Krishna Shuchi
Literary Lieutenant
48
Posts
33
Followers
0
Following

प्रिय वाचक-मंडळींनो, माझ्या कथा, माझे साहित्य वाचून कसे वाटले हे प्रतिक्रिया देऊन जरूर कळवा. आपल्या बहुमोल प्रतिक्रिया आणि मते यावरच माझ्या लेखनाचा दर्जा अवलंबून आहे... -⊱⊙⊰- Dear readers, Please share your thoughts on my story and how you felt after reading my literature. Your valuable... Read more

Share with friends
Earned badges
See all

माणूस आयुष्यभर 'आपलं' कोण, 'परकं' कोण हेच शोधत राहतो... छे! या काही शोधण्याच्या गोष्टी नाहीत तर स्वतः निर्माण करण्याच्या गोष्टी आहेत... अर्थात काहींना हे लवकर ध्यानात येतं, काहींना वेळ हातातून निघून गेल्यावर..! ~•~ अनुष्का जोशी

ओळख - आयुष्यात फार कमी माणसांशी ओळख असली तर चालेल पण, माणसं व्यवस्थित ओळखता मात्र यायला हवीत ! ~•~ - अनुष्का जोशी

संवाद नात्यांचे - अंतर्मुख स्वभावाची माणसं, अंतर्मुख होत जाणाऱ्या नात्यांपेक्षा कितीतरी पटीनी सोपी, सरस वाटतात... कारण माणूस शांत झालं तर बोलून रितं करता येतं परंतू एकदा का नाती संवादांपेक्षा शांततेकडे झुकू लागली की, मग ती धूसर होत जाणारी नात्यांची वीण सांधणं खूप अवघड होऊन बसतं... ~•~ - अनुष्का जोशी

फुंकर प्रेमाची - 'मौनम् सर्वार्थ साधनम्' असे आपण नेहमी म्हणतो खरे परंतू काही रुसवे, काही वाद, काही अबोले, काही जखमा या केवळ प्रेमळ अन् आश्वासक शब्दांचं मलम लाऊनच बऱ्या होतात... आपल्या माणसाने घातलेली एक मायेची फुंकर मनाचा किनारा शांत शांत करून जाते... ~•~ - अनुष्का जोशी

निचरा मनाचा - मनाच्या डोहात साचलेल्या भावना अन् बुध्दीच्या गर्तेत अडकलेल्या विचारांच्या सा-या कणांना एकदा तरी शब्दांच्या धारेवाटे रितं होऊ धावं, निचरा होऊ द्यावं... एकदा का मनाचा तळ स्वच्छ अन् शांत झाला की माणूस सर्व गोष्टीकडे चौकसरित्या पाहू शकती अन् विचार करू लागतो... - अनुष्का जोशी


Feed

Library

Write

Notification
Profile