आरोग्य हीच संपत्ती
आरोग्य हीच संपत्ती
आरोग्याचे दान लाभे
वंशपरंपरा रिती
वारसाहक्काने येती
गुण चांगले मिळती (१)
कला सौंदर्य गुण
शारिरीक ठेवणीही
रंग उंची लकबीही
माता पित्याकडूनही (२)
जपा नित्य आरोग्याला
करा व्यायाम रोजचा
ताजे स्वच्छ अन्न खावे
नको मेवा बाहेरचा (३)
राखा स्वच्छता नित्य
तन अन् मनाचीही
स्वच्छ तनमनामधे
किल्ली आयुःआरोग्याची (४)
गप्पा चेष्टा विनोदाने
मन शांत स्वस्थ ठेवा
देवा दे अक्षयदान
आरोग्याचे ह्या मानवा (५)