अकरा एप्रिल(11)
अकरा एप्रिल(11)
ही सोळाव्या दिवसाची सांज छान...!
ही वेळ जीवनातली अशी
सो सलेले क्षण आठवण्याची
टवा ळां च्या रॅगिंगची तेंव्हा
व्या धी महाविद्यालयात सतवायची ..
दि वस सरले,रॅगिंगचे फॅड गेले
व ळचणीला ते शब्दही जाऊन बसले
सा धे साधे जीवन झाले
चि रफाडीचे मनसुबेही विरले...
सां ज समय जवळ येता
ज रा भावनेचे डोळ्यात पाणी दाटते
छा न छान गोष्टींचे आठव सुध्दा
न कळत आठवताना नवल वाटते....
ते दिवस गेले
तसे हे ही दिवस जातील
पुन्हा पाखरे आकाशी
मोठ्या जिद्दीने झेप घेतील....!
शुभ सायंकाळ..शुभ रात्री...!