अंश
अंश
*सैल सोडून
सैर करावं
नभ नभात
मन विमानं*
*भावं विभोरं
दारं उघड
पक्षी पिंजरा
सोड लादणं*
*कळ कळतें
तरी वेढतं
लोभ लोभात
कसं जीवन*
*तोड जंजीर
ही पायातली
झेप उंचीची
बाजै असावी*
*सैल सोडून
पंख आकाशी
वैद्य स्वतःचा
मनो लपलं*
*सोड चिंताच
तु जग स्वैर
घे अनुभवं
जिणं एकदाचं*
*सुख चांगल
दुःख सारतं
किती धरला
तरी सुटतं*
*धर सोड ही
सदा चालतं
पण राजा तु
मन देहाचा*
*कर स्वीकार
अंश ब्रह्माण्ड
तु उच्च कोटींचा
चितशील ते होईलं*
*म्हणून जश्न मनवावं
जन्मदिवसाचं
आनंदी आनंद
जगामधि वाटवावं*