Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#52 Week Writing Challenge - 2022 (Edition 5)

SEE WINNERS

Share with friends

साहित्य लेखन फारच भितीदायक आहे. लेखन करत असताना, सूज्ञ वाचकांस कलात्मक अचूकतेची, शाब्दिक व्याकरणाच्या नियमांची आणि इतर व्यक्तींसाठी लिहिण्यात येणा-या कथा या बद्दल चीड व नाराजीची अपेक्षा आहे. तुम्ही एखाद्या कल्पनेच्या अगदी सूक्ष्म कल्पनात्मक थेंबाने सुरुवात करता, परंतु जेव्हा तुम्ही तिला रचनात्मक भाषेत वळविण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीरातील अवयव बाहेर काढत आहात असे वाटते.


स्टोरी मिरर (StoryMirror) तुम्हा सर्वांना ५२ वीक रायटिंग चॅलेंज - 2022 (आवृत्ती 5) (५२ आठवडे लेखन चॅलेंज - पाचवी आवृती) च्या पाचव्या पर्वाचा म्हणजेच सीझन चा हिस्सा होण्यासाठी आमंत्रित करत आहे. ही स्पर्धा तुमचे लेखन कौशल्य पुढील स्तरावर नेईल आणि तुमची सर्जनशील सहनशक्ती मजबूत करेल.


यामध्ये नवीन काय आहे?

लेखकाला दर आठवड्याला प्रत्येक ठराविक प्रॉम्प्ट (घटना) साठी जमा करावे लागेल. या स्पर्धेचा मनोरंजक भाग म्हणजे प्रॉम्प्ट फक्त आमच्या सहभागींद्वारे प्रदान केले जातील. प्रत्येक वेळी आम्ही आमच्या सहभागींना नवीन प्रॉम्प्टसाठी (घटनेसाठी) मेल करू ज्यावर तुम्ही त्या ईमेलला उत्तर देऊन तुमच्या सूचना शेअर करू शकता. आम्ही सर्वोत्कृष्ट प्रॉम्प्ट्स शॉर्टलिस्ट (निवड) करू आणि आमचा ५२ वीक रायटिंग चॅलेंज प्रॉम्प्ट म्हणून रोल आउट करू (५२ आठवडे घटना लेखन चॅलेंज म्हणून प्रसारीत करू).


टीप: कथा आणि कवितेसाठी स्वतंत्र प्रॉम्प्ट (इवेंट किंवा घटना) असेल.


सूचना पुढील प्रमाणे आहेत :

१.कथा: २०२१ च्या तुमच्या प्रवासावर एक कथा लिहा

१.कविता: २०२१ च्या तुमच्या प्रवासावर एक कविता लिहा

२.कथा: अनपेक्षितपणे नशिबात आलेल्या म्हणजे अनपेक्षितपणे भेटलेल्या एका गरीब तरुण मुलावर किंवा मुलीवर कथा लिहा.

२.कविता: हिवाळ्याच्या संध्याकाळी घराबाहेर एक कविता लिहा.

३. कथा - 'कोविड' कधी झालेच नव्हते अशा स्वप्नाबद्दलची कथा

3. कविता - शाळेच्या विस्मृतीत गेलेल्या वेळेबद्दल मुलाची प्रतिक्रिया.

4. कथा - एखादी वैयक्तिक शोकांतिका किंवा अपघाताचे चित्रण करणारी एक लघुकथा लिहा, ज्यात पार्श्वभूमीत राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली असेल, ज्यामुळे अनपेक्षित घरी परत येणे होईल आणि मानवी स्वभावाविषयी काही कठीण, वैश्विक सत्य प्रकट होईल.

4. कविता - सध्याच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रेम आणि निष्पापपणा गमावण्यावर एक कविता लिहा

५. कथा: ब्रेकअपची कथा लिहा (ब्रेकअपची विचित्र कारणे)

5. कविता: बालपणीची मैत्री कशी मागे पडते आहे (हजार वर्षाच्या नित्य जीवनात)



स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत:


१. सहभागींनी ५२ आठवडे सलग ५२ कथा किंवा ५२ कविता जमा करणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच प्रत्येक आठवड्यात संबंधित श्रेणी (कथा/कविता) अंतर्गत १ साहित्य.


२. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे सबमिशन/ सादरीकरण जानेवारी २०२२ च्या तिस-या आठवड्यापासून सुरू करत असल्यास, तुम्ही जानेवारी २०२३ च्या तिस-या आठवड्यापर्यंत जमा करू शकता.


३. सहभागी वेगवेगळ्या श्रेणींसाठी (कथा/कविता) नोंदणी करू शकतात. तथापि, ५२ सबमिशनचा प्रत्येक संच कथा किंवा कवितेच्या समान श्रेणी अंतर्गत असावा.


४. लेखकाने या स्पर्धेअंतर्गत सादरीकरण म्हणजे सबमिशन सुरू केल्यानंतर सादरीकरणात कोणताही खंड पडू नये. सादरीकरण खंड असल्यास ते अपात्र ठरतील.


5. आव्हान "मिनी-राइट-ए-थॉन्स" मध्ये विभागलेले आहे.


   - १३ आठवडे लेखन-अ-थॉन


   - २६ आठवडे लेखन-अ-थॉन


   - ३९ आठवडे लेखन-अ-थॉन


    त्या स्तराच्या फायद्यांसाठी पात्र होण्यासाठी एक स्तर पूर्ण करा


६. विजेते त्यांच्या सबमिशन आणि संपादकीय स्कोअरवर वाचलेल्या संख्येच्या आणि पसंतीच्या संख्येच्या आधारावर ठरवले जातील. सर्व ५२ सबमिशनसाठी हा एकत्रित स्कोअर असेल.


७. स्टोरी मिरर (StoryMirror) चा निर्णय अंतिम असेल आणि सर्व सहभागींना बंधनकारक असेल.


8. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही सहभाग शुल्क नाही.



बक्षिसे:

१. प्रत्येक भाषेतील २ विजेत्यांना (१ कथा + १ कविता) त्यांचे पुस्तक StoryMirror द्वारे भौतिक स्वरूपात प्रकाशित करण्याची संधी मिळेल.


२. १३ आठवडे पूर्ण झाल्यावर: डिजिटल प्रमाणपत्र (प्रवासाचा १/४ वा भाग)


३. २६ आठवडे पूर्ण झाल्यावर म्हणजेच प्रवासाचा १/२: तुम्हाला रु.१००/- पर्यंत चे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर मिळेल.


४. ३९ आठवडे पूर्ण झाल्यावर, म्हणजे प्रवासाच्या 3/4: तुम्हाला रु.२००/- पर्यंत चे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर मिळेल.


५. ५२ आठवडे पूर्ण झाल्यावर: स्टोरी मिरर तुमचे ई-बुक + प्रमाणपत्र प्रकाशित किंवा लॉंच करते.



भाषा:

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बांग्ला यापैकी कोणत्याही एक किंवा अधिक भाषांमध्ये सामग्री सबमिट केली जाऊ शकते.


टीप: तुम्ही एकाधिक भाषांसाठी सबमिट करत असल्यास, तुम्हाला प्रत्येक भाषेत ५२ लेखन साहित्य सामग्री स्वतंत्रपणे सबमिट करणे अत्यंत आवश्यक आहे.


पात्रतेचे निकष:

साहित्य जमा करण्याचा कालावधी - १ जानेवारी २०२२ ते १५ एप्रिल २०२३


नोंदणी - ३० एप्रिल २०२२ पर्यंत


निकाल - जून २०२३


संपर्क:

संपर्कासाठी खालील इमेल आयडी वर मेल करू शकता अथवा खालील भ्रमणध्वनी वर फोन करू शकता:

 इमेल आयडी : neha@storymirror.com

 मोबाईल क्रमांक : +91 9372458287