Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Namarata Kudalkar

Abstract

4  

Namarata Kudalkar

Abstract

तिच्या - त्याच्या गोष्टीची कवि

तिच्या - त्याच्या गोष्टीची कवि

3 mins
330


ती:-

ती उदास आहे... आणि उद्विग्नही... कारण, तिच्यावर अत्यंत प्रेम करणारा तिचा तो... तिला दूर ठेऊ पाहतोय... तसं पाहिलं तर कारण काहीच नाही... की तिला माहीत नाही?... तिचं सुंदर दिसणं... त्याला मोहात पाडतं अजूनही... पण, तो कटाक्षानं टाळतोय तिला पाहणं... त्याच्यासमोरच जेव्हा ती तयार होते... तिचं आरशातलं मोहक रुप... खुणावतंय त्याला... तरीही, तो स्वतःचं नियंत्रण हरवत नाही... तिच्या हातचा स्वयंपाक... अजूनही तसाच तितकाच चवदार... पण, त्याचं मात्र फक्त जेवण्याचं नाटक... का कुणास ठाऊक... पण, त्यानं सोडलाय शब्दांचा आसरा...गेला महिनाभर त्याची फक्त नजरच बोलतेय... कृद्ध, धिक्कारणारी नी अवहेलणारी... ती मात्र अजूनही आशादायी... तो सांगेल,बोलेल म्हणून...


तो:-

तिच्यापासून दूर राहणं जमतंच नाही त्याला... तरीही तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय... शेजारी ती असल्याच्या जाणीवेशिवाय... झोपच येत नाही तरीही... तिला दूरच ठेवतोय स्वतःपासून... ती आरशासमोर उभी असते... तेव्हा खूपदा येतं मनात... सोडावा आपला हट्ट... नी मिठीत घ्यावं तिला घट्ट... पण, दुसऱ्याच क्षणी तिची नजर वळताच... त्याचाही हट्ट अगदी कठोर होऊन जातो... तिच्या स्पर्शातली जादू विसरताच नाही येत त्याला... तरीही, गाडीवर बसल्यानंतर... होणारा, हवाहवासा तिचा स्पर्श... टाळावाच लागतोय नाखुषीनं... शब्दांचा सहारा सोडला तरी... तिचं कौतुक नजरेतून ओसंडतंच त्याच्या... मग ते न दिसण्यासाठी धडपडावं लागतं त्याला... असं काय ठरवलंय त्यानं की जे अजूनही अबोल आहे?


दोघे:-

ही घुसमट असह्य झाल्यावर... तिनं सोडायचं ठरवलं घर... ती मुकाट अश्रू लपवीत... सारं त्याचं करत होती... त्याला सोडून जाण्याच्या विचारानंच... तगमग झालीय तिची... त्याला माहीतेय... हे सारं होणाराय... काही झालं तरी ती मानिनी आहे... मनस्वी आहे... तरीही तो त्या अपूर्व क्षणाची वाट पाहत होता... तिनं ठरवलंच होतं मनात... आता नाही साहवत हा अपमान... तो गेला ऑफिसला... की पुढच्याच क्षणी आपण आपल्या वाटेनं जायचं... लेकीला केलं रवाना... सतारीच्या स्पर्धेसाठी... तोही पडला बाहेर ऑफिसला जायला... झरझर जिने उतरला... झालं असेल बंद आता दार... विचार केला... झटकन् वळून परत आला... तिच्या तयारीसाठी थोडा वेळ दिला... धडधडत्या उराने बेल दाबली... अशा अवेळी कोण बरं असावं?... तिनं विचारातंच दार उघडलं... धक्काच बसला त्याला समोर पाहून... हा! आत्ता? इथं? कसा? ऑफिस?... पण तिला पुरता विचारही करण्याची... संधीच दिली नाही तिला... दाराचं लॅच लागलं... अन् पाठमोऱ्या वळलेल्या तिला... त्याच्या घट्ट मिठीचा विळखा पडला... छे! इतका अपमान झाल्यावर ही मिठी?... नकोच मला... पण, तिचा प्रतिकारच लटका पडत होता... तिच्या केसांतल्या गजऱ्याचा... उरभरून सुगंध घेत... तो म्हणाला, 'तू हवीएस मला, फक्त माझी म्हणून!'... ती आश्चर्यचकित... हे काय बोलतोय हा?... मग तो तिरस्कार?... ती घृणा?... सोड मला... सोड ना!.. नाही यायचं मला जवळ तुझ्या... शी बाई! मी का इतकी कमजोर पडतेय... तिला अलगद पलंगावर ठेवत त्यानं... वस्त्रांचे बंध मुक्त केले... ती ओंजळीत चेहरा घेऊन स्फूंदून स्फूंदून रडली... किती केला प्रतिकार तरी... त्याच्यात हरवत गेली... तिच्या सर्वांगाची घेत चुंबने... त्याचे बंदिस्त शब्दही मुक्त झालेले... तू माझीच आहेस प्रिये!... फक्त माझीच... माझ्या मनी नाहीच कुणी... केवळ तू साजणी... हे तर सारं होतं नाटक... ठरवून, जुळवून केलेलं... यत्न लागले खूप करावे मज... तुजपासून राहण्या दूर... ते दिसाची पिवळी वॉयल साडी... तुझं देखणं रुप... माझं गळून गेलं... खोटंचं आणलेलं अवसान... तरीही मनावर ठेवला दगड... रात सरायचीच नाही तुजवीण माझी... तुझ्या मिठीविना... वाटे तुझ्या मिठीत शिरून... करावा मोकळा उरभरला गच्च श्वास... तुझ्या अधरी ठेऊन अधर... आस्वादावे मुकपणे तुज... तुझ्या कलापातून फिरता हात... सर्वांगी फुलणारा तो काटा... स्पर्शून पाहावा टोचतो का?... मम स्पर्शाला येतो जो... हुंकारातून तुझा प्रतिसाद... टिपत रहावा या कानांनी केवळ हुंकारातून... मग का ठेविसी दूर मज तू सांग सख्या रे?... आलाच प्रतिप्रश्न तिचा... त्याच्या वक्षात मस्तक घुसळिता... का नाही मज ओढून घेतलेस तव बाहूपाशी?... का नाही मज गुदमरून टाकलेस तव प्रेमाच्या झऱ्यात? जव मला वाटले यावे जवळी... तव तुझीच नजर झालेली परकी... तू दुपारी निवांत पहुडसी... मी अनिमिष न्याहाळिले तुज... तव अंगप्रत्यंगाच्या रेघा स्पर्शमिषाने... कधी अचानक मध्यरातीला... झाला चोरटा तुझा स्पर्श तरी... वीज सळेसळे मम अंगांगातून... अधर राहिले तरसत माझे... तव अधरांच्या तप्त स्पर्शासि... तुझिया श्वासांचा उष्ण उत्पात... खुपत राहिला तुझ्याविना माझ्या शरीरी... तिच्या ओठांवर तर्जनी ठेऊनि तो म्हणे,'सखये... पाही जरा तू या खुणा... तुझियाच दंतपंक्ती अन् नखे... उमटली कशी या मम तनुवरी... नसतोच राहिलो तेव्हा दूर जरासा?... सांग दिले असतेस का मला तू?... हे अलंकार मिरविण्यास प्रेमाने जन्मभरी... त्या खुणांवरूनी फिरवीत नाजूकपणे हात ती... लाजून अवनत झाली... छे! हे असे आज कसे घडले?... ती वस्त्रविहीन जाणीव त्याच्या बाहूपाशी विराली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract