२०२१चा माझा प्रवास
२०२१चा माझा प्रवास
२०२१चा प्रवास विचारता राव
प्रवास पूर्ण घरातच बसला
पूर्ण जग कोरोना पाई
डबक्यातील पाण्यागत साचला
नवऱ्याच्या न पोरांच्या
झाल्या सुट्ट्या सुरू
त्याच्या सुट्ट्या पाई माया
ओवर टाईम झाला सुरू
त्यांची खायले रोज रोज
नवीन पदार्थाची मागणी
माया मस्तकी हो बसे
ढेरभर भांड्याची घासणी
रातदिन बाप लेक खाये पीये
अन् पाहे पिक्चरची फाइट
सकाळी उठून माझी चाले
रोज कामाची लेफ्ट राईट
चिडून बोलली कोरोनाले
त्यायले आहे मले नाही सुट्टी
चिडून बोलला ती ही राव
देऊ का तुले कायमची सुट्टी
नवीन साडी होती घेतली
पण घालाले नाही भेटली
नवीन मेकअप किट घेतली
ते ही लावाले नाही भेटली
सासू रोज घरातच राहे
मले घुरावूनच पाहे
पहिले रोज फिरायले जाये
माया जीव शांत राये
पहिले माया नवऱ्याले
कपड्याची माया सूद नव्हती
आता तोंडावरच्या डागाची
रोज करते गिनती
२०२१ मध्ये बस न रौंगट मारली
फिराची माई हाऊसच राहिली
प्रवास नाही झाला राव तरी
कविता माई तयार झाली