आणि सुश्या खुप घाबरले होते. रोह्या सुश्या ला धीर देत होता… आणि किशा आणि हसीम सुश्याचा अडकलेला पाय मोकळा करण्यात गुंतले होते… इतक्यात मंग्याने देखील त्याच्या मोबाईल चा torch on करून सुश्याच्या पायावर उजेड टाकला आणि आता मात्र सगळ्यांची बोबडीच वळली…कारण त्या चमकणाऱ्या दोन वस्तुंची हालचाल होत होती.. मंग्या ने त्याचा मोबाईल त्या वस्तूच्या अजून थोडा जवळ नेला आणि त्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं ते शब्दांत खरच वर्णन करण्यासारखं नाहीये… त्या चमकणाऱ्या दोन गोल गोष्टी दुसरं तिसरं काही नसून तिथे एक काळ मांजर होतं.. जे कि अस्पष्ट दिसत होतं, आणि त्या मांजराच्या समोर काही मांसाचे तुकडे पडले होते.. ते पाहून सुश्याने पायाला जोरात हिसका दिला आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याचा नख उखडला गेला,.. तो जोरात ओरडला… त्याच्या अंगठ्यातून रक्ताची धार लागली होती, खड्ड्यातील मांजराने त्याच रक्ताच्या धारेला तोंड लावले… ते पाहून सुश्याचा तर पारच धीर खचला…. सुश्या आता थरथरत होता… त्याची बोबडी वळली होती..सगळेजण घाबरून गेले होते… मंग्या ला तर जणु कापरंच भरलं होतं..


सुश्याचा पाय तिथून कसाबसा निघाला.. खरच एवढं घाबरून देखील धीरानं वागणाऱ्या सुश्याच्या तेवढ्या धाडसाची दाद द्यायलाच हवी… एवढा घाबरून देखील त्याने भीतीला स्वतःवर हावी होऊ दिले नाही हेच लाखमोलाचं धैर्य!!


एवढं सगळं घडत होतं.. सगळी पोरं घाबरली होती… किशाला या गोष्टींची सवय आणि माहिती असल्यामुळे तो त्याची भीती लपवत होता.. हसीमच्या हलक्या फुलक्या विनोदातून हा गंभीर प्रसंग झाकून जात होता… मंग्या पण वातावरण हलकं करायचा प्रयत्न करत होता.. पण रोह्या त्याची भीती लपवू शकट नव्हता. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. आपण खूप मोठ्या भानगडीत अडकणार हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलं होतं.. आणि सुब्या एवढं सगळं घडत असताना शांत कसा काय बसू शकत होता काय माहित?? पण तो असा नव्हता मुळात..कसल्या ध्यानात मग्न होता तो कोणास ठाऊक.. घडले त्याचं न दुख: होतं न क्लेश न भीती ! त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते ! त्याचा चेहरा भावशून्य होता !


सुशील चा पाय आता त्या track मधून सुटला होता. तो अगदी घामाघुम झाला होता, त्याच्या डोळ्यांत पाणी होते. भीती होती. पण पायाचं थोडक्यात निभावाल्याचा आनंददेखील होता. पण आनंद देणारे क्षण हे ” क्षणभंगुर” असतात ह्याची कदाचित त्याला कल्पना नव्हती. आताशी कुठे सुरवात झाली होती. ते “जे” कशाच्या जाळ्यात अडकत होते, हि त्याची केवळ एक पूर्वकल्पना, एक झलक होती… असली खेळ तर अजून बाकी होता…..


सुश्या च्या पायातील नखातून येणारी रक्ताची धार थोडी कमी झाली होती…त्याला त्या जखमेच्या वेदना कमी होत्या आणि भीतीच्या वेदना जास्त होत्या. त्याला भानच नव्हतं कि त्याच्या पायाला काही जखम आहे. सुब्या अजून शांत होता. जणू एक ध्यानस्थ साध्वीच!! त्याचं फक्त शरीर तिथं होतं, मन कुठे होतं काय माहित??? असो, त्या 6 मित्रांचा विनाशाकडील प्रवास आता अजून गंभीर होत चालला होता.. एवढं सगळं घडून सुबोध अगदीच भावशून्य होता, उलट किश्या चिंतातूर होता. त्याला कदाचित माहित असावं कि आता इथपर्यंत येऊन पुन्हा माघारी जानेदेखील धोक्याचे… हसीमचे मात्र अस्सल पुणेरी जोक चालूच होते आणि त्यावर मंग्या आणि सुश्या बळच हसल्यासारखे हसत होते. पण मनात भीती हि होतीच…

ते हळू हळू पुढे वाटचाल करीत होते, तस-तशी त्यांच्यावरील सावटाची छाया गडद होत चालली होती.. काही वेळापूर्वी सुश्यासोबत जे काही घडलं त्यातून सगळेजण सावरले होतेच… सुश्याची भीतीमधून काही सुटका होत नव्हती.. सगळे आता शांत होते… ते लोक पुढे पुढे चालत होते.. त्यांना आता पाऊलो-पाऊली भीती वाटत होती पण त्या गर्द रात्री त्यांना पुढे चालत जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.

चालत चालत ते एक वळणावर आले आणि त्यांनी एक डोंगर पार केला त्यामुळे काही वेळ त्यांच्या डोक्यावर असणारा चंद्र आता त्या डोंगराआडोशाला गेला आणि त्यांच्यावर अंधारी छाया पुन्हा पसरली.. ते पुढे चालत एक वळणावर येऊन पोहचले.

कळत न कळत वातावरणात अमानवीय शक्तींचा वावर असल्याचे जाणवत होतेच…. मध्येच कोणीतरी कृष्णाच्या पायावर पाय देऊन त्याच्या बाजूला गेल्याचा भास त्याला झाला… तो क्षणभर बिचकला…

पण तो सगळं जाणून अंजान होऊन चालत होता.. कारण त्याला माहित होतं कि जर त्याने ह्या गीश्तीची वाच्यता केली तर सगळे अजूनच घाबरतील… म्हणून तो शांत होता.. !

वेळ अघोरी झाली होती. आतापर्यंत सगळं जणू एखाद्या तांडवाच्या सुरवातीप्रमाणे घडत आलं होतं.. भीतीने सगळ्यांच्या मनावर जणू अधिराज्य करायचा बेत आखला होता… सुब्या ची शांत साधी ह्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय होती. त्याने नेरळपासून चकार शब्द देखील उच्चारला नव्हता. आणि त्यातच भर कि काय म्हणून, सुष्याला पायाला वेदना होऊ लागल्या होत्या… कोणाला कळो न कळो पण किश्या ला कळून चुकले होते कि, हा प्रवास त्यांच्या विनाशाकडे चालू आहे… आणि ह्यातून हाती काहीच लागणार नव्हते….

चालत चालत ते एक वळणावर येऊन थांबले… ते वळण जरा विक्षिप्तच होते… त्या वळणावर track च्या दुतर्फा असणाऱ्या झुडूपांनी एक बोगादाच तयार केला होता. तो झाडेरी बोगदा एखाद्या असली बोगाद्यासारखा भासत होता.. त्याच्या अलीकडेच कोणीतरी वृद्ध व्यक्ती बसला आहे असे सतत वाटत होते… त्यांना ते कदाचित त्यांचे भ्रम असावे असे वाटले… म्हणून पुढे जाण्याच्या हेतूने त्यांनी काही पाऊले पुढे टाकताच….

ती वृद्ध व्यक्तीने तिथून हालचाल केल्यासारखी दिसली… ति व्यक्ती उठून त्या झाडेरी बोगद्यात कुठेतरी दिसेनाशी झाली. आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्ष कुणीतरी व्यक्ती दिसण्याची हि पहिलीच वेळ होती… सगळ्यांची जाम फाटली पण हसीम मात्र मस्करीच करत होता…. ते सगळे अजून थोडे पुढे म्हणजे अगदी त्या बोगद्याजवळ येऊन थांबले तिथे त्याने काहीतरी विलक्षण बदल जाणवू लागले..

ते सगळे जगाच्या जागीच थांबले… त्यांना वातावरणातील बदल प्रक्स्र्षाने जाणवू लागले… किश्या, हसिम, मंग्या नी रोह्या ला तिथे उष्णता जाणवत होती उलट सुश्या आणि सुब्या यांना थंडी जाणवत होती.. म्हणजे काहीतरी विक्षिप्तपण तेथीळ वातावरणात होते हे नक्की… सुश्याने थंडी वाजत आहे असे सांगून हसीम कडील उबदार स्वेटर काढून स्वतःच्या अंगावर घेतले.. सुब्याची देखील समाधी आता भंग पावली होती…

त्याच्या तोंडून आता गुरगुरण्याचे आवाज येत होते.. मंग्याला वाटले कि सुब्या मस्ती करतो आहे म्हणून मंग्या ने सुब्या जोरात शिव्या घालायला सुरवात केली. मंग्या च्या आवाजाचा जोर मोठा होता… सुब्या ने रागाने मंग्याकडे एक कटाक्ष टाकला..मंग्याच्या शिव्यांचा जोर हळू हळू ओसरू लागला… मंग्या सुब्याकडे पाहून घाबरला.. सुब्याच्या डोळ्यांत त्याने भयानकता पहिली होती.. ती भीती तो विसरुच शकत नव्हता.. तो असा एकदम शांत झाला कि त्याने पुन्हा तोंडच उघडले नाही…

ते सगळे आता त्या बोगद्याच्या तोंडावर उभे होते.. त्या बोगद्याच्या आजूबाजूला एक चपळाईने हालचाल झाली… जणू एक बाजूने दुसऱ्या बाजूकडे कोणीतरी धावल्याची हालचाल तिथे झाली… आजूबाजूला असणाऱ्या झाडांची पाने हलु लागली… झाडांच्या फांद्यांमध्ये एक हालचाल निर्माण झाली जणू एखादा सर्प तिथे वळ-वळत असावा… पण तो कोणी सर्प किंवा प्राणी नव्हता…. ती अमानवी शक्तिची झलक होती.. जिने आतापर्यंत सुब्या तिच्या वशिकरणात डांबून ठेवले होते…. झाडांच्या फांद्या हळू -हळू वेग घेऊ लागल्या… आणि झपाट्याने सळसळत येऊन त्या बोगद्याच्या दोन्ही कडांवर जणू एखादी मानवी रूपातील द्वारपाल बसावेत त्याप्रमाणे पसरल्या आणि शांत झाल्या… त्या बोगाद्याजवळ जाण्याची हिम्मत कोणाची होत नव्हती.. मंग्याचा धीर पूर्णत: खचला होता.. हसीम ने त्याची खिल्ली उडवत त्याला पुढे बोगद्याजवळ जाण्यास प्रवृत्त केले.. इज्जतीचा प्रश्न उभा ठाकल्याने मंग्याने तेवढी हिम्मत केली…

आणि मंग्या काही पाउले पुढे चालला इतक्यात….

त्याच्या मागून उष्ण प्रज्वालांचा एक गोळा सपकन् येऊन मंग्याच्या पुढे पडला.. जणू मंग्याची वाताच त्या आगीच्या गोळ्याला अडवायची होती… कोणाला काहीही कळायच्या आत मंग्या गेल्या पावलाने दुप्पट वेगाने परतला.. त्याला अगदीच चिमटीचं अतर धावून देखील धाप भरली होती, हे विशेष… मंग्याच्या डोळ्यांत भीती त्याच्या गळ्याशी आल्याची चित्रे दिसू लागली.. त्याला तो धक्का सहन होत नव्हता आणि पचवताहि येत नव्हता… भित्ने त्याची गाळण उडाली होती… त्याला काय बोलावे अन् काय नको तेच सुचत नव्हते…

हसीम ने वेळेचं गांभीर्य ओळखून रोह्याच्या bag मधील पाण्याची bottle काढून मंग्या ला पिण्यासाठी दिली… मंग्या अधाश्यासारखा पाणी पित होता… त्याला घाबरलेला पाहून सुश्या अजूनच घाबरत होता…

आता मात्र पूर्ण प्रवासात न घडलेली घटना घडत होती…

ती पाहून सगळेच अवाक् झाले होते…..

आता ह्या सगळ्यांसमोर एक घटना अशी घडत होती जी अख्या प्रवासात घडली नव्हती…

सुबोध काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.. जणू तो मुकाच होता… तो जीव लावून बोलण्यासाठी पराकाष्टा करत होता, पण त्याच्या तोंडून काही केल्या शब्द फुटत नव्हते.. हसीम थोडी हिम्मत करून सुबोध चा हात कृष्णा च्या हातातून वेगळा केला आणि सुबोध ला जवळ घेऊन, सुबोध ला बोलण्यासाठी प्रवृत्त करू लागला…

हसीम जवळ येताच सुबोध थोडा शांत झाला…

जणू तो हसीम ने जवळ येण्याचीच वाट पाहत होता….

हसीम जवळ येताच तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसीम ला लिपटला.. हसीम देखील त्याला जवळ घेऊन, नक्की काय झाले आहे ते विचारू लागला… हसीम नं सुबोध वरील नजर हळूच किष्याकडे फिरवली….

आणि डोळा मारून स्मितहास्य केलं…. त्यावरून हसिमच्या मनात अजूनही मस्तीचाच बेत होता… हे प्रतित होत होतं… पण पुढे येणाऱ्या काहीच क्षणात हसिमची मस्ती जिरणार होती…

हसिम ने सुबोध ला जवळ घेताच सुबोध च्या शरीरात काय तर-तरी स्नाचारली कोणास ठाऊक… सुबोध ने हसीम ला एक जोरदार धक्का दिला…

त्या धक्क्याचा आघात इतका प्रचंड होता कि हसीम रेल्वे track वरून दरीच्या टोकावर.. म्हणजे साधारण २ ते २.५ फुटांवर जाऊन पडला. त्याची सगळी मस्ती सुब्या च्या एका धक्क्यातच जिरली अस्म तरी त्याच्या तोनादारून वाटत होतं…

हसीम नं मान खाली घातली अन उठून किश्यासमोर येऊन थांबला…. सगळं शांत…

सुब्या मात्र निर्लजासारखा उभा होता.. त्याने त्याची नजर हसिम वर रोकून धरली होती… त्याच्या नजरेत ज्वलंत लाव्हा धुमसत होता… कधी फुटेल अन् कधी बाहेर येईल काही सांगता येत नव्हतं…त्याची नजर काळाचा घाव घेत होती.. नजरेत कमालीची धार होती…

सगळं वातावरण आघाडी निर्मनुष्य सहवासात गेलं… निरव शांताता पसरली…

सगळं शांत होतं… सुकलेल्या झाडांचा पालापाचोळा क्षीण आवाज करत होता…

हिवाळ्यात पाने गळालेली झाडे मानवी सापळ्याप्रमाणे भासत होती… सगळं काही भयानक होतं…

त्या खोल दरीत घुमणाऱ्या त्या वाऱ्याचा आवाज काळजात घाव करून जात होता….. प्रचंड भयानकता निर्माण करणारा तो वारा अंगावर शहरे आणत होता…. कदाचित पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल त्या वाऱ्याला असावी…

सुशील हे सगळं पाहत होता… त्याचे हावभाव काही बदलत नव्हते… त्याचं म्हणनं एकच होतं… कि इथून ताबडतोब सुटका करून घेणं…. कारण तो आधीच घाबरट जीव आणि त्यात हे सगळं पहिल्यांदा अनुभवलेलं… त्यामुळे त्याची पुरती लागली होती…

तिथल्या भयाण शांततेची जागा आता कृष्णा च्या आवाजाने घेतली…

कृष्ण ने करड्या आवाजात पुढे निघण्याची सूचना केली…

पुढे निघाण्याशिवाय कोणाकडेच काहीच पर्याय नव्हता… पण आता सुब्या ला अशा अवस्थेत एकट्याला चालायला लावणे म्हणजे पेटत्या विस्तवावर पाय ठेऊन चालण्यासारखे होते…

ह्या सगळ्यांत किश्या अन् रोह्या दोघंही शरीरयष्टीने धिप्पाड होते..त्यामुळे किश्या ने अन् रोह्या ने सुब्या दोन्ही बाजूला पकडून पुढे जायचे ठरले… रोह्या बिचारा आधीच सुब्या च्या जवळ देखील जायला घाबरत होता… आणि आता तर त्याला सुब्या ला धरून चालायचा होतं… म्हणजे…. मिळवलं का?? किश्या ने त्याला choice च सोडली नाही.. आणि दुसरा काही पर्याय तर नव्हताच…

हसिम,मंग्या आणि सुश्या पाठीमागून चालत होते…

सगळ्यांनी दबक्या पावलांत त्या जाडेरी बोगदासदृश गोष्टीमध्ये प्रवेश केला… हळू-हळू चालत होते सगळे… अचानक तिथल्या वातावरणामध्ये भयानकता जाणवू लागली… निसर्गाचे सगळे लिखित नियम तिथे उल्लंघाले जात होते… वातवर इतके तप्त झाले कि भर हिवाळ्याच्या रात्री सगळ्यांना दरदरून घाम फुटला… आता वातावरणा त्याचा जलवा दाखवू लागलं होतं…

इतकं भयानक वातवरण त्या आवारात निर्माण झालं होतं कि खरंच… त्याचं वर्णन करताना देखील किळस येईल… अतिशय घाण होती त्या track वर.. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती…जणू काही मानवी मृतदेह दिवसेंदिवस सडलेत तिथे… इथं अमानवीय शक्तींचा जणू सूळ-सुळाटच होता असे आभास होत होते…मधेच कुत्री भुंकून जीवाचा ठाव घेत होते.. रातकिडे रात्रीची भयानकता दर्शवत होते…कानाजवळ कोणीतरी गुर-गुर्ल्यासारखे भास चालू होते… सगळ्यांना या गोष्टीच खूप त्रास होत होता… क्षणात वातावरण पुन्हा थंड झालं.. अगदी पुरवत… पण मध्येच पुन्हा उबाळी येत होती… निसर्गाने देखील जणू गुडघेच टेकले होते ‘त्या’शक्तीपुढे… आणि जणू त्या मित्रांना गुदमरून मारण्याचा ठरावंच झाला होता…

एवढं सगळं घडत होतं…

पण..

एक माणूस शांत होता…

त्याला त्याचं काहीच नव्हतं वाटत…

उलट तो त्याच्या त्या नजरेने सगळ्यांवर मानसिक हल्लाच चढवत होता…

सुबोध…..

हं… त्याला ह्या दुर्गंधी चं.. वाढलेल्या तापमानाचं काहीच विशेष वाटत नव्हतं…हळू-हळू जस-जसे ते पुढे जाऊ लागले वातावरण पूर्ववत होऊ लागले… दुर्गंधी देखील कमी होऊ लागली…

जसा जसा अंधार वाढत होता… तास-तशा हा खेळ वाढत चालला होता….

आधी सुश्या, मंग्या, सुब्या, हसीम आणि आता रोह्या वर काहीतरी संकट येणार होतं… किन्वा त्याच्या मुले कोणाच्यातरी जीविताला धोका निर्माण होणार होता…

आता तोह्या चं डोकं प्रचंड दुखायला लागलं… त्यानं सगळ्यांना थांबवलं.. आणि हसीम कडून पाणी घेऊन प्यायला… त्याला कृष्णा ने एका जागी बसवलं… त्याला जरा बरं वाटलं… म्हणून ती लोकं उठून पुन्हा रस्त्याला लागली…

चालता-चालता रोह्याला अचानक काय झाले कोणास ठाऊक.. रोह्याने सुब्या चा हात सोडला आणि दरीच्या टोकावर जाऊन उभा राहिला…

किश्या ने स्वत:च्याच डोक्यावर हात मारून घेतला…त्याच्या मनात, ‘ कुठून दुर्बुद्धी सुचली आणि येड्याना कोथळगडावर घेऊन आलो…’

रोह्या बराच वेळ दरीच्या खालील भागाकडे निरखून पाहत होता… तो पण आता कोणत्यातरी शक्तीकडून संमोहित झाला असावा…(???)

रोह्या ने दरीकडील समोरच्या भागाकडे बोट दाखवत किशाला आवाज दिला…

‘ए किश्या… अबे हिकडं ये जरा..’

किश्या काही त्याच्याकडे गेलाच नाही…

रोह्याने रागाने एक कटाक्ष टाकला.. रोह्याचे डोळे लालबुंद झाले होते… त्याची भीती अंधारात देखील वाटली असावी…

‘ए किश्या तुला म्हणतोय न हिकडं ये म्हन..कळत न्हाय का बैलाच्या..’… रोह्याने पुन्हा किश्याला दम टाकला…

पण आता येणारा आवाज रोह्याचा नव्हताच… हे किश्याला लक्षात यायला वेळ नाही लागला…

किश्याने प्रसंगावधान राखून रोह्याकडे जाण्याचा शहाणपण दाखवला…

रोह्या ने किश्या कडे पाहून एक ज्वलित हास्य केलं आणि पुढे बोट दाखवत म्हणाला…

‘किश्या त्यो रस्ता दिसायला का तुला…??? त्यो रस्ता सरळ गेलं कि कोथळगडावर जातू… चल तू ये माझ्या मागे… ‘ असं म्हणत रोह्या दरीत पाऊल टाकतच होता कि, किश्याने त्याचा हात धरला आणि मागे खेचून खाड्कन् कानाखाली मारली…

रोह्याची जणू १० जन्माची झोपच मोडली… तो शुद्धीवर आला… त्याच्या डोळ्यांत पाणी होतं…

हसीम न मात्र यावेळेस रोह्याला जवळ घ्यायचं धाडस नाही केलं… पण मंग्या ने रोह्याला सावरला….

इतक्यात सुब्या बोललाच….

”कोण नाही वाचणार तुमच्यातलं, कोण नाही वाचणार… तुमचं मरण तुम्हाला इथं घेऊन आलंय… तुम्ही इथपर्यंत आलात तर खरं… पण परत नाही जाणार…’

त्याचं हास्य कर्कश्य होतं.. आवाजात पळून-पळून धाप लागल्यासारखे कंपण होतं… अगदीच भयावह होतं…

पण…

हा आवाज सुबोध चा नव्हताच…

(किश्याची एखाद्या अमानवी शक्तीसोबत भाष्य करायची पहिलीच वेळ होती…उभ्या आयुष्यात त्याने फक्त असे किस्से ऐकलेच होते… अनुभवायची पहिलीच वेळ.. पण तो जाणून होता.. जो घाबरला तो गेला… जो घाबरून पण टिकला… तो जिंकला… म्हणूनच त्याने सुब्या (???) सोबत बोलण्याचे अतिउच्च धाडस केलं होतं…)

आता मात्र किश्या चा एवढा वेळ राखलेला संयम तुटला…किश्या तटकन उभा राहिला आणि सुब्या जवळ जाऊन..

”आहेस तरी कोण तू??? काय हवय तुला आमच्याकडून???का त्रास देतोय तू आम्हाला…??”, किश्या बोलला… किश्याने सुब्याकडे पाठ केली आणि रोह्याच्या खांद्य्वर हात ठेवत बोलला…

”मी नाही त्रास देतंय… करता-करवीता तिसराच आहे.. माझं काम मी करतोय… मला अडवाल तर…”

एवढ बोलून सुबोध(???) पुन्हा हसू लागला…

किश्या आता मात्र खूप वैतागला होता… त्यालाहि घाबरलेला पाहून सगळेच घाबरत होते…

इतक्यात मागून कोणीतरी रडण्याचा आवाज येऊ लागला… किश्या ने मागे वळून पहिले…

खाली बसून… दोन्ही गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून सुबोध रडत होता… आता मात्र हा त्याचा खराखुरा आवाज होता.. थोडासा घसा बसल्यासारखा आवाज होता…

आता सुबोध देखील कदाचित शुद्धीवर होता….

किश्या सुबोध जवळ सावधपणाने गेला आणि त्याची मान उचलून त्याला काय झालं विचारू लागला…

”किश्या चाल पटकन इथून निघुयात, पटपट चला रे, घाई करा जरा… खूप महत्वाचं सांगायचं आहे मला तुम्हाला…इथं थांबून सांगणं शक्य नाही किंवा योग्य नाही” सुबोध बोलत होता…

त्याचं ते बोलनं ऐकून सगळ्यांना हुरूप आला… आता हा खेळ संपला अस्म सगळ्यांना वाटलं… सगळ्यांचा जीव एकदाच भांड्यात पडला… आणि ते तिथून पुढची वाटचाल करू लागले…..

आता कदचित सगळं काही ठीक झालं होतं… पण भित्न्तीने मनात केलेले घाव विरू शकत नव्हते… सुश्या आणि सुबोध अजूनही घाबरलेलेच होते…

सगळे track वरून हताश चेहऱ्याने चालत होते.. सुबोध डोळ्यांत पाणी होतंच…

बाकीच्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नाचिन्ह होतं…! सुबोध आता काय बोलणार??? त्याला काय सांगायचे होते???

ह्या सगळ्या प्रश्नांनी सगळ्यांच्याच मनात काहूर माजवलं होतं…

आता रात्रीचे साधारण पहाटेचे १.३० वाजले होते… म्हणजे साधारण ३ १/२ तास हा सगळा बाहुल्यांचा खेळ चालूं होता… आणि तो आता खरंच संपुष्टात आला होता कि, त्यची पूर्तता होणं अजून बाकी होतं…

याबद्दल सुबोध सोडून सगळेच साशंक होते.. प्रत्येकजण tension मध्ये होता…

track वर सगळी शांतता होती… आता वातवरणात कसल्याही प्रकारचा बदल नव्हता… हवेत काहीप्रमाणावर गारवा होता… जे काही घडलं ते निवळण्यासाठी हे वातावरण पूरक होतं…

सगळी अगदीच थकले होते…त्यांचे चेहरे त्यांचा थकवा आणि भीती लपवू शकत नव्हते…

आता चंद्र त्यांच्या डोक्यावर होता… कदाचित ते डोंगरमाथ्यावर पोहचले होते…track वरून चालताना.. हिवाळ्यात झाडाची झडलेली पाने पायाखाली तुडवली जात होती आणि त्यामुळे होणारा आवाज भीतीचं दडपण पुन्हा घालत होता… पण मंद वाहणारी थंड हवा त्यावर पांघरून घालत होती…

चालता-चालता अचानक पुढच्या वळणावर सगळ्यांना एक वस्तू दिसली…. वस्तूचा रंग पान्धारसं होता.. चंद्रप्रकाशात एवढं नाही पण बऱ्यापैकी दिसत होते… सार्वजन थोडावेळ हबकले…

पण जास्त न घाबरता पुढे जायचा धाडस केले आणि त्या वस्तूच्या अगदीच जवळ जाऊन पोहचले…ती वास्तू जवळून पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.. ती वास्तू एखाद्या जुनाट मंदिराप्रमाणे दिसत होती… त्याच्या दरवाजावर काही प्राचीन घंट्या बांधल्या होत्या…मंदिर खूपच जीर्ण अवस्थेत होतं,,, त्याच्या दरवाजावर कोळ्याचं जाळं अडकलं हतं…. त्याची अवस्था खूपच घन झाली होती..

आता देवाच्या मंदिरात जायाला कोणी का घाबरेल…??? हे पण घाबरले नाहीत… हाताने जाळ्या झटकत त्यांनी मंदिरात प्रवेश केला… अगदी जुन्या फिल्म्स् प्रमाणे मंदिराची अवस्था होती… थोडं आत जाताच तिथे एक मोठं पाषाण होतं… त्याची देखील अवस्था खूपच जीर्ण झाली होती.. त्यावर धूळ, माती आणि उंदीर, घुशिंनि केलेली घाण होती…

सगळे अगदी उत्सुकतेने त्या मंदिरांच्या भिंतींकडे पाहत होते.. त्यावरील धूळ झटकत होते… पण तिथे पुरेसा प्रकाश नसल्यामुळे त्यांना काहीच ठीक असं दिसत नव्हतं…. सगळे चालून आणि घडलेल्या घटनेमुळे खूप थकले होते… त्यामुळे मंदिरातीलच एका दगडावर बसले… हसीम ने सगळ्यांना पाणी दिले आणि गळ्यातील मफलर काढून, तो जमिनीवर अंथरून त्यावर आडवा झाला…

काही वेळ तिथेच पहुडल्यावर…

‘सुब्या ठीक आहेस का बे आता?’, मंग्याने सुब्या ला विचारले…

हं… जरा बरं वाटतय रे.. पण अंग खूप दुखतंय’, सुब्या करड्या आवाजात बोलला…

हसीम ला पुन्हा लहर आली…

‘अरे सुबोध राजा तू ते जिम जरा जास्तच केलंस रे आज, त्यामुळे दुखत असेल अंग तुझं…’, हसीम रोह्या ला टाळी देत बोलला…

सुश्या च्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर भाव होते… सुश्या ची भीती कदाचित ओसरली नव्हती…

सुश्या ने गंभीर आवाजात सुब्या ला प्रश्न केला…

‘सुब्या साल्या मगाशी तू काहीतरी सांगणार होतास ..सांग न आता….’

असं म्हणताच सुबोधच्या चेहऱ्यावर अविश्वासाची लकेर उमटली… त्याच्या चेहऱ्यावर शिथिलता आली…

‘सांगतो, पण हसणारा नसाल, हसीम तू मस्करी न करता ऐकून विश्वास ठेवणार असाल तरच सांगतो..’, सुब्या बोलला…

‘ठीक आहे महाराज, नाय करत मस्करी, बस…??? सांगा मग आता’ हसीम सुब्या कडे पाहत बोलला…

सुब्या शांत झाला…त्यांच्यात एकदम शांतात पसरली… सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती….

‘मला एवढं काही आठवत नाहीये… पण जेवढं आठवेल तेवढं सांगतो मी’,सुबोध बोलला….

” कृष्णा वाहनचालकाशी बोलत होता. मी आणि रोह्या दुकानातून खाण्याचं सामान घेत होतो.. मला मागून कोणाचा तरी आवाज आला.. मी मागे पहिले तो कृष्णा वाहनचालकाशी बोलत होता.. मंग्या, हसीम, सुश्या तुम्ही सगळे जेवणाचं बिल देत होतात… मला कोणी हाक मारली…?? माहित नाही… आवाज ओळखीचा नव्हता…मी लक्ष दिलं नाही… मी पुन्हा खाऊ खरेदी करण्यात लक्ष घातलं… मला पुन्हा आभास झाला… मला कोणीतरी आवाज देताय… ह्या व्व्लेस मी जरा खुनसेनेच मागे पाहिले… सगळं आत स्थिर होतं… म्हणजे सगळं काही मगाच्या सारखंच होतं… पण तो वाहनचालक, जो कृष्ण शी बोलत होता… तो माझ्या कडे पाहून हसत होता… तो माझ्य्कडेच पाहून हसत होता… पण मी त्याला ओळखत नसताना त्याला हसून reply का देऊ म्हणून मी पुन्हा दुकानातील खरेदीकडे लक्ष घालून दुकानदाराला पैसे देऊन दुकांतून बाहेर पडलो… खाऊ भरपूर घेतला होता.. तो खाण्यात रोह्या व्यस्तच होता… मग आपण सगळे त्या गाडीजवळ पोहचलो…

मला गाडीत मागे बसायचं होतं… कारण रोह्या काही न काही खात होता… अन् ते मला irritate झालं असतं… म्हणून मी मागे बसावं या हेतून मागचा दरवाजा उघडला…

पण…त्या चालकाने माझा हात पकडला…

आणि माझ्याकडे पाहून पुन्हा तेच वैरी हास्यात हसू लागला…

त्याचे डोळे माझी नजर खोडून काढू लागले…त्याने माझ्या डोळ्यांवर कहरच आणला…

माझ्या डोळ्यांना एक घाणेरडी लकाकी जाणवली… अगदीच घाणेरडी…

तिथं लोकांच्या रडण्याचे आवाज होते… मृतदेह सडल्यासारखा वास येत होता…खूप आक्रोश होता तिथे…

मला असह्य झालं…

माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला… स्पर्श ओळखीचा होता…

माझ्या डोल्यापुधील लकाकी गेली… मी मागे वळून पहिले.. रोह्या होता… मला बसण्यासाठी घाई करीत होता… मी त्याचा हात झटकला…

पण त्या चालकाने मला पुढेच बसण्यासाठी सांगितले… मला मागे बस्याची इच्छा असून देखील मी त्याचं बोलनं ऐकून पुढे काहीच विरोध न करता पुढे त्याच्याच शेजारी बसलो….

त्याने गाडी चालू केली… आपली गाडी काही अंतर्वर पुढे गेल्यावर सुश्या ला ATM मधून पैसे काढायचे होते म्हणून त्याने गाडी थांबवली…त्याला भीती वाटत होती म्हणून मंग्या त्या सोबत गेला… रोह्या आणि किश्या तुम्ही लघुशंकेला जाऊन येतो म्हणू तिथून गेलात…”

सुब्या हे सगळं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर भीती होती… अंगावर शहारे आले होते.. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं…

बाकीचे मात्र शांत होते.. त्या जुनाट मंदिरात सुब्या चा एकट्याचाच आवाज होता… त्याचे श्वास त्या जुनाट देवळात संथ लहरी उमटवत अंगावर शहरे आणत होते… सगळ्यांच्या डोळ्यांत उत्सुकता होती….

सुब्या पुढे सांगू लागला…

“तुम्ही तिथून निघून गेलात… गाडीमध्ये आता तो माझ्या शेजारी बसला होता… त्याने पुढचा mirror माझ डोळे दिसतील असा फिरवला… शेजारी बसून देखील तो माझ्याकडे पाहण्यासाठी आरशाचा वापर करीत होता…हि गोष्ट मला काहीतरी चाहूल देऊन गेली पण मला काही कळलच नाही…

आरशात त्याची अन् माझी नजर नजरेला भिडली… त्याची पापणी लावत नव्हती…

मला, पुन्हा तोच अवजा, तोच आक्रोश तोच वास… मी पुढे चाललोय… माहित नाही कुठे चाललोय… माझे डोळे बंद होते… एक व्यक्ती माझ्या दिशेने चालत येतीये… माहित नाही कोण आहे ती.. मी कधी पहिलाच नव्हतं त्या व्यक्तीला…

हळू-हळू ती व्यक्ती जवळ जवळ आली… खूप कुरूप चेहरा होता.. अंगाचा पराचा घाणेरडा वास होता…चेहरादेखील अतिशय विद्रूप झाला होता…

इतक्यात, खड्कन् आवाज झाला… माझी निद्रा मोडली… मी पुन्हा गाडीत होतो…

रोह्याने गाडीचं दार उघडलं होतं.. चालकाने माझ्यावरचे डोळे रोह्याकडे फिरवले.. त्याच्या डोळ्यांत द्रोह होता… जणू काही क्षणांत रोह्या ला मारणार होता… ह्याच अविर्भावात तो रोहुयाकडे पाहत होता…

इतक्यात सुश्या न मंग्या पण आले..

माझं मन अस्थिर झालं होतं…मला काळात नव्हतं मी काय पाहिलं… मला सुचत नव्हतं तुम्हाला सांगावं तर काय सांगावं….?? कसं सांगावं??? सुरवातच होत नव्हती… शेवटची तर गोष्टच दूर होती…

त्यानं गाडी पुन्हा चालू केली…

त्यानं माझ्यकडे फिरवलेला आरसा माझ्याकडेच होता…त्यातून तो माझ्याकडेच पाहत होता… त्याचा डोळ्यांचा खेळ चालूच होता…

कदाचित मी त्याला वश झालो होतो… किंवा अजून काही…

माझी इच्छा नसतानाही मी त्याच्याकडे पाहत होतो… माहित नाही मला काय झालं होतं.. माझा डोकं अचानक जड भासू लागलं होतं…

मला आता तुमच्यापैकी कोनाबाच्याही काहीही हालचाली जाणवत नव्हत्या… मला कोणाचे आवाज ऐकू नव्हते…

इतक्यात…

एक सूर्य तेजाप्रमाणे एक प्रखर प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला…

पुन्हा तीच लकाकी… पुन्हा तोच आवाज….

‘सुबोध… सुबोध… आलास तू…??? ये तुझीच वाट पाहत होतो मी…’, अनोळखी आवाज होता…

‘कोण आहेस तू??? मला कशाला शोधात होतास??? माझी वाट का पाहत होतास?? मी इथं कसा आलो पण???’, मी विचारलं…

‘अरे तूच काय पण तुझ्यासारखं कोणीही चाललं असतं रे… पण तू कसा अगदी मला पाहिजे तेव्हा आलास न, म्हणून तुला बोलावलं???’…., तोच आवाज गहिरा होत चालला होता…

अचानक मला तोच आक्रोश ऐकू येऊ लागला….

तोच तो घाणेरडा सडका वास… माझं डोकं दुखायला लागलं होतं… मला किळस येत होती तिथे…. मी कुठे होतो… ठिकाण माहिती नव्हतं… तिथे माझ्याशिवाय आणि त्या व्यक्तीचा आवाज होता फक्त….

मला तिथं नकोसं झालं होतं.. मी तिथून निघायचं रस्ता शोधत होतो…पण इच्छा असून देखील मला तिथून हलत येत नव्हतं..

ती व्यक्तिरेखा माझ्या जवळ येऊ लागली… त्याच्या शरीराची दुर्गंधी हळू-हळू वाढत होती… मला असह्य होती ती दुर्गंधी… मी डोळे मिटत होतो..नाक दाबत होतो, पण त्याचा काही फायदा नवहता…

ती व्यक्ती आता जोरात हसू लागली… इतकी जोरात कि मला माझे कान फाटतील असं वाटू लागलं… ती व्यक्ती आता माझ्या पुढं होती…

त्याची भयानकता मी शब्दात मांडूच शकत नाही… त्याच्या अंगातून येणार घन वास… त्याचे तोंड सडल्यासारखे दिसत होते.. त्यातून पू बाहेर पडत होता… आणि त्याचं ते राक्षसी हास्य… अगदी नरकातला अनुभव देणारं होतं… ”

‘कोण होता बे तो??? तुलाच का धरलं त्यानं???? दुसरी पोरं काय मेल्यात का???’ , सुश्या नं तोंड उचकटलं..

“मला माहित नाही कोण होता तो…?? काय होत??? मलाच का धरलं त्यानं??? काहीच माहित नाही… मला फक्त एवढं कलम कि मी त्याचं एक प्यादं आहे… तो खेळ खेळत होता… तो चिडीचा डाव खेळत होता… त्याला

सापशिडीच्या पटावर बुद्धिबळाचा खेळ मांडायचा होता…

आणि त्यानं मला प्यादं बनवलं होतं.. त्याचं काम करवून घेण्यासाठी…” सुबोध बोलला…

सुबोध पुढे सांगू लागला…

“तो दळभद्री माझ्याजवळ येऊ लागला… मला किळस असह्य झाली होती… मला त्याच तो येणारा जीव घेणार वास नको होता…. तो माझ्याजवळ आला… त्याने मला स्पर्श केला… मला माझीच घृणा वाटू लागली… एवढा घाणेरडा स्पर्श कऋण घेण्यापेक्षा मी मेलेलं बरं… हा विचार आला क्षणभर माझ्या मनात…..

‘तुला माझं काम करावं लागेल.. तुला इथपर्यंत आणलंय ते माझं काम करून घेण्यासाठी…, आणि तुला ते करावं लागेल… असं म्हन कि तुझ्याकडे त्याच्याशिवाय पर्यायच नाही….’, ती त्याचं विक्षिप्त हास्य करीत बोलला…

‘कसलं काम?? मी काय कोणाचा नोकर नाही… एक साधा माणूस आहे…, मी बांधील नाही तुझं काम करायला..’… मी त्याला थोड्या चढत्या आवाजात बोललो….’

त्याचं ते कुरूप हसणं… माझी डोकेदुखी अजून वाढवत होतं…..

‘तुला माझं काम करावंच लागेल… मी त्यासाठीच इथं आहे… आणि तू माझं काम नाही केलं तर, त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील.., मला काय मी अमर आहे…तू नाही तर अजून दुसरं कोण… मी माझं काम करून घेईन… पण तू इथपर्यंत आलाच आहेस.. तर तुला असं कसं जाऊन देऊ…??

त्याच्या त्या कृप हसण्याने मला आता असह्य वेदना होत होत्या… मला आता काहीच सहन होत नव्हत…पण मला तिथून निघताही येत नव्हतं…माझी शुद्ध हरपत चालली होती… मी निद्रेत गुंतत होतो… माझं भान हरपलं… मी कदाचित झोपी गेलो…

सुबोध सांगत होता….

“माझी शुद्ध हरपत होती.. मला भान राहिलं नव्हतं… माझ्या डोळ्यासमोर आता अंधारी येत होती.. माझे डोळे चक्रावले आणि मी धाड्कन खाली कोसळलो…आता मला काही दिसत नव्हते.. काही ऐकू येत नव्हते… मला माहित नाही मी बेशुद्ध होतो, पण काही मंत्र माझ्या कानावर पडत होते… स्नास्कृत होती ती भाषा… काहीतरी वेगळेच मंत्र होते… कधी न ऐकलेले.. एखादाच उच्चार कळत होता त्यापैकी… काहीतरी भयानक घडत होतं याची कल्पना मला आली होती.. पण नक्की काय घडत होतं तेच कळत नव्हतं…. ते मंत्रोच्चार कानात घर करत होते.. मी जणू अर्धमेला झालो होतो.. काही हालचाल होत नव्हती, डोळे उघडता येत नव्हते…इतक्यात…


मला जोरदार धक्का बसला… माझी निद्रा उघडली…माझ्या डोळ्यासमोर अंधार होता… अचानक… रोह्या चा आवाज कानी पडला.. त्याच्यासोबत तुम्हां सर्वांचे आवाज कानी पडू लागले… मी डोळ्यांवर जोर देऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता मला… माझ्या बाजूला रोह्या आणि तो वाहनचालक दिसला…..

नंतर लक्षात आलं कि आपण सगळे गाडीत आहोत… आणि आपण ज्या गाडीमध्ये आहोत त्या चालकाने गाडीचा करकचून मारलेला ब्रेक यामुळे माझी निद्रा मोडली होती… मी शुद्धीवर आलो होतो… पण मला हे आठवत नव्हतं कि आपण कुठे चाललो होतो मलाच काही आठवत नव्हतं..

माझे कान एकदम सुन्न पडले होते…

मला कोणाचाच आवाज ऐकू येत नव्हता… मला डोळ्यांसमोर फक्त track दिसत होता…

आपण जस जसे पुढे चालू लागलो… मी थोडा भानावर यायला लागलो….

मधूनच माझ्या कानात ‘त्या’ माणसाचा घुमू लागला…. मला काहीच काळात नव्हतं तो काय बोलतोय…

मध्याच आवाज बंद होत होता… काही वेळ माझ्या मनाला शांतता भासू लागली…

इतक्यात माझ्या कानावर खूप भयंकर आवाजाचा आघात झाला… तो आघात खूपच तीव्र आवाजच होता… मला असह्य वेदना झाल्या…

माझ्या कानात पुन्हा तोच आवाज घुमू लागला…कान तुंबले जात होते त्या आवजाने… खूप कर्कश्य असा आवाज होता तो…

हळू हळू एकचा आवाज मला स्पष्ट ऐकू येऊ लागला…

त्याच मानसाच आवाज होता… पण ह्यावेळेस मात्र अगदी स्पष्ट होता तो आवाज…

म्हणत होता ,

”सोडू नकोस त्याला.. लक्ष राहू दे त्याच्यावर…तो हातातून नाही गेला पाहिजे… तो घाबरला कि धार त्याला…तो जर हातातून गेला तर तुझं काही खरं नाही….”

‘पण तो कोणाबद्दल बोलत होता बे??? कोणाला धरायला लावत होता???’, मंग्या ने सुउब्या ला प्रश्न विचारला…

”तो मला सुशील बद्दल बोलत होता…”, सुबोध बोलला…

सगळे सुशील कडे पाहायला लागले…

”बघ ये सुश्या तू उगाच भुताला भीतोस राव… भूताचं तर तुझ्यावर जीवापाड प्रेम… तरी तू भीतोस… त्याने तुला धरण्यासाठी सुबोध चा जीव टांगला होता… बघ किती प्रेम करतं तुझं भूत तुझ्यावर…”, हसीम त्याच्याकडे पाहत हसून बोलला… त्यावर सगळे हसू लागले…

‘पण मला का बे बोलवायलं ते भूत…’, सुश्या जरा घाबरतच बोलला…

”माहित नाही रे…”, सुब्या ने उत्तर दिले…

अख्या मंदिरात एक शांतात पसरली… सगळे विचारात असताना… एक आवाज आला…

“मी सांगतो”, कोणीतरी वृध्द व्यक्ती असावी…

हातात पणती सारखं एक पत्र होतं… त्याचा भगवा उजेड सगळीकडे पसरला होता… ती व्यक्ती हळू-हळू जवळ येऊ लागली. ती व्यक्ती यांच्या जवळ येताच सार्वजन आश्चर्याने उभे राहतात…

भगवी वस्त्रे प्रधान केलेला एक वृध्द, दाढी वाढलेली…केसं देखील शंकराच्या जटेप्रमाणे बांधलेले… एका हातात कमंडलु आणि दुसऱ्या हातात पणती… असा त्यांचा वेश होता… डोळ्यांत एक तेजस्वी ज्वाला होती… जी मनाला प्रसन्न करीत होती.. माथ्यावर विभूती लावलेली… जणू हिमालयातील एखादा तपस्वीच…

”घाबरू नका… मला माहिती आहे ती व्यत्क्ती कोण होती, त्याने ह्यालाच का धरायचं ठरवलं? इत्यादी…इत्यादी… तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याजवळ…”, ती तपस्वी व्यक्ती बोलली….

”पण बाबा तुंम्ही कोण?”, हसीम नं आदरपूर्वक विचारलं…

”मी गेली कित्येक वर्षे या जंगलात भटकतोय.. मी इथंच या जंगलात राहतो… इथं कसलीतरी कुजबुज ऐकू आली म्हणून इथं फिरकलो…”, त्या तपस्वीने तेवढ्याच नम्रतेने उत्तर दिले…

त्यांच्याकडे पाहून कसलीही फसवेगीरीची किंवा मायावी शक्तीची भीती वाटत नव्हती… त्यांचं तेजस्वी रूप त्यांची सामर्थ्य सांगून जात होतं….

”सुशील, बाळ मुळातच भित्रा आणि कमजोर… जरा कमी चपखल, पण प्रामाणिक स्वभाव याचा तोच याला घटक ठरला असता… त्याच्यावर वशीकरण कारण कधीही सोप्प… ज्या व्यक्तीवर भीती, आणि इतरांची मतं लगेच हावी होतात त्यान वश करून हवं ते करून घेता येतं… पण याचं दैवं खरंच बलवत्तर होतं… म्हणून याला नख उखाडन्यापलीकडे काहीच झाले नाही….”… तपस्वी बोलत होते…

त्यांचं बोलणं सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते कारण आत्तापर्यंत जे काही घडलं त्यांच्याशिवाय कोणालाच माहित नव्हतं….

कोणी काही बोलायच्या आतच, ते तपस्वी बोलू लागले….

”मला सगळं कसं काय माहित??? या पेक्षा तो राक्षस कोण होता आणि तो कशाला आला होता हे जाणून घेणं महत्वाचं आहे…,

तो एक खविसाचा प्रकार आहे… तो या भूमीत हजारों वर्षांपासून कैद आहे… इथल्याच कुठल्यातरी झुडुपात त्याचा मोक्ष लपला आहे… मला देखील माहित नाही नेमकं कोणतं झुडूप आहे ते… ते झुडूप जाळलं कि त्याला मोक्ष मिळणार होता….”

”पण मग तो आमच्या वाट्याला कशाला गेला,,???, आम्ही काय करणार होतो त्याच्यासाठी…??”, रोह्याने उत्सुकतेने विचारले….

”हे बघ बाळ, मोक्ष हवा होता… त्याला मोक्ष देणारा माणूस मनाने, भोळा, प्रामाणिक, तत्ववेत्ता असावा लागतो, मग कदाचित सुबोध असावा..???… आणि जर समजा सुबोध कडून त्याला मोक्ष मिळाला असता तर पुढे जाऊन तो राक्षस सुबोध्च्याच जीवाचा वैरी झाला असता…आणि कदाचित सुबोधला मारलं देखील असतं त्याने…”, तपस्वी बोलले..

”पण मग बाब, मला ती व्यक्ती जेव्हा आम्ही track वरून चालत होतो तेव्हा, ”सोडू नकोस त्याला.. लक्ष राहू दे त्याच्यावर…तो हातातून नाही गेला पाहिजे… तो घाबरला कि धार त्याला…तो जर हातातून गेला तर तुझं काही खरं नाही….”, असं का म्हणत होती… तो राक्षस मला कोणाला धरायला सांगत होता??”, सुबोध ने विचारले….

”बाळ सुबोध, त्याची शिकार तू नव्हताच… त्याला मोक्ष देणारा माणूस मनाने, भोळा, प्रामाणिक, तत्ववेत्ता शोधण्यासाठी त्याने तुझा वापर केला…पण तो अयशस्वी ठरला… त्याची असली शिकार सुशील होता…,

सुशिल असतानाच भीत्रा आहे… त्याच्यावर भीती लगेच हावी होते.. तो भीती सहन करू शकत नाही… इतरांनी त्याला काहीजरी सांगितले तरी त्याच्यावर त्या गोष्टीचा लगेच परिणाम होतो, परिणामी तो स्वतःला लगेच दुसऱ्याच्या स्वाधीन करतो… त्यामुळे त्याच्यावर मोहिनी घालणं कधीही सोप्प…, ह्या सगळ्या कारणाने त्याने सुशीलला धरायचा प्रयत्न केला… पण…”….

‘पण काय बाबा???”,…तपस्वींच वाक्य पूर्ण होतंय न तोच सुशील अतिउत्सुक्तेने तपस्वींचे वाक्य कापत बोलला…

‘हं..’ तपस्वी गालातल्या-गालात हसले…

‘हं.. बाळांनो ज्याच्या सोबत सिद्ध्पुरुषाचा आशीर्वाद असतो त्याला का कोणी वश करू शकेल…’….तपस्वी बोलले…

‘बाबा, काही कळेल असं बोला न…’… किश्या बोलला….

‘सुशीलच्या bag मध्ये स्वामी समर्थांच्या पादुकांवरील उदी एका पुडीमध्ये बांधून ठेवली आहे…’ तपस्वी वाक्य पूर्ण करीत-करीत उठले… आणि मंदिराच्या बाहेर जाऊ लागले…

त्यांच्या पाठोपाठ हे सगळे उठून जाऊ लागले…

‘त्यामुळेच मांजराने त्याचे रक्त पिऊन देखील त्याच्य्वर तो राक्षस मोहिनी घालू शकला नाही,,,’, ते तपस्वी चालता-चालता बोलत होते…

त्यांच्या हातातील पणतीचा एक मोठा तेजस्वी प्रकाश तयार झाला आणि पाहत-पाहत ते तपस्वी त्या प्रकाशात सामील झाले… आणि तिथून गायब झाले…

सर्वाना कळून चुकले… ते तेजस्वी तपस्वी समर्थांचा अवतार होते… आणि केवळ सगळ्यांच्या रक्षणार्थ आले होते… मनातल्या मनात सगळ्यांनी भित्र्या सुशील चे आभार मानले… सुश्या मात्र चाटच पडला होता…

सगळ्यांनी एकमेकाकडे पाहून एक हास्य दिले आणि पुढे चालू लागले… काही क्षणातच त्यांना पुढे मोथे विजेचे खांब दिसू लागले… सगळे तिथे पोहचले… तिथून जाणाऱ्या दोन लोकांना त्यांनी कोथळगडाविषयी विचारले असता, त्यांनी हे माथेरान असल्याचे सांगितले… सगळ्यांना जरा जास्तच आश्चर्य वाटले…पण

” ‘त्याची’ महिमा कोणी कधी ओळखू शकले नाही आणि कधी कोणी जाणू शकले नाही…ज्याने त्यांची महिमा जाणली ते अद्भुत म्हणवले..”

धन्यवाद, तुमच्या सहकार्याबद्दल!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror