आठवणीतली गुलाबी थंडी
आठवणीतली गुलाबी थंडी
1 min
961
मुखडा चंद्रमुखी उघडा ठेवून
गुलाबी थंडीत ती झोपली शांत
रूप तीच पाहून, झाले मन माझे अशांत
हळूच कुंतलात मी,तीच्या फिरवले बोट
स्पर्शून तीला,असे सरसरले ओठ
अधीर मन झाले, मेंदीच्या,गंधात
बंद नयनपाकळ्या,हळूच खूलवत
टाकला तिने दीर्घ श्वास
आणि पटकन घेतला, माझा
हातात हात.....
हातात हात घेता ,हृदयात हलचल झाली
कळलेच नाही, कधी, गुलाबी थंडीत
गुलाबी रात्र सरून गेली.......।।