चमेली
चमेली
चमेली
त्या चमेलीच्या बनात, कानी शुभ्र कुजबुज
सावळयाच अलगूज, मी बावरी बावरी
त्या चमेलीच्या गंधाच्या, वळसे वेलांट्या
मला लपेटून उरली, एक सावळी सावली.
त्या चमेलीच्या बनी, चांदणफुलांचेच उन
त्या कोवळ्या उन्हात बिलगे नीरव निळाई.
त्या चमेलीच्या बहरात, चिंब भिजली प्रीत
तुझ्या शेल्यातली झाले आज बासरी बासरी.
त्या चमेलीभोवती स्पर्श गंधाच मीलन
तुझ्या वेणुतली मी, रिक्त पोकळी पोकळी
त्या चमेलीखाली किती विसावले क्षण
हाती तुझे मोरपीस, मन शांतवी शांतवी.
त्या धुंद चमेलीचा गात्रा गात्रात ताजवा.
मीच मोरपीस झाले, देह रेशमी रेशमी
तू भेटलास कान्हा, जीव झाला चमेली
रंध्रा रंध्राला बिलगे, एक हवीशी काजळी.