आत्म्याचे गूढ
आत्म्याचे गूढ
1 min
7K
आत्म्याचे गूढ शोधण्यात
बुद्ध गढून गेला
क्षणभर.....
सळसळत्या पिंपळाला
स्तब्ध करुन गेला.
माया पाशांना
अंतरंगातून....
मुक्त करुन गेला.
ज्ञानाने साऱ्या जनांना
लुब्ध करुन गेला.
धर्म, न्याय ,नीतीच्या
वचनात बद्ध करून गेला..
आत्म्याचे गूढ शोधण्यात
बुद्ध गढून गेला.