आयुष्यात
आयुष्यात
आयुष्यात संकट
आणि संघर्षाचे गणित
जुळल्याशिवाय जगता येत नाही
यश आणि अपयशाचे
महत्व जाणल्याशिवाय
आयुष्य उमजत नाही
सुखाची आणि दुःखाची
मोजमाप ठेवल्याशिवाय
वेदना कळत नाही
भूक आणि स्वप्नांची
सांगड घातल्याशिवाय
कष्ट कळत नाही
अति विश्वासाची आणि
अविश्वासाची चव
चाखल्याशिवाय
शहाणपण येत नाही
पैसा आणि माणसामधल
अंतर समजल्याशिवाय
माणुसकी येत नाही...