कधी न विसरता यावी
अशी एक आठवण बनलीस
ज्याविना जगणे कठीण
तू माझा श्वास बनलीस
एकच विनंती माझी
जगवा निरोगी माझ्या निसर्गाला
या शेतकऱ्याला शपथ धरती मातेची
पुरवेल निरोगी अन्न भुकेल्या पोटाला
जे पुन्हा घडणं
जवळपास अशक्य बनून जातं
त्याच काळाला आज
ऐतिहासिक क्षण मानलं जातं
तिच्या नावासमोर माझं नाव लावेल
अशी एक खास असावी
माझ्यात ती तिला जगतांना बघेल
अशी एक परी असावी
ज्येष्ठ नागरिक घेऊन चालतो घर
तो घेऊन चालतो समाज
एकटाच सारे सूत्र सांभाळतो
त्याच्या शक्तीचा नका लावू अंदाज
सौंदर्य घेऊन बसलेत सगळे
चांगलेपणाची जान नाही
श्रीमंतीला फॅशन मानतात
गरिबीला मान नाही
छडी असते, प्रेम असते
मिळावे शिक्षण गुरूचे
यश असो, अपयश असो
कळते महत्त्व गुरूचे
माज माज करतो अधिकारांचा
सामान्य माणूस म्हणून जगून बघ
काय असतात सामाजिक विषय
एकदा समाजाला तर भेटून बघ
नको हारुस नशिबाला
कर जरा धाडस
झुकेल कुंडली तुझ्यासमोर
तू सोडू नको साहस