बदलते समाज
बदलते समाज
बदललेला समाज
बदलत चाललेली विचारसरणी
ऐकमेकांप्रती सांगा
आपुलकीची जागा कोठे उरली
काही काम काढायचे
असेल तरच कॉल करणार
स्टेटस बघूनही मात्र
रिप्लाय कधीच नाही देणारं
येता जाता बोलणे
शेजारांशी रोज जरी असले
गोष्टी मात्र त्याच
कोणाच्या घरात काय चालले
सण उत्सव दर्शवी
आपल्या देशाची आदर्श संस्कृती
प्रत्येकांचे देव वाटलेले
नसे कोणास कसली भीती
स्त्री पुरुष समानता
जगणं सोपं करते तस दोघांचं
जुन्या रीती दर्शवी
नेहमी सांगे पुरुषार्थ पुरुषाचं
बदलते समाज या नावानेच
समाजाचा तोल गेला
नको त्या दिलेल्या आश्वासना पाई
वोटांनी खेळ केला
विज्ञान युगात चाले
देवधर्माच्या नावावर अंधश्रद्धा
सूर्य चंद्र तारे राहू केतू
नावांनी जोरात चालला धंदा
शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा
हा आदर्श एकच नारा
सुशिक्षित संघटन शिक्षणामुळे
समाज बदलतो बर सारा