Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Hemangi Sawant

Others

4  

Hemangi Sawant

Others

असा हा पाऊस....

असा हा पाऊस....

2 mins
442


असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो..


कधी अल्लड बनुन तर कधी उनाड होऊन तो वाऱ्यासोबत खेळत असतो,

कधी हसवतो कधी रडवतो, कधी स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातो.

कधी आठवणींच्या गर्द रानात फेरफटका मारायला लावतो, तर कधी वाईट आठवणींपासून आपली वाट मोकळी करून देतो.

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो।।



पावसाचा स्पर्शाने मन मोहरते, त्याच्या सरी मनातील मळभ दूर करते,

पाऊस एकट जगायला शिकवतो, आनंदी रहायला शिकवतो,

तर कधी स्वच्छंदी जगायला शिकवतो.

कधी नदीसोबत तर कधी झऱ्यासोबत वाहत जायला शिकवतो, तर त्या प्रवाहात आनंद लुटायला शिकवतो.

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो ।।



मनमुरादपणे हसायला पाऊस शिकवत असतो, तर सोबतीचा मित्र होऊन आपल्यासोबत आपल्याला जगायला शिकवतो. 

पावसाच्या प्रत्येक सरीसोबत जगायला शिकवतो, अंगावर सरी झेलायला शिकवतो.

प्रत्येक क्षण पाऊस जगायला शिकवत असतो. कधी हसवतो, कधी रडवतो. पण जगणं शिकवतो.

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो ।।



पाऊस सोबत होऊन जातो. एकांतात आपलासा करून घेतो.

कधी रिमझिम सरीसोबत आपल्याला स्पर्श करून जातो, तर कधी पाण्याच्या थेंबाने आपल्यात मिसळून जातो,

तर कधी स्वतःमध्ये आपल्या सर्वांना सामावून घेतो,

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो ।।



दुसऱ्यासाठी जगणे शिकवतो, तर स्वतःवर प्रेम करणे शिकवतो,

आयुष्यातला प्रत्येक दिवस आठवायला नेहमी मदत करतो

कधी कोणाच्या आठवणीत रेंगाळायला लावतो तर तोच त्या दूर ही करतो.

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो ।।



प्रत्येक बरसणाऱ्या सरीसोबत खेळायला, बागडायला शिकवतो,

तर कधी मनातील दुःखाच मळभ दूर करतो,

निसर्गावर प्रेम करायला लावतो.

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो ।।



कधी ऊन, तर कधी सावली बनुन स्वतःच लपंडाव खेळतो, आणि आपल्याला मात्र अचानक येऊन भिजवतो. 

असा हा पाऊस आपल्याला आपल्या प्रत्येक क्षणात सोबती ठरतो.

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो ।।



त्याच्याकडून शिकण्यासारखं नक्कीच खुप काही आहे, 

जस की तो कधीच जात, धर्म या गोष्टी बघत नाही. 

प्रत्येक वेक्तीला भरभरून आनंद देतो,

गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाला स्वतःमध्ये सामाहून घेतो. 

असा हा पाऊस नेहमी काही तरी शिकवून जातो ।।



आपण नेहमी त्याला दुखवतो, त्रास देतो,

पण तो मात्र आपल्याला भरभरून प्रेम देत राहतो. 

प्रेमात पडलेल्या प्रत्येक कपल ला मग त्याच्या येण्याचीच ओढ जास्त असते,

पण प्रेम म्हणजे काय हे आपण त्याच्याकडूनच शिकावे.

जशी धरती आसुसलेली असते त्याच्या मिलण्यासाठी, तसाच तोही आतुर असतो तिला भेटण्यासाठी.

जेव्हा तो बसतो, धरतीला आपल्या कवेत सामावून घेतो

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो ।।


ओसाड झालेल्या आपल्या मित्रांच्या हाकेला धावुन येतो, 

मैत्रीची खरी व्याख्या तो पूर्ण करतो. 

त्याच्या येण्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसु उमटते,

असा हा पाऊस सोबत येताना जणु सांता क्लोज बनून येतो,

सर्वांमध्ये आनंद पसरवत फिरतो.

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो ।।



बळी राजाच्या आनंदाला पाराच उरत नाही, जेव्हा हा पाऊस त्याच्या कोरड जमिनीला परत उठुन जगायला शिकवतो. 

त्या प्रत्येक प्राणी, पक्षांना ही ओलचिंब करतो,

सर्वांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधत.

असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो ।।



लहान मुलांपासून, मोठ्यांपर्यंत सर्वाना वेड लावतो,

प्रत्येकाला स्वतःमध्ये सामावून घेऊन आनंदी करतो. 

चुकलो तर रागावतो, पण हा पाऊस आपल्याला नक्कीच काही तरी शिकवून जातो.


असा हा पाऊस काही तरी शिकवून जातो.....


Rate this content
Log in