चंद्राची चकोर
चंद्राची चकोर
तु ग चंद्राची चकोर
फिरतो तुझ्याग म्होर म्होर
ह्यदयात माझ्या तुझं ग सरकार
तुझ्या ग पढे चकरा मारीतो गरगर
रेशमी तुझे केस उडती भुरभुर
काळजाला माझ्या लागली हुरहुर
तुझे ग हे गाल दिसते लाल लाल
पाहुण तुला होतो मी बेहाल
कोकीळा आवाज येतो ग कानी
मान ग पोरी माला तुझाच मनी
केसात तुझ्या फुलांचा गजरा
करतो राणी तुला वाकुन मुजरा
माझ्या ग मामाची पोर
जसी दिसते तु पेरूची फोड
तुला बघून ग पोरी
आता जीव हेातो खालीवर